शहरं
Join us  
Trending Stories
1
“बाहेर जाऊन देशाबाबत असे बोलणे शोभत नाहीत, राहुल गांधींचा पासपोर्ट रद्द करावा”: रामदास आठवले
2
“भाजपाचा CM होणार असेल तर देवेंद्र फडणवीस हेच आमच्या मनातील मुख्यमंत्री”: गिरीश महाजन
3
Ganesh Visarjan 2024 Live: पुण्यातील मानाच्या पाचही गणपती बाप्पांचे विसर्जन
4
अमित शाह यांची हरियाणात अग्निवीरांसंदर्भात बडी घोषणा, नोकरीसंदर्भात दिली मोठी गॅरंटी
5
आगामी विधानसभा निवडणूक एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली लढणार; अजित पवार स्पष्टच बोलले
6
PM मोदींना वाढदिवसानिमित्त इटलीतून खास शुभेच्छा; जॉर्जिया मेलोनी काय म्हणाल्या? पाहा...
7
BSNL करणार सर्वांची सुट्टी...? रोज 3 रुपये खर्च, 300 दिवस मजा; अमर्याद डेटा अन् कॉलिंग!
8
IND vs BAN: विराट कोहली मारणार का बांगलादेशला जोरदार 'पंच'? खुणावतायत 'हे' 5 विक्रम
9
अजित पवार नाही, महायुतीत राज ठाकरेंना सोबत घेऊ नका; रामदास आठवलेंचे वक्तव्य
10
डॉक्टरांची मागणी मान्य, ममता बॅनर्जींचा मोठा निर्णय; IPS मनोज कुमारांवर नवी जबाबदारी
11
गणपती बाप्पाच्या लाडूचा 30 लाख रुपयांना लिलाव, भाजप नेत्यानं लावली बोली; काय आहे यात खास?
12
"त्यांची पत्नीसुद्धा निवडून आली नाही", गिरीश महाजनांनी एकनाथ खडसेंना डिवचले
13
"असा जातीयवादी मुख्यमंत्री कधीही झाला नाही", पोलिसांनी रोखताच वाघमारेंची शिंदेंवर टीका
14
मनोज जरांगेंचे पुन्हा उपोषण; प्रफुल्ल पटेल म्हणाले, “मराठा आरक्षणाला विरोध नाही, पण...”
15
CM पद सोडले, आता ‘या’ गोष्टींवर सोडावे लागणार पाणी; अरविंद केजरीवाल यांना किती मिळणार पगार?
16
“गणपती बुद्धीची देवता, सर्वांत जास्त गरज आहे त्यांना बुद्धी द्यावी”: देवेंद्र फडणवीस
17
Asian Champions Trophy 2024 : सिंग इज किंग! चीन झुंजले! पण जुगराजच्या गोलनं भारतानं पाचव्यांदा जिंकली ट्रॉफी
18
आमच्या आदेशाशिवाय कारवाई करू नका; बुलडोझर कारवाईबाबत सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय
19
"महिला डॉक्टरांना नाईट शिफ्ट करण्यापासून रोखू शकत नाही", सर्वोच्च न्यायालयाने फटकारले
20
Exclusive : सेटवर आलेला अनुभव, शाहरुखची प्रतिक्रिया अन् अनिता दाते; सोहम शाहने 'तुंबाड २'बद्दल दिली मोठी हिंट

Chandrashekhar Rao Live: महाराष्ट्रात पाच वर्षांत प्रत्येक घरात पाण्याचा नळ देणार; केसीआर यांचे मोठे आश्वासन

By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2023 8:41 PM

kcr speech live: केसीआर यांची आज छत्रपती संभाजीनगरमध्ये सभा सुरु आहे. यामध्ये त्यांनी महाराष्ट्रातील पाणी, वीज प्रश्नांवर आवाज उठविला.

नद्या वाहणाऱ्या राज्यात मी आलोय. या राज्यात दिवसाला दररोज सहा सात शेतकरी आत्महत्या करत आहेत. पंतप्रधान काय करत आहेत. पाणी आणि वीज या दोन गोष्टी सर्वांनाच लागतात. जेवढे पाणी लागते त्याच्या दुप्पट पाणी भारतात आहे. मग वंचित का आहे. कारण मुख्यमंत्री, पंतप्रधान, नेत्यांची इच्छाशक्ती नाहीय. शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबायला नकोत का, असा सवाल तेलंगानाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी केला आहे. 

केसीआर यांची आज छत्रपती संभाजीनगरमध्ये सभा सुरु आहे. यामध्ये त्यांनी महाराष्ट्रातील पाणी, वीज प्रश्नांवर आवाज उठविला. भारताला परिवर्तन करावे लागेल. एक पक्ष पडला, दुसरा जिंकला याला परिवर्तन नाही म्हणत. अनेक पक्षांना भारताने संधी दिलीय. भारताता जे परिवर्तन यायचे आहे, त्याशिवाय भारत पुढे जाऊ शकत नाही. यासाठीच बीआरएस पक्ष जन्माला आहे. बीआरएस एका धर्मासाठी, जातीसाठी आलेला नाही. सर्वांसाठी आहे. जेव्हा नवीन ताकद येऊ लागते तेव्हा जुन्या ताकदी एकत्र येऊन हल्ला करू लागतात. पोलिसांना मागे लावतात. घाबरायचे नाहीय. आपल्या लढ्यात नेकी आहे तर निश्चितच आपण विजयी होऊ, असे चंद्रशेखर राव म्हणाले. 

बीआरएस पक्षाने नागपूरमध्ये कायमस्वरुपी कार्यालय उघडले आहे. इथेही भाड्याने नाही तर कायमचे कार्यालय स्थापन करणार आहोत. इथे पाणी नाहीय, अकोल्यात नाहीय. पुण्यातून वकील आले ते म्हणाले तिथेही काही ठीक नाहीय. काय चाललेय इथे. पाणी आणि वीज या दोन गोष्टी सर्वांनाच लागतात. नेहरुंच्या काळात काहीतरी योजना बनत होत्या, आता नालायक पक्षांमुळे देश सहन करत आहे. देशात पाणी वापरात आले पाहिजे तर चांगले बंधारे बांधले गेले पाहिजेत. झिम्बाब्बेमध्ये पाणी साठवले जाते. तिथल्यासारखे देशात तीन चार धरणे असायला हवीत. परंतू केले जात नाहीय. नवीन रचना, नवीन कायदे आणले नाहीत तर हे होणार नाहीत. पाण्याला समजण्यासाठी आपला देशा आजही मागे आहे. माणूस पाण्याला बनवू शकत नाही. 

पाण्याचा योग्य वापर करण्याची विद्या अनेक देशांनी आत्मसात केली आहे. यामुळे पाण्यासाठीचे नियोजन बदलायला हवे. महाराष्ट्रात बीआरएस सरकार बनवा, पाच वर्षांत प्रत्येक घरात पाण्याचा नळ देणार. जसे माझ्या राज्यात झालेय. तिथे श्रीमंत व्यक्ती जे पाणी पितो ते गरीबातला गरीब देखील पितो, असे केसीआर म्हणाले.दुसरी बाब म्हणजे वीज. का देत नाहीत मला माहिती नाही. आठ वर्षांपूर्वी तेलंगानातील वीजेची परिस्थिती वाईट होती. तिथे दिवसाला तीन तास वीज मिळायची. आज शेतकऱ्यांना मोफत वीज दिली जातेय. नागरिकांना २४ तास वीज दिली जाते. तेलंगाना छोटे राज्य आहे, महाराष्ट्र मोठे आहे. काय होतेय. कोळसा हवा असतो. देशात एवढा कोळसा आहे की १५० वर्षे देशाला २४ तास वीज मिळेल. हे आकडे माझे नाहीत. खोटे ठरले तर मी आता राजीनामा देईन, असे आव्हान राव यांनी दिले आहे.  

टॅग्स :AurangabadऔरंगाबादK Chandrashekar Raoके चंद्रशेखर राव