छत्रपती संभाजीनगर : विधानसभा निवडणुकीसाठी औरंगाबाद पूर्व मतदारसंघातून उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यंत सुमारे ४० उमेदवारांनी माघार घेतली. आता २९ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
२९ ऑक्टोबरपर्यंत शेवटच्या तारखेपर्यंत ७८ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. छाननीअंती ६९ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले. त्यातील ४० उमेदवारांनी ४ नाेव्हेंबर रोजी माघार घेतली. २९ उमेदवार मतदारसंघातून लढणार आहेत. प्रमुख लढत महायुती, महाविकास आघाडी, एमआयएम, वंचित बहुजन आघाडी, बसपा, समाजवादी पक्ष व अपक्ष उमेदवारांमध्ये होणार आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी फक्त पाच तासांचा अवधी होता. त्यामुळे अनेक उमेदवारांना धावपळ करावी लागली.
पूर्व मतदारसंघ: निवडणूक मैदानातील उमेदवारअतुल सावे : भाजपलहूजी शेवाळे : काँग्रेसशीतल बनसोडे : बसपाअफसर खान : वंचित बहुजन आघाडी
डॉ.गफ्फार कादरी : समाजवादी पार्टीइम्तियाज जलील : एमआयएम
इसा यासीन : एआयएमएआयएएमजयप्रकार घोरपडे : पीडब्ल्यूपीआय
योगेश सुरडकर : लोकराज्य पार्टीरवीकिरण पगारे : व्हीसीके
राहुल साबळे : एएसपी (कांशीराम)साहेबखान यासीनखान : बीआरएसपी
शकिला नाजेखान पठाण : अपक्षतसनीम बानो : अपक्ष
दैवशाली झिने : अपक्षनीता भालेराव : अपक्ष
पाशू शेख : अपक्षमधुकर त्रिभुवन : अपक्ष
मोहम्मद मोहसीन : अपक्षराहूल निकम : अपक्ष
लतीफखान : अपक्षशहजादखान : अपक्ष
शमीम शेख : अपक्षशेख अहमद : अपक्ष
सद्दाम अब्दुल अ.शेख : अपक्षसलीम उस्मान पटेल : अपक्ष
सोमनाथ वीर : अपक्षसंतोष साळवे : अपक्ष
हनीफ शाह : अपक्ष