शहरं
Join us  
Trending Stories
1
वर्ध्यातील इवोनिथ कंपनीत स्फोट; २२ कामगार भाजले, तिघांना नागपूरला हलविले
2
सदाभाऊ खोतांची शरद पवारांवर वादग्रस्त टीका; अजित पवार संतापले, महायुतीला थेट इशारा
3
पोस्टल मतपत्रिका केली व्हायरल, जवानावर गुन्हा दाखल
4
राज्य गुंतवणुकीत मागे पडले, ६४ हजार महिला बेपत्ता, शोधच लागेना; शरद पवारांची टीका
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024:"मुर्खासारखं काय बोलतो...याचं नाव घेऊन ठेवा रे", उद्धव ठाकरे पोलिसावर संतापले! काय घडलं?
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : दरमहा महिलांना ३ हजार, बेरोजगारांना ४ हजार अन्...; मविआच्या ५ गॅरंटी काय आहेत?
7
मविआ-महायुतीत स्पर्धा लागली! लाडक्या बहिणींना ९०० रुपये जास्त देणार; दोघांच्या जाहीरनाम्यात कुणाला काय मिळणार...
8
Maharashtra Election 2024: निकालानंतर अजित पवारांना सोबत घेण्याची वेळ आली, तर काय? जयंत पाटील म्हणाले... 
9
KL राहुल आणि ध्रुव जुरेलची Team India त एन्ट्री; ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात खेळणार
10
देवेंद्र फडणवीसांना येणाऱ्या धमक्यांवर सातारचे खासदार छत्रपती उदयनराजे संतापले
11
राजू शेट्टींचा आश्चर्यकारक निर्णय! कोल्हापूर पट्ट्यात ठाकरे गटाच्या उमेदवाराला जाहीर पाठिंबा
12
बारामतीमध्ये कुणाचा विजय होणार? जयंत पाटील म्हणाले, "निर्णय कसा लागेल सांगणे अवघड"
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "चेहऱ्यावरून त्यांना बोलणं यावरून तुमची..."; सदाभाऊ खोतांच्या टीकेला जितेंद्र आव्हाडांचं प्रत्युत्तर
14
दमदार! आता WhatsApp युजर्स शोधणार फोटो खरा आहे की खोटा, काय आहे नवीन फीचर?
15
Baba Siddique : बाबा सिद्दिकी हत्येप्रकरणी मोठी अपडेट; मुंबई पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
16
'फाईट-फाईट-फाईट...'! एका फोटोनं ट्रम्प यांचं नशीब बदललं, आता बनले अमेरिकेचे 47वे राष्ट्राध्यक्ष
17
टाटाच्या ब्रँडने मोठा निर्णय घेतला; जग्वारने ब्रिटनमध्ये कारची विक्री थांबविली, कारण काय?
18
केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत सरकारचा मोठा निर्णय; लाखो विद्यार्थ्यांचा होणार फायदा
19
Maharashtra Vidhan Sabha 2024: नवी मुंबईत अपक्ष कोणाच्या व्होट बँकेला पाडणार भगदाड?
20
“काँग्रेसने आत्मविश्वास गमावला आहे, जाहिरातीत पराभूत मानसिकतेचे लक्षण दिसते”: अशोक चव्हाण

चार वर्षात १३ हजार ६३३ नागरिकांना श्वान चावले; रेबिजमुळे ५ जणांचा मृत्यू

By मुजीब देवणीकर | Published: September 29, 2023 6:43 PM

छत्रपती संभाजीनगरात रस्त्या-रस्त्यांवर कुत्र्यांच्या झुंडी

छत्रपती संभाजीनगर : शहरात मोकाट श्वानांची संख्या किती, याची अधिकृत आकडेवारी महापालिकेकडे नाही. मात्र चार वर्षात रेबिजमुळे पाच निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाला.

रेबिजमुक्त शहर व्हावे यासाठी पाऊल उचलण्यात आले असून, चालू आर्थिक वर्षात एकही रेबिजचा रुग्ण आढळून आलेला नाही. चार वर्षात १३ हजार ६३३ नागरिकांना श्वान चावले. ३३ हजार ६१२ श्वानांची नसबंदी करून रेबिजची लस देण्यात आली, असे मनपाची आकडेवारी सांगते. प्रत्यक्षात शहरात रस्त्या-रस्त्यांवर कुत्र्यांच्या झुंडी आहेत. शहरात किमान ४० हजार श्वान असावेत. रात्री १० वाजेनंतर कोणत्याही भागात पायी फिरता येत नाही, अशी परिस्थिती आहे.

रेबिजवर कोणतेही औषध नाही. रुग्णाचा मृत्यू अटळ असतो. श्वानाला रेबिज प्रतिबंधात्मक लस दिलेली असल्यास रुग्णाला फारसा धोका नसतो. मात्र, खबरदारीचा उपाय म्हणून रुग्णाला लसीकरण करून घ्यावेच लागते. दरवर्षी शहरात किमान १० हजार नागरिकांना श्वान चावतात. २०२०-२१ या वर्षात ३ व २०२२-२३ या वर्षात २ जणांचा मृत्यू झाल्याची नोंद महापालिकेच्या पशुसंवर्धन विभागाकडे आहे. मोकाट श्वानांची संख्या वाढतच चालली आहे. शहरातील मुख्य रस्त्यांवर दिवसा, रात्री श्वानांच्या मोठमोठ्या झुंडी पहायला मिळतात. अनेकदा हे श्वान वाहनचालकांच्या अंगावर धावून जातात. श्वानांची संख्या आटोक्यात राहावी, यासाठी महापालिकेने खाजगी संस्थेच्या माध्यमातून श्वान निर्बीजीकरण माेहीम काही वर्षांपासून हाती घेतली. चार वर्षांत ३३,६१२ श्वानांची नसबंदी, रेबिज लसीकरण करण्यात आले. ज्या श्वानांची नसबंदी केली जाते, त्याचे कान (खूण म्हणून) थोडेसे कापण्यात येतात.

नागरिकांनी काळजी घ्यावीनागरिक किंवा लहान मुलांना लहान पिल्ले असलेल्या श्वानाजवळ जाऊ देऊ नका, मुलांना एकटे पाठवू नये. भटक्या श्वानांना दगड मारणे अथवा अन्य प्रकारे त्रास देऊन उत्तेजित करू नये, ज्यामुळे श्वान चावण्याची दाट शक्यता असते. श्वान चावल्यानंतर सर्वप्रथम ती जागा स्वच्छ साबणाने धुवून घ्यावी, त्वरित लस घ्यावी.- शेख शाहेद, पशुसंवर्धन अधिकारी, मनपा

श्वान परवाना बंधनकारकश्वान मालकांनी पाळीव श्वानाचा मनपाकडून परवाना काढणे बंधनकारक असून, न काढल्यास ३ हजार रुपये दंड किवा फौजदारी गुन्हा दाखल होऊ शकतो, असे मनपाने कळविले आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाdogकुत्रा