शहरं
Join us  
Trending Stories
1
Baba Siddique : जेलमध्ये सुपारी, ४ आठवडे रेकी, ३ शूटर, ६ गोळ्या...; सिद्दिकी हत्या प्रकरणातील धक्कादायक खुलासे
2
परदेश दौऱ्यावर जाण्यापूर्वी राष्ट्रपतींचा मोठा निर्णय; जम्मू काश्मीरच्या नव्या मुख्यमंत्र्यांचा मार्ग मोकळा केला
3
भीषण! गाझामधील शाळेवर इस्रायलचा एअर स्ट्राईक; लहान मुलांसह २० जणांचा मृत्यू, अनेक जखमी
4
छ. संभाजीनगरमध्ये पोलीस उपायुक्तांच्या मुलाने आयुष्य संपविले; आई - बाबांसाठी आरशावर लिहिली नोट
5
मारेकरी येऊन गेले होते सिद्दीकींच्या कार्यालयात, ...अन् फटाक्यांच्या आवाजात साधला नेम
6
जयशंकर पोहोचण्यापूर्वी इस्लामाबादमध्ये लष्कर तैनात; पाकिस्तानात दंगे भडकले
7
अंबानी कुटुंबीय १५००० कोटींच्या अँटिलियातील कोणत्या मजल्यावर राहतं माहितीये, कोणाला येण्याची परवानगी?
8
बाबा सिद्दीकींची हत्या करणाऱ्या धर्मराजचा बनाव उघड; समोर आली महत्त्वाची माहिती
9
बाबा सिद्दिकी हत्या प्रकरण : एक आरोपी म्हणाला, मै 17 साल का हूँ...! त्या आरोपीचे वय २१, १९, की १७?
10
भौम प्रदोष: ‘असे करा’ व्रत, महादेव होतील प्रसन्न; मंगळ दोषातून दिलासा, हनुमंत करतील कृपा
11
बाबा सिद्दीकी हत्येच्या कटाचे पुणे ‘कनेक्शन’
12
कोजागरी नवान्न पौर्णिमा: ५ राशींना अनुकूल, नोकरी-व्यापारात यश; इच्छापूर्ती, सुख-सौभाग्य काळ!
13
गुरुचरित्र आपल्याला नेमके काय शिकवते? ११ गोष्टी कालातीत, आजही येते प्रचिती; पाहा, गुरुपदेश
14
हिजबुल्लाहचा इस्रायलवर भीषण ड्रोन हल्ला; चार सैनिकांचा मृत्यू, ६० हून गंभीर जखमी
15
आजचे राशीभविष्य: ७ राशींना अनुकूल, धनलाभ योग; नोकरीत शुभवार्ता, प्रसन्नतेचा दिवस
16
एकत्र फोटोमुळे आरोपींची ओळख पटवण्यात आले यश
17
बिश्नोई गँगने स्वीकारली बाबा सिद्दीकींच्या हत्येची जबाबदारी? फेसबुक पोस्ट व्हायरल; आरोपी म्हणाला- 'मै १७ साल का...'
18
महाविकास आघाडीने केला ‘गद्दारांचा पंचनामा’; संयुक्त पत्रकार परिषदेतून महायुती सरकारवर निशाणा
19
तुरुंगातून बाहेर येताच आखला बाबा सिद्दीकींच्या हत्येचा कट; मुंबई, पुण्यात राहून रेकी, अडीच ते तीन लाखांची सुपारी
20
काँग्रेस नेते आज दिल्ली दरबारी; आढावा घेणार

दिवाळीत फटाक्याची धडामधूम स्पर्धाच; पण कर्णबधिर अन् दृष्टीदोषाची इजा नको!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2023 3:24 PM

दिवाळीत फटाक्याची धडामधूम स्पर्धाच; प्रदूषण नियंत्रणासाठी मंडळ सज्ज

छत्रपती संभाजीनगर : दिवाळीत फटाक्याची धडामधूम स्पर्धाच लागते. आनंदाचे कारंजे, रॉकेट, लक्ष्मी फटाका व विविध फटाक्यांच्या आवाजाने प्रदूषण वाढून मुले, सर्वसामान्य नागरिकांना झळ पोहोचू नये म्हणून प्रदूषण नियंत्रित ठेवण्यासाठी प्रदूषण नियंत्रण मंडळ सज्ज झाले असले तरी अद्याप फटाक्यांच्या आवाजाची चाचणीच झालेली नाही.

दरवर्षी प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या वतीने दिवाळीपूर्व फटाक्याचा आवाज किती असावा ते डेसिबल मोजले जाते. एकापेक्षा एक असा मोठा फटाका चाचणीतून त्याची क्षमता मापनानंतरच त्या फटाक्याला विक्रीची परवानगी देण्यात येते; परंतु यंदाच्या दिवाळीसाठी शहरातील सातारा, चिकलठाणा, वाळूज, पंढरपूर, हडको, सिडको, कर्णपुरा अशा ९ ठिकाणी परवानगी देण्यात आलेली आहे. बहुतांश कारखान्यात बोनस देण्यात आलेले आहेत, तर काहींना पगारासोबत बोनस किंवा अग्रीम देण्याचे नियोजन दिसते आहे. दिवाळीच्या खरेदीला सुरुवात झालेली दिसत आहे. कपडा तसेच मिठाई, फरसाण आणि उंच उंच उडणारे रॉकेट, फटाके आकाशात कारंजे निसर्गात आनंदमय रोषणाई निर्माण करणारा असतो. आरोग्यावर कोणताही परिणाम होऊ नये यादृष्टीने प्रदूषण नियंत्रण मंडळ यंदा पर्यावरण राखण्यावर भर देत आहेत.

विविध कार्यक्षेत्रातील प्रतिनिधीच्या समक्ष चाचणी...आवाजाचे डेसिबल मोजणाऱ्या यंत्रणेला मंडळाने पाचारण केलेले आहे. त्यांच्याकडे मोबाईल यंत्रणाही कार्यान्वित आहे.

स्वत:ला सांभाळून फटाके उडवा..शहरात अद्याप फटाके विक्री सुरू झालेली नाही. हातात धरून फटाके फोडू नका, लहान मुलांना मोठ्या आवाजाचे फटाके देऊ नका, फटाके शक्यतो निर्मनुष्य ठिकाणी फोडावे. लवकरच चाचपणी करण्यास मंडळ सज्ज आहे. - प्रकाश मुंढे, अधिकारी प्रदूषण नियंत्रण मंडळ.

टॅग्स :Diwaliदिवाळी 2023Aurangabadऔरंगाबादfire crackerफटाके