औरंगाबाद : मराठवाड्यातील डी. फार्मसीसाठी १०४ महाविद्यालयांतील ७,३२९ जागांसाठी २६ हजार ३४६ जणांनी नोंदणी केली होती. पहिल्या फेरीत २ हजार ३६६ (३२.२८ टक्के) विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केले आहे. तर ४९६३ (६७.७१ टक्के) जागा रिक्त आहेत. दुसऱ्या फेरीत प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना लाॅगिनमधून ऑनलाइन पर्याय भरून अर्ज निश्चिती करण्यासाठी गुरुवारपर्यंत मुदत आहे, अशी माहिती तंत्रशिक्षण सहसंचालक उमेश नागदेवे यांनी दिली.
बारावीचा निकाल जाहीर होऊन तब्बल सहा महिने सरले. अखेर डी. फार्मसीच्या प्रवेशफेऱ्यांचे वेळापत्रक जाहीर झाले. पहिल्या फेरीसाठी ९ डिसेंबर रोजी जागा वाटप जाहीर झाले. अलाॅटमेंट मिळालेल्या विद्यार्थ्यांना १० ते १२ डिसेंबर दरम्यान २,३६६ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चिती केली. त्यानंतर १३ डिसेंबर रोजी दुसऱ्या फेरीसाठी ४,९६३ रिक्त जागांचा तपशील जाहीर झाला.
शुक्रवारी दुपारपर्यंत पर्याय भरण्यासाठी अखेरची मुदत आहे. तात्पुरते जागा वाटप १६ डिसेंबर रोजी जाहीर होईल. १७ ते १९ डिसेंबर दुपारी ३ वाजेपर्यंत जागा स्वीकृती करून प्रवेश निश्चितीसाठी ५ वाजेपर्यंत मुदत आहे. तिसऱ्या फेरीसाठी २० डिसेंबर रोजी रिक्त जागांचा तपशील जाहीर होईल. त्यापूर्वी १९ डिसेंबरपासून शैक्षणिक सत्राला सुरुवात होईल.
औरंगाबादेत प्रवेशाचा टक्का सर्वाधिक कमीपहिल्या फेरीत सर्वाधिक प्रवेशाचा टक्का उस्मानाबाद जिल्ह्यातील असून, तिथे ३९.८५ टक्के, बीड जिल्ह्यात ३८.०२ टक्के, जालना जिल्ह्यात ३५,७७ टक्के, हिंगोली जिल्ह्यात ३५.५ टक्के, नांदेड ३४.४६ टक्के प्रवेश निश्चित झाले. औरंगाबाद जिल्ह्यात सर्वात कमी केवळ २८.२७ टक्के प्रवेश निश्चिती झाली. लातूर जिल्ह्यात २८.६४ टक्के, परभणी जिल्ह्यात २८,८६ टक्के प्रवेश निश्चितीचे प्रमाण कमी आहे.
अशी आहे प्रवेशाची स्थितीजिल्हा - काॅलेज -क्षमता -प्रवेश - रिक्त जागाऔरंगाबाद -२९ -२,०४० -५८३-१,४५७बीड -१४ -९६० -३६५ -५९५हिंगोली -४ -२७६ -९८ -१७८जालना -९ -६१५ -२२० -३९५लातूर - १७ -१,१७३ -३३६ -८३७नांदेड -१३ -८८५ -३०५ -५८०उस्मानाबाद -८ -५५२ -२२० -२३२परभणी -१२ - ८२८ -२३९ -५८९एकूण -७३२९ -२,३६६ -४,९६३