शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

मराठवाड्यात जलयुक्त शिवार योजनेत मुरले २४१७ कोटींचे पाणी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 08, 2022 5:21 PM

३१ मार्च २०१९ रोजी संपलेल्या आर्थिक वर्षात कॅग अहवालात जलयुक्त शिवारच्या कामांचा दर्जा, खर्च, परिणाम यावरून अनेक प्रश्न उपस्थित केल्यानंतर ही योजना संशयाच्या भोवऱ्यात आली.

- विकास राऊतऔरंगाबाद : मराठवाड्यात जलयुक्त शिवार योजनेत विविध कामांवर दोन हजार ४१७ कोटी रुपये खर्च करण्यात आले. २०१५ ते २०१९ पर्यंत ही योजना राबविण्यात आली असून, कॅगने राज्यभरातील कामांवर ताशेरे ओढल्यामुळे विभागात सहा हजार २० गावांत केलेले एक लाख ७४ हजार १६१ कामांमध्ये बनावटगिरी मोठ्या प्रमाणात झाल्याचा संशय बळावत चालला आहे.

३१ मार्च २०१९ रोजी संपलेल्या आर्थिक वर्षात कॅग अहवालात जलयुक्त शिवारच्या कामांचा दर्जा, खर्च, परिणाम यावरून अनेक प्रश्न उपस्थित केल्यानंतर ही योजना संशयाच्या भोवऱ्यात आली. त्या अनुषंगाने राज्य मंत्रिमंडळ बैठकीत जलयुक्त शिवार योजनेतील कामांची खुली चौकशी करण्याबाबत निर्णय झाला. त्या चौकशीसाठी चार सदस्यीय समिती नेमण्यात आली. विभागात मागील चार वर्षांत केलेल्या कामांच्या चौकशीत लाचलुचपत विभाग पुरावे येताच प्रकरणाचा पर्दाफाश करीत आहे. यात बीड आणि औरंगाबादमध्ये काही कामांत बोगसगिरी झाल्याचे समोर आले आहे.

३१ मार्च २०२० पर्यंत औरंगाबाद जलसंधारण विभाग, विभागीय आयुक्तालयाच्या रेकॉर्डनुसार विभागात ९२.२३ टक्के खर्च करून ९४.१८ टक्के कामे झाल्याचे दिसते. मागील सरकारच्या काळातील ही महत्त्वाकांक्षी योजना होती. अनेक कामांत गुत्तेदारांची मर्जी राखली गेल्याचे आरोप झाल्याने महाविकास आघाडी सरकारने जलयुक्त शिवार योजनेतील अपूर्ण असलेल्या चार हजार २५२ कामांसाठी ९८ कोटी ४८ लाख रुपये अनुदान आजवर दिलेच नाही. योजनेच्या कामात अनेक गुत्तेदार हे तत्कालीन मागील सरकारच्या मर्जीतील होते, असे आरोप मागील विरोधी पक्षाने केले होते. त्यामुळे जलयुक्त शिवार योजना झोलयुक्त शिवार योजना म्हणून गणली गेली.

योजनेतून किती पाण्याचा साठाचार वर्षांत ११.१४ टीसीएम पाणीसाठा झाल्याचा दावा रेकॉर्डनुसार दिसतो आहे. २२.२८ लक्ष हेक्टर सिंचन यातून झाल्याचाही दावा करण्यात आला आहे. २०१५ ते २०१९ पर्यंत दरवर्षी ३.३० ते १.५८ टक्के दरम्यान टीसीएम पाणीसाठा निर्माण झाला.वर्ष --- -- गावांंची संख्या----- झालेला खर्च२०१५-१६ -- १६८५-- --             ९६३ कोटी२०१६-१७--- १५१८----             ७९० कोटी२०१७-१८--- १२४८------             ३५२ कोटी२०१८-१९-- १५६९----             ३११ कोटीएकूण--- ६०२०------             २४१७ कोटी

टॅग्स :MarathwadaमराठवाडाAurangabadऔरंगाबादJalyukt Shivarजलयुक्त शिवारfundsनिधी