शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राचे बेस्ट मुख्यमंत्री कोण? अजित पवारांनी घेतले या नेत्याचे नाव, म्हणाले...'युती-आघाडीच्या युगात...'
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :वाईतील सभेत शरद पवारांना अचानक एक चिठ्ठी आली,पवारांनी वाचूनच दाखवली, म्हणाले,...
3
प्रियांका गांधी यांच्याकडून भरसभेत बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख; PM मोदी, अमित शाह यांना मोठं आव्हान
4
सलमान ते श्रद्धा वालकरचा मारेकरी आफताबपर्यंत...; लॉरेन्स बिश्नोईच्या हिटलिस्टमध्ये कोण आहे?
5
"केम छो वरली, जिलेबी फाफडा उद्धव ठाकरे आपडा तुम्ही बोलायचं अन्..."
6
दोन मित्रांमध्ये प्रतिष्ठेची लढत; राजकीय आखाड्यात कोणता पैलवान मारणार बाजी? 
7
मौलाना सज्जाद नोमानींनी जारी केली यादी; मुंबईतील ३६ जागांवर कुणाला दिला पाठिंबा?
8
बंडखोर उमेदवारांमुळे मतविभाजनाची भीती; भाजप, ठाकरेंच्या शिवसेनेसमोर आव्हान
9
आगीचा भडका, किंकाळ्या, चेंगराचेंगरी, पालकांचा आक्रोश...; मन हेलावून टाकणारा Video
10
दुसऱ्या मतदारसंघात उभा असतो तर निवडून आलो असतो; अजित पवारांचे बारामतीत महत्वाचे वक्तव्य
11
पुन्हा बाबा झाल्याचा आनंद! रोहित शर्मानं पत्नी रितिकाला टॅग करत शेअर केला खास फोटो
12
वाढत्या महागाईत व्हिलेन बनताहेत भाज्या; टोमॅटो, कांदा, बटाट्याच्या वाढत्या किंमतींनी बिघडवलं किचनचं बजेट
13
"...म्हणून अशोक चव्हाण आपल्याकडे आले, त्यांनी बाबासाहेबांचं म्हणणं ऐकलं"; नेमकं काय म्हणाले एकनाथ शिंदे?
14
Priyanka Gandhi : "महाराष्ट्राच्या धरतीने नेहमीच देशाला दिशा दिली"; प्रियंका गांधींकडून जय भवानीचा जयघोष
15
"युतीचे सरकार आल्यावर उद्धव ठाकरेंना जेलमध्ये टाकू"; अब्दुल सत्तार यांचा ठाकरेंवर प्रतिहल्ला
16
Sankashti Chaturthi 2024: संकष्टीने सुरु होणारा आठवडा बाराही राशींसाठी ठरणार लाभदायी!
17
'या' १८ जिल्ह्यांमध्ये आता हॉलमार्किंगशिवाय सोन्याचे दागिने विकले जाणार नाहीत
18
'स्विंग इज किंग'! हा भारतीय खेळाडू ठरू शकतो IPL मेगा लिलावातील सर्वात महागडा गोलंदाज
19
पुढील वर्षी १० वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरू करण्याची तयारी, मार्ग आणि फीचर्स जाणून घ्या...
20
IPO च्या समुद्रात उतरणार अमन गुप्ता यांची 'boAt', काय आहे कंपनीचा प्लान?

पाच वर्षांत कृषी विभागाने जप्त केले १६ कोटींचे बोगस बियाणे, तब्बल २९१ गुन्हे नोंदवले

By बापू सोळुंके | Published: December 01, 2023 3:16 PM

मागील पाच वर्षात किती बियाणे कंपन्यांना आणि विक्रेत्याला न्यायालयात शिक्षा झाली याची माहिती कृषी विभागाकडे उपलब्ध नाही.

छत्रपती संभाजीनगर : शेतकऱ्यांना बोगस आणि निकृष्ट बियाणे मिळू नये, यासाठी शासनाचे प्रयत्न असतात. मागील पाच वर्षात राज्यभरात कृषी विभागाने बोगस आणि अप्रमाणित बियाणे विक्री करणाऱ्या दुकानदारांसह कंपन्यांविरोधात तब्बल २९१ गुन्हे पोलिसांत नोंदविले आणि ४४३४ प्रकरणात कोर्टात खटले भरले. पण, मागील पाच वर्षात किती बियाणे कंपन्यांना आणि विक्रेत्याला न्यायालयात शिक्षा झाली याची माहिती कृषी विभागाकडे उपलब्ध नाही.

दरवर्षी कृषी विभागाचे अधिकारी बाजारात दाखल विविध कंपन्यांच्या बियाणांचे नमुने घेऊन त्यांची प्रयोगशाळेत तपासणी करतात. बोगस बियाणेही विक्रीला आल्याचे नजरेस पडताच कृषी विभागाकडून पोलिसांत गुन्हा नोंदविला जातो. प्रयोगशाळेकडून प्राप्त अहवालाच्या आधारे संबंधित कंपनी आणि विक्रेत्यावर कोर्टात खटला दाखल करण्याचे अधिकार कृषी अधिकाऱ्यांना आहे. शेतकऱ्यांना उत्कृष्ट गुणवत्तेचे बियाणे, रासायनिक खते आणि कीटकनाशके मिळावेत, यासाठी राज्यात अनेक कायदे आहेत.

या कायद्यानुसार राज्यात मागील पाच वर्षात २९१ पोलिसांत गुन्हे नोंदविले आणि ४४३४ प्रकरणात कोर्टात खटले दाखल करण्यात आले. पाच वर्षात तब्बल १६ कोटी २४ लाखांचे बोगस बियाणे जप्त करण्यात आले. महाराष्ट्र सरकारने राज्यात बोगस बियाणे विक्रेत्यांवर कडक कारवाई करण्यासाठी एमपीडीएच्या तरतुदी असलेला नवा कायदा प्रस्तावित केला आहे. या कायद्याचा महाराष्ट्रातील आणि परराज्यातील बियाणे कंपन्यांनी विरोध सुरू केला आहे.

नव्या कायद्याचे स्वागत करायला हवेबियाणे कंपन्यांनी प्रस्तावित कायद्याला घाबरण्याचे कारण नाही, राज्यात चांगले काम करणाऱ्या बियाणे उत्पादक कंपन्यांनी तर या कायद्याचे स्वागत करायला हवे. शेतकऱ्यांना दरवर्षी बोगस आणि निकृष्ट बियाणे विकून स्वत:चे उखळ पांढरे करून घेणाऱ्या कंपन्यांनी याचा धसका घ्यायला हवा.- विकास पाटील, संचालक, बियाणे आणि निविष्ठा गुणनियंत्रक संचालक कृषी विभाग

महाराष्ट्रात व्यवसाय करणाऱ्या परप्रांतीय बियाणे कंपन्या-५३६महाराष्ट्रातील बियाणे कंपन्यांची संख्या-१०४४परवानाधारक एकूण बियाणे कंपन्या - १५८०सन २०१९-२३ कारवाईची माहितीराज्यातील परवानाधारक बियाणे विक्रेते- ४५,२३१कृषी गुणनियंत्रक पथकाने तपासणी केलेल्या दुकानांतील बियाणे नमुने संख्या- १,१४,८०९बियाणे उत्पादक कंपनीतील तपासणी नमुन्यांची संख्या- १२८४अप्रमाणित बियाणे नमुने-८४३३कोर्ट केसेस-४४३४पोलिसांत गुन्हे--२९१परवाने निलंबन---६३६परवाने रद्द-- २०८

फक्त कंपन्या जबाबदार नाहीबियाणे उगवण्यास जमीन, पाणी, पाऊस आणि खते, कीटकनाशक आणि निसर्ग आदी घटक कारणीभूत असतात. मात्र याबाबींचा विचार न करता बियाणाच्या गुणवत्तेसंदर्भात तक्रार आल्यास थेट पोलिसांत गुन्हा नोंदविण्याची तरतूद प्रस्तावित कायद्यात आहे. एवढेच नव्हे तर हा गुन्हा अजामीनपात्र आणि एमपीडीएसारखा कडक असल्याने बियाणे कंपन्यांच्या संचालकांना अटकेची यात तरतूद आहे. यापूर्वी बियाणाविषयी तक्रार प्राप्त झाल्यानंतर तालुका कृषी अधिकारी शेतकऱ्याच्या शेतात जाऊन पंचनामा करून निर्णय देत. शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये, यासाठी बऱ्याचदा बियाणे कंपन्या, विक्रेते शेतकऱ्यांना नुकसानभरपाईही देतात. ग्राहक मंचात दादही मागता येते.- समीर मुळे, अध्यक्ष, महाराष्ट्र सीड उत्पादक असोसिएशन

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रCrime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबाद