छत्रपती संभाजीनगर : सातारा देवळाई परिसरात सध्या पाण्याची टंचाई अधिक जाणवू लागली आहे. परिसरात टॅंक़रची संख्या वाढली असून त्याचे दरही वाढले आहेत. २००० लिटरच्या टॅंक़रपासून तब्बल २० हजार लिटरच्या जम्बो टॅंक़रची मागणीही वाढली आहे. या भागातील बहुतांश भागात टॅंकरच्या फेऱ्या ॲडव्हान्स बुकिंग वाढले आहेत.
या परिसरात २००० लिटरसाठी अधिक मागणी आहे. यासाठी ३५० रुपये आणि अंतर दूर असेल तर ४०० रुपये सर्रास घेतले जात आहेत. खासगी टँकरवाल्यांचे २००० लिटर ३५० ते ४०० रुपये, ५००० लिटर टँकर ६०० रुपये अंतर पाहून पैसे वाढवले जात आहेत. १० हजार लिटर १२०० आणि २२ हजार लिटर पाणी चक्क २५०० रुपयांना विकले जाते. उन्हाचा उकाडा वाढल्याने जनतेला पाण्याची सोय मनपाने अजून पूर्ण केलेली नाही काम सुरू आहे; परंतु सध्या तरी जनतेला पाण्यासाठी हाल सहन करावा लागत आहे.
शहरातही टँकरच्या फेऱ्यापिण्यासाठी जारचे पाणी उपयोगात आणले जाते. एका कुटुंबात दररोज एक ते दोन जार आवश्यकतेनुसार घेतले जातात; परंतु वापरासाठी तर टँकरचेच पाणी विकत घेतले जात आहे. हा अधिकचा भुर्दंड शहरवासीयांनाही सहन करावा लागत आहे.- आरबाज पटेल
विहिरीत टँकरची संख्या वाढवासातारा-देवळाई विहिरीत महापालिका टँकरने पाणीपुरवठा करते; परंतु सध्या नागरिकांना पाणी मिळण्यासाठी खूप उशीर होतो. त्यामुळे खासगी टँकर किंवा जारचे पाणी विकत घ्यावे लागते. महापालिकेने टँकरची संख्या वाढविण्याची गरज आहे.- अनिल जाधव