शहरं
Join us  
Trending Stories
1
चंद्रचूड यांचा लास्ट वर्किंग डे संपला! सर्वांना वाकून नमस्कार करत म्हणाले, दुखावला असाल तर माफ करा...
2
"प्रत्येक गड-किल्ल्यावर मशीद असायला हवी..."; काँग्रेस खासदाराची राज ठाकरेंवर टीका
3
शिवरायांचा भगवा झेंडा दरोडेखोरांच्या हातात शोभून दिसत नाही; उद्धव ठाकरे कडाडले
4
रामटेकच्या गडावरून कडेलोट कुणाचा? चौकसे, किरपान, मुळक यांनी वाढविले टेन्शन!
5
"तुमचा शत्रू जमिनीच्या मार्गाने येतोय"; राज ठाकरेंनी कुणाला दिला इशारा?
6
महायुतीचा मुख्यमंत्री कोण?, अमित शाहांनी दिले संकेत; एका विधानानं चर्चांना उधाण
7
Maharashtra Election 2024: "माफी मागा, अन्यथा...", डी के शिवकुमार यांचा महायुतीच्या नेत्यांना इशारा
8
बहिणीच्या लग्नात अनन्या पांडेने का घातला आईचा २१ वर्ष जुना ड्रेस? समोर आलं कारण
9
पृथ्वी शॉचा 'संघर्ष' कायम! मुंबईनेही दाखवला बाहेरचा रस्ता; ऑस्ट्रेलियन दिग्गजाने पत्राद्वारे दिला धीर
10
'महायुतीचे सरकार बनवायचे, देवेंद्र भाऊंना विजयी करायचे'; अमित शाहांनी पहिलीच सभा गाजवली, विरोधकांवर तोफ डागली
11
नजरेत क्रूरता, आवाजात निष्ठूरता.., 'संगीत मानापमान'मधील उपेंद्र लिमयेचं मोशन पोस्टर रिलीज
12
बाबो! 'पुष्पा २' साठी अल्लू अर्जुनने घेतले ३०० कोटी, रश्मिका अन् फहाद फाजिलला मिळाले फक्त...
13
"जातीजातीत समाज विखुरला जावा; SC, ST, OBC समाज एकजूट राहू नये हा काँग्रेसचा डाव"; मोदींचा हल्लाबोल
14
G-NCAP मध्येही खळबळ उडाली! मारुतीच्या नवी डिझायरला ५ स्टार सेफ्टी रेटिंग; टाटाला मोठा धक्का
15
...तर कोकणातील ३ जिल्हे अख्खा महाराष्ट्र पोसू शकतात; राज ठाकरेंचं कळकळीचं आवाहन
16
UPI पेमेंटसाठी इंटरनेटची गरज भासरणार नाही, 'या' फीचरद्वारे लगेच होणार पेमेंट; काय आहे लिमिट?
17
अब्जाधीश उद्योगपती चिरतरूण राहण्यासाठी करतो दररोज १८ तासांचा उपवास, डाएटमध्ये काय-काय?
18
ओळीने फ्लॉप सिनेमे देणारा अभिनेता आता ४१ व्या वर्षी पुन्हा आजमावणार बॉलिवूडमध्ये नशीब
19
SBI Q2 Results : दुसऱ्या तिमाहीत २८% नं वाढला SBI चा नफा, अपेक्षेपेक्षा अधिक; शेअरची स्थिती काय?

छत्रपती संभाजीनगरात डोळ्याच्या साथीसोबत डेंग्यूचा ‘कहर’

By मुजीब देवणीकर | Published: August 19, 2023 1:00 PM

१ ऑगस्टपासून १८ ऑगस्टपर्यंत ५९ डेंग्यूचे संशयित रुग्ण आढळून आले. १२ रुग्ण बाधित निघाले.

छत्रपती संभाजीनगर : शहरात सध्या डोळ्यांची साथ जोरदार सुरू आहे. त्यात आता डेंग्यूची भर पडली असून, मागील १८ दिवसांमध्ये तब्बल ५९ संशयित, तर १२ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. खाजगी रुग्णालयांमध्ये मोठ्या संख्येने रुग्ण उपचार घेत आहेत. काही रुग्णांचा मृत्यूही झाला; पण मनपाकडे त्याची नोंद नाही.

पावसाळा सुरू झाल्यापासून शहरात एकदाही मोठा पाऊस झाला नाही. डासांचे प्रमाण झपाट्याने वाढू लागले. महापालिकेच्या आरोग्य विभागाने महिनाभरापूर्वी मलेरिया विभागाचे सर्व कर्मचारी एकत्र आणून झोननिहाय धडक ॲबेट, धूर फवारणी, औषध फवारणी मोहीम राबविली. १ लाखांहून अधिक घरांमध्ये तपासणी केली. त्याचे परिणामही दिसले. काही दिवस डेंग्यू, मलेरियाचे रुग्ण नव्हते; पण ऑगस्ट महिना सुरू होताच रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होऊ लागली. १ ऑगस्टपासून १८ ऑगस्टपर्यंत ५९ डेंग्यूचे संशयित रुग्ण आढळून आले. १२ रुग्ण बाधित निघाले. खाजगी रुग्णालयांमध्ये डेंग्यूच्या रुग्णांचा मृत्यू झाला; पण खाजगी रुग्णालयांनी यासंदर्भातील माहिती दिली नसल्याचे साथरोग मोहीम अधिकारी अर्चना राणे यांनी सांगितले.

डेंग्यू- २०२१संशयित - २६६पॉझिटिव्ह-५७डेंग्यू- २०२२संशयित-२३२पॉझिटिव्ह- ६१डेंग्यू- २०२३संशयित-१७५पॉझिटिव्ह-५७(१८ ऑगस्टपर्यंत)

उपाययोजना कोणत्या?घराच्या आसपास पाणी थांबू देऊ नका.कूलरमधील पाणी आठवड्यातून एकदा बदला.घरात कीटकनाशक औषधांची फवारणी करावी.मुले, मोठ्या व्यक्तींनी अंगभर कपडे घालावेत.मच्छरदाणीचा वापर करावा.डास पळविणाऱ्या औषधांचा घरात वापर करावा.पाण्याचे साठे नेहमी झाकून ठेवले पाहिजेत.

प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरूचज्या भागात डेंग्यू पॉझिटिव्ह, संशयित रुग्ण आढळून येत आहेत, त्या भागात अधिक लक्ष केंद्रित केले असून, युद्धपातळीवर कोरडा दिवस, धूर, औषध फवारणी, ॲबेट ट्रीटमेंट आदी उपाययोजना करण्यात येत आहेत. नागरिकांनी घाबरण्याचे कारण नाही.- डॉ. पारस मंडलेचा, आरोग्य वैद्यकीय अधिकारी, मनपा

काय म्हणतो हाउस इंडेक्स ?ज्या भागात पाण्यात डासअळ्या मोठ्या प्रमाणात येतात, त्या भागातील हाउस इंडेक्स दररोज मनपाकडून काढण्यात येतो. त्या भागात व्यापक उपाययोजना केल्या जातात. शुक्रवारी मसनतपूर, संजयनगर-बायजीपुरा, रवींद्रनगर, शहाबाजार, भरतनगर-एन-१३, चाउस कॉलनी, काचीवाडा, सिद्धार्थनगर, पदमपुरा भागांचा हाउस इंडेक्समध्ये समावेश होता.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादdengueडेंग्यू