काँग्रेस बाप आहे, बापच राहणार; नाना पटोले यांचा सणसणीत टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2022 12:10 PM2022-03-28T12:10:17+5:302022-03-28T12:12:41+5:30

Nana Patole News: काँग्रेसच नव्हे, तर सारा देशच आज अडचणीत

In Politics Congress is the father, and reamains the father: Nana Patole | काँग्रेस बाप आहे, बापच राहणार; नाना पटोले यांचा सणसणीत टोला

काँग्रेस बाप आहे, बापच राहणार; नाना पटोले यांचा सणसणीत टोला

googlenewsNext

औरंगाबाद : काँग्रेस वऱ्हाडी नव्हे, तर बाप आहे व बापच राहणार, असा सणसणीत टोला रविवारी प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी भाजपचे खा. सुजय विखे पाटील ( Sujay Vikhe Patil) यांना लगावला. (Nana Patole criticize MP Sujay Vikhe Patil ) 

राष्ट्रवादी नवरा आहे, शिवसेना बायको आहे आणि काँग्रेस वऱ्हाडीच्या भूमिकेत आहे, अशी कॉमेंट नुकतीच सुजय विखे यांनी केली होती. यावर नाना पटोले यांना औरंगाबादेत पत्रकारांनी छेडले असता, काँग्रेस बाप आहे, बापच राहणार, असे पटोले यांनी ठणकावून सांगितले. सुजय विखे नवखे आहेत. त्यांना फार महत्त्व देण्याची गरज नाही, असेही पटोले म्हणाले.

ते म्हणाले, लोकांना काँग्रेस पाहिजे. लवकरच काँग्रेस महागाईविरोधी आंदोलन करणार आहे. भाजपने गरज सरो वैद्य मरो, अशी भूमिका घेतली व देशभरात कृत्रिम महागाई केली. काँग्रेसच नव्हे, तर सारा देशच आज अडचणीत असल्याचे सांगत पटोले म्हणाले, सध्या महाराष्ट्रात भाजपतर्फे जनतेचे मनोरंजन सुरू आहे. पण ते ऐकून ऐकून जनतेचे कान बधीर झालेले आहेत. केवळ भ्रष्टाचाराचे आरोप केले जातात. एकही भ्रष्टाचार सिध्द होत नाही. ‘मातोश्री’ला सध्या बदनाम करण्याचा डाव सुरू आहे. हे राजकारणासाठी भाजप करतंय. यात मुख्यमंत्र्यांनी कुठे हतबलता दाखवली नाही. नारायण राणे आणि कृपाशंकर सिंग यांच्यावर भाजपने भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. तेच पुढे भाजपमध्ये आले, तर पवित्र झाले, अशी ही भाजपची रीत आहे. आता भाजपने हे राजकारण थांबवावे, गुजरात पॅटर्न बंद करावा, असे आवाहन नानाभाऊंनी केले.

एमआयएमने आम्हाला प्रस्ताव दिला नाही, असे सांगत, संजय राऊत त्यांच्याकडे कोणता कव्हर ड्राईव्ह आहे, हे मला माहीत नाही, असे ते म्हणाले.

Web Title: In Politics Congress is the father, and reamains the father: Nana Patole

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.