शहरं
Join us  
Trending Stories
1
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
2
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
3
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
4
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
5
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
6
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
7
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
8
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
9
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
10
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
11
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
12
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
13
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
14
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
15
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
16
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: धडधड वाढते ठोक्यात! 'महानिकाला'ला उरले काही तास; राजकीय नेत्यांची आकडेमोड, प्रशासनाचा 'ॲक्शन मोड'
17
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
18
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
19
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
20
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली

सात महिन्यांत छत्रपती संभाजीनगर शहर अन् जिल्ह्यात १७९ चिमुकल्या पडल्या अत्याचाराला बळी

By सुमित डोळे | Published: August 28, 2024 8:11 PM

दिवसाला सरासरी पाच महिलांसोबत आक्षेपार्ह कृत्याच्या घटना

छत्रपती संभाजीनगर : देशभरात महिला सुरक्षा व अत्याचाराच्या घटनांमुळे संताप व्यक्त होत आहे. मात्र, एकट्या छत्रपती संभाजीनगर जिल्हा व शहरात मिळून गेल्या ७ महिन्यांत तब्बल १७९ अल्पवयीन मुली पुरुषांच्या अत्याचाराला बळी पडल्या आहेत. त्याव्यतिरिक्त दिवसाला सरासरी ५ महिलांसोबत आक्षेपार्ह कृत्याच्या घटना घडत असल्याची धक्कादायक बाब पोलिस अहवालातून समोर आली आहे.

कोलकाता आणि बदलापूर येथील अत्याचाराच्या घटनांनी संपूर्ण देश हादरून गेला. कन्नड तालुक्यात नुकतेच एका आश्रमात १३ वर्षांच्या दोन मुलींवर अत्याचार झाल्याची घटना उघडकीस आली. शहरात एका रिक्षाचालकाने अल्पवयीन विद्यार्थिनीसमोरच पँट काढून अश्लील कृत्य केल्याने पुन्हा एकदा महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला. अत्याचार, विनयभंगाला अल्पवयीन मुली बळी पडण्याच्या घटना सातत्याने वाढत असल्याने मुंबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्र पोलिसांना फटकारलं आहे. लोकांनी आवाज उठवल्यावरच कारवाई करणार का? असा प्रश्न उपस्थित करत पोलिसांच्या ब्रीदवाक्याची आठवण करून देण्याची गरज असल्याची टिपण्णीदेखील न्यायालयाने केली.

सात महिन्यांतील आकडेवारी काय सांगते?जिल्हागुन्ह्यांचे स्वरूप - दाखल गुन्हेबलात्कार - २५विनयभंग - १७२बलात्कार (अल्पवयीन मुलींसोबत) - ६०विनयभंग (अल्पवयीन मुलींसोबत) - ३३

शहरबलात्कार - ७०विनयभंग - १५६

बलात्कार (अल्पवयीन मुलींसोबत) - ३९विनयभंग (अल्पवयीन मुलींसोबत) - ४७

तीन वर्षांत पोक्सो गुन्ह्यांत मोठी वाढगुन्हा             - २०२१ २०२२ २०२३बलात्कार - १०० -९९ - १०२विनयभंग - २२१ - २९२ - ३६९

कौटुंबिक छळात महिलांचा बळीएकीकडे आर्थिक स्थैर्य आले असताना कौटुंबिक कलहात कमालीची वाढ होत आहे. यात महिलांना अन्याय सहन करावा लागतोय. गेल्या तीन वर्षांत शहर व जिल्ह्यात पती-पत्नीच्या वादाच्या ५,२१३ तक्रारी प्राप्त झाल्या. यापैकी केवळ १,१९९ दाम्पत्यांमध्ये समेट झाला. उर्वरित सर्व प्रकरणात महिलांना न्यायालय, पोलिस ठाण्यांचा दरवाजा ठोठावण्याची वेळ आली. शहराच्या तुलनेत ग्रामीण भागात कौटुंबिक छळाच्या तक्रारींची संख्या तुलनेने कमी होती. मात्र, दीड वर्षात हेच प्रमाण कमालीचे वाढले. जानेवारी २०२३ ते मे २०२४ दरम्यान कौटुंबिक वादाच्या ५६८ तक्रारी प्राप्त झाल्या.

ढासळती मूल्यव्यवस्था कारणीभूतअत्याचारासारख्या वाढत्या घटना ढासळत चालेल्या मूल्यवस्थेचे लक्षण आहे. माणसांवर नातेसंबंध, समाजाचा प्रभाव कमी होत आहे. सिनेमा, नव्याने आलेला वेब सिरीजचा घसरलेल्या दर्जाचा तरुण पिढीवर वाईट परिणाम होतोय. कोणालाही नीतिमत्ता राहिली नाही. आदर्शांचा मोठा अभाव या पिढीमध्ये आहे. पूर्वीप्रमाणे कायदा, पोलिसांचा धाक राहिला नाही. येथे प्रत्येक जण स्वकेंद्री, व्यक्तिवादी झालाय. यावर गांभीर्याने विचार होणे गरजेचे आहे.-डॉ. स्मिता अवचार, समाजशास्त्र अभ्यासक

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबाद