शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत त्यांचा निर्णय बदलणार नाही"; अजित पवारांना परत घेण्याबद्दल शरद पवारांचं विधान
2
सध्यातरी इतकेच महायुतीत ठरले...; अमित शाह यांच्या मुख्यमंत्री नावाच्या दाव्यावर प्रफुल्ल पटेलांची प्रतिक्रिया
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : अमित शाहांच्या विधानावरुन नवा वाद,संभाजीराजे छत्रपतींनी घेतला आक्षेप; नेमकं प्रकरण काय?
4
Maharashtra Election 2024: लोकसभेला 62 पैकी 43 मतदारसंघात काँग्रेसला मताधिक्य; विदर्भातील लढतीचं गणित कसं?
5
सीबीआयने अधिकाऱ्याला लाच घेताना पकडले, घरात धाड टाकली, रोकडचा डोंगर सापडला
6
चॅम्पियन्स ट्रॉफी पाकिस्तानात होईल आणि भारतही येईल, आता कमीपणा नाही; PCB अध्यक्षांची प्रतिक्रिया
7
'आम्ही भारताला फक्त शस्त्र विकत नाही, आमचं नातं विश्वासावर टिकून आहे', पुतिन स्पष्ट बोलले
8
Athiya Shetty-K L Rahul: अथिया शेट्टीने दिली गुडन्यूज, लग्नानंतर एका वर्षातच पाळणा हलणार; शेअर केली पोस्ट
9
सरन्यायाधीशांचा आज शेवटचा वर्किंग डे; सुप्रीम कोर्टात 'असं' काय घडलं, सगळेच हसले
10
उद्धव ठाकरेंची मशाल घराघरांत-समाजासमाजात आग लावणारी; CM एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल
11
"कॉम्प्रोमाईज करणारा पुढे यशस्वी होतो"; मुख्यमंत्रीपदाबाबत बोलताना अजितदादा म्हणाले, "आमचं टार्गेट..."
12
आवडत्या जागी फिल्डिंग न दिल्याने रुसून बसला; मग 'मुंबई इंडियन्स'च्या माजी खेळाडूला संघाने 'बसवला'
13
चंद्रचूड यांचा लास्ट वर्किंग डे संपला! सर्वांना वाकून नमस्कार करत म्हणाले, दुखावला असाल तर माफ करा...
14
सीएम सुक्खूंना मागविलेले समोसे सुरक्षा रक्षकांना वाटले गेले; CID चौकशी लावली, रिपोर्ट आला...
15
"प्रत्येक गड-किल्ल्यावर मशीद असायला हवी..."; काँग्रेस खासदाराची राज ठाकरेंवर टीका
16
शिवरायांचा भगवा झेंडा दरोडेखोरांच्या हातात शोभून दिसत नाही; उद्धव ठाकरे कडाडले
17
मनीषा कोईरालाने 'हीरामंडी 2' बद्दल दिलं अपडेट, दुय्यम भूमिका करण्याविषयी म्हणाली...
18
रामटेकच्या गडावरून कडेलोट कुणाचा? चौकसे, किरपान, मुळक यांनी वाढविले टेन्शन!
19
"तुमचा शत्रू जमिनीच्या मार्गाने येतोय"; राज ठाकरेंनी कुणाला दिला इशारा?
20
महायुतीचा मुख्यमंत्री कोण?, अमित शाहांनी दिले संकेत; एका विधानानं चर्चांना उधाण

गंगापूरात नेत्यांच्या माघारीने चव्हाणांचा मार्ग मोकळा; सोनवणेंची बंडखोरी बंब यांच्यासाठी डोकेदुखी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 05, 2024 6:50 PM

प्रशांत बंब यांचे नियोजन भेदण्यासाठी सतीश चव्हाण यांनीदेखील तोडीस तोड रणनीती आखली असल्याचे बोलले जात आहे.

- जयेश निरपळगंगापूर :गंगापूर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट, उद्धवसेनेच्या नेत्यांनी आपले मागे घेतल्याने महाविकास आघाडीचे उमेदवार सतीश चव्हाण यांचा रस्ता मोकळा झाला आहे. या मतदारसंघात आता महायुतीचे प्रशांत बंब व महाविकास आघाडीचे सतीश चव्हाण यांच्यात अशी मुख्य लढत होणार आहे. भाजपचे डॉ. सुरेश सोनवणे यांनी बंडखोरी केल्याने महायुतीला याचा कितपत फटका बसेल, हे निकालानंतर स्पष्ट होणार आहे. मात्र, बंब यांची डोकेदुखी वाढली आहे.

२०१९ च्या निवडणुकीप्रमाणे गंगापूर मतदारसंघात पुन्हा एकदा राष्ट्रवादी विरुद्ध भाजपा, असा दुरंगी सामना होणार आहे. महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत बंब हे प्रत्येक वेळी निवडणुकीच्या शेवटच्या काळातील योग्य नियोजनासाठी ओळखले जातात; मात्र यावेळी त्यांना महाविकास आघाडीचे उमेदवार आ. सतीश चव्हाण यांच्या रूपाने तोडीस तोड उमेदवार मिळाला असून, चव्हाण यांनी या निवडणुकीची जोरदार तयारी केली आहे. बंब यांचे नियोजन भेदण्यासाठी चव्हाण यांनीदेखील तोडीस तोड रणनीती आखली असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे या दोन दिग्गजांमध्ये कोण बाजी मारणार, हे निकालानंतर स्पष्ट होणार आहे. बंब व चव्हाण यांच्यात अटीतटीचा सामना होणार असला तरी भाजपाच्या सोनवणे यांच्या उमेदवारीने मतदानामध्ये रंगत वाढली आहे.

जरांगे यांच्या निर्णयानंतर तिन्ही इच्छुकांची माघारमहाविकास आघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट, उद्धवसेना या पक्षांतील इच्छुकांनी आपला निर्णय मनोज जरांगे-पाटील यांच्या भूमिकेनुसार घेण्याचे ठरवले होते. त्यानंतर जरांगे यांनी निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतल्याने या तिन्ही पक्षांतील इच्छुक किरण पाटील डोणगावकर, ॲड. देवयानी डोणगावकर, डॉ. ज्ञानेश्वर नीळ व विलास चव्हाण यांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने महाविकास आघाडीचे उमेदवार सतीश चव्हाण यांना दिलासा मिळाला आहे.

निवडणुकीतील उमेदवार१) प्रशांत बन्सीलाल बंब (महायुती), २) सतीश भानुदास चव्हाण (महविकास आघाडी), ३) सतीश तेजराव चव्हाण (बसपा), ४) अनिल अशोक चंडालिया ( वंचित), ५) ॲड.भारत आसाराम फुलारे ( राष्ट्रीय मराठा पार्टी ), ६) अनिता गणेश वैद्य (सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पार्टी), ७) सतीश हिरालाल चव्हाण सतीश (अपक्ष ), ८) देविदास रतन कसबे (अपक्ष), ९) बाबासाहेब अर्जुन गायकवाड (जय हिंद जय भारत राष्ट्रीय पक्ष), १०) संजय विठ्ठलराव तायडे (अपक्ष), ११) अविनाश विजय गायकवाड (अपक्ष ), १२) राजेंद्र आसाराम मंजुळे (अपक्ष ), १३) पुष्पा अशोक जाधव (अपक्ष), १४) किशोर गोरख पवार (अपक्ष), १५) बाबासाहेब तात्याराव लगड (अपक्ष ), १६) शिवाजी बाबुराव ठुबे (अपक्ष), १७. गोरख जगन्नाथ इंगळे (अपक्ष), १८) डॉ.सुरेश साहेबराव सोनवणे (अपक्ष)

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४gangapur-acगंगापूरmarathwada regionमराठवाडा महाराष्ट्र विधानसभा निवडणूकSatish Chavanसतीश चव्हाणPrashant Bambप्रशांत बंब