औरंगाबाद : कोरोनाच्या प्रत्येक लाटेत इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर) मार्फत प्राप्त होणारे निकष बदलत गेले. तिसऱ्या लाटेत कोरोनाची लक्षणे असलेल्या नागरिकांची तपासणी करण्याचे निर्देश देण्यात आले. त्यानुसार महापालिकेने ५ ते २० जानेवारी दरम्यान ३७ हजार १४३ संशयित रुग्णांची तपासणी केली. त्यामध्ये ५ हजार ८८४ बाधित आढळून आले.
कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेतील घटना आठवल्या, तर अनेकांच्या अंगावर काटा येतो. मागील वर्षभरापासून तिसरी लाट येणार, असे सांगितले जात होते. अखेर तिसरी लाट आली. यात बाधित रुग्णांची संख्या जास्त असली, तरी मृत्यूचे प्रमाण नाममात्र आहे. त्यामुळे नागरिक कोरोनाच्या नियमांचे अजिबात पालन करायला तयार नाहीत. जिकडे तिकडे संसर्ग वाढलेला असताना मास्क न घालता फिरणारे हजारो नागरिक दिसून येतात. तिसऱ्या लाटेत महापालिकेचे शासनाकडून प्राप्त गाईडलाईननुसार काम सुरू आहे. साधारणपणे १ जानेवारीपासून शहरात संसर्ग वाढला. ५ जानेवारी रोजी शहरात १०१ बाधित आढळून आले होते. २० रोजी हिच संख्या ७३४ पर्यंत पोहोचली. सक्रिय रुग्णांची संख्या ४ हजार २०९ झाली. त्यामध्ये होम आयसोलेशन असलेल्या रुग्णांची संख्या तब्बल ३ हजार ८९३ आहे. कोरोना संसर्गाचा आलेख आणखी किती वाढणार, याकडे महापालिका प्रशासन अत्यंत बारकाईने लक्ष ठेवून आहे. संसर्गाची स्थिती लक्षात घेऊन शाळा सुरू करण्याचा निर्णय प्रशासन घेणार आहे.
५ ते २० जानेवारीचा तपशीलदिनांक - तपासण्या - बाधित०५ --- २४६१----१०३०६---- २१५९----१११०७---- २४६३----१५१०८---- २४११----१०८०९----- २१६८----१८३१०-----२५१७-----२७६११-----२३०८----- २८५१२-----२११६------४१०१३-----२११७------३८२१४-----१७७३------४०११५-----२३१३------४२३१६-----२५३९------५१९१७-----३०९५------३३०१८-----२०६२------७०११९-----२३४६------७६७२०-----२३३५------७३४एकूण-३७,१४३------५,८८४