छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यातील लोकसंख्या ३६ लाखांवर गेली आहे. या लोकसंख्येच्या अर्धी म्हणजे तब्बल १७ लाख ५२ हजार वाहने जिल्ह्यातील रस्त्यांवर धावत आहेत. त्यातही जिल्ह्यात ८५ टक्के वाहने ही फक्त दुचाकी, चारचाकी आहेत, हे विशेष. गेल्या पाच वर्षांत ३.७२ लाख नवी वाहने रस्त्यांवर आली असून, वाहनांची संख्या पाहता एका व्यक्तीमागे दोन वाहने असल्याची स्थिती आहे. विशेष म्हणजे गेल्या पाच वर्षांत प्रथमच २०२३-२४ या आर्थिक वर्षात प्रथमच नव्या चारचाकींची संख्या १० हजारांवर गेली. दुचाकी खरेदीचे प्रमाण आता वाढत आहे.
रोज २३१ नवीन वाहने रस्त्यावरजिल्ह्यात दररोज २३१ नवीन वाहने रस्त्यावर येत आहेत. पाच वर्षांपूर्वी जिल्ह्यातील एकूण वाहनांची संख्या ही १३ लाखांवर होती. आता ही संख्या १७ लाखांवर गेली आहे.
जिल्ह्यात कोणत्या वर्षी किती नवीन वाहनेवर्ष- वाहनसंख्या२०१८-१९ : ९१,८७४२०१९-२० : ८२,८२६२०२०-२१ : ६०,२४२२०२१-२२ : ६५,०५१२०२२-२३ : ८०,१९९२०२३-२४ : ८४, ३६६मे २०२४ : ७,२२३जून २०२४ : ६,५८३
कोणत्या वर्षी किती नवीन दुचाकी, चारचाकी वाहने रस्त्यावर?वर्ष- दुचाकी- चारचाकी-२०१८-१९ : ७१,७८१-८,७२५२०१९-२० : ६५,७३९-८,४०४२०२०-२१ : ४४,८०० -८,२५४२०२१-२२ : ४७,२३५-९,१३०२०२२-२३ : ६१,०९५-८,६७९२०२३-२४ : ६३,०४६-१०,३८८मे २०२४ : ५,३४६-९१२जून २०२४ : ८,४१३-१,१५५
वर्षनिहाय जिल्ह्यातील एकूण वाहनसंख्यावर्ष- एकूण वाहने२०१८-१९ : १३,७९,४६२२०१९-२० : १४,६२,२८८२०२०-२१ : १५,२२,५३०२०२१-२२ : १५,८७,५८१२०२२-२३ : १६,६७,७८०२०२३-२४ : १७,५२,१४६
जिल्ह्यातील वाहनांची सध्याची स्थितीएकूण वाहने : १७,५२,१४६चारचाकी वाहने : १,२६,९७०दुचाकी वाहने : १३,६८,२१३रिक्षा : ३८,४५५स्कूल बस : १,१५४मिनी बस : २,९१९रुग्णवाहिका : ५९८