शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीत महायुती अन् मविआला बंडखोरीची धास्ती; १९९५ ची पुनरावृत्ती होण्याची भीती
2
"मनोज जरांगे जिथे जिथे सभेला..."; लक्ष्मण हाकेंनी थोपटले दंड; विधानसभेचा प्लॅन काय?
3
जनताच न्याय करणार, मशाल धगधगणार; निवडणूक जाहीर होताच आदित्य ठाकरेंनी फुंकलं रणशिंग!
4
भारताच्या ५ विमानांना बॉम्बने उडवण्याच्या धमक्या, अयोध्येसह या ठिकाणी आपातकालीन लँडिंग, सुरक्षा यंत्रणा सतर्क  
5
'एक्झिट पोलमुळे मतदारांमध्ये गोंधळ अन् चुकीच्या अपेक्षा' निवडणूक आयुक्तांचा माध्यमांना सल्ला
6
निवडणुकीत 'पिपाणी' वाजणार, पण...; शरद पवार गटाच्या आक्षेपावर निवडणूक आयोगाची भूमिका
7
IND vs NZ : कसा आहे दोन्ही संघातील रेकॉर्ड? टीम इंडियाला नडण्याची ताकद किवींमध्ये कधीच नाही दिसली!
8
पाकिस्तानच्या कामरान गुलामचे अश्विनने केलं कौतुक, म्हणाला- "तो वादळात आला अन्..."
9
"निवडणूक एका टप्प्यात, आता ते सुद्धा एकाच टप्प्यात...", जयंत पाटलांचा महायुतीला टोला
10
…म्हणून अयोध्येतील मिल्कीपूर विधानसभेच्या पोटनिवडणुकीची झाली नाही घोषणा, समोर आलं असं कारण
11
Video: विराट कोहलीचा भन्नाट झेल! न्यूझीलंड विरूद्धच्या मालिकेआधी नेट प्रक्टिसमध्ये केली कमाल
12
70 हजार रुपयांपेक्षा स्वस्त असलेल्या बाईक आणि स्कूटर... दिवाळीपूर्वी खरेदी करण्याचा बेस्ट ऑप्शन!
13
रश्मी शुक्लांना निवडणूक आयोग हटवणार का?; निवडणूक आयुक्त राजीव कुमार म्हणाले...
14
पेजर हॅक केलं जाऊ शकतं, मग ईव्हीएम का नाही? मुख्य निवडणूक आयुक्त म्हणाले...
15
Maharashtra Vidhan Sabha Election Date: महाराष्ट्राच्या महासंग्रामाचा शंखनाद! विधानसभा निवडणूक एकाच टप्प्यात; २० नोव्हेंबरला मतदान, तर निकाल...
16
कोण होणार भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष?; निवडणुकीसाठी बनवली समिती, जाणून घ्या प्रक्रिया
17
"तुमचा सुपडा साफ केल्याशिवाय..."; फडणवीसांचं नाव घेत मनोज जरांगे काय बोलले?
18
या गंभीर आजाराने ग्रस्त आहे आलिया भट, खुद्द स्वतःच 'जिगरा' स्टारने केला खुलासा
19
Kamran Ghulam चा शतकी नजराणा! पदार्पणात असा पराक्रम करणारा पाकचा दुसरा वयस्क बॅटर
20
'इन्फ्लुएन्सर्स' हा नवा आजार आला आहे...अभिनेत्री सीमा पाहवा भडकल्या; ही कोणाची चूक?

सहा दशकांत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याची लोकसंख्या ४० लाखांच्या दिशेने...

By विकास राऊत | Published: April 20, 2023 3:42 PM

सहा जनगणना : औद्योगिकरणानंतर शहरी लोकसंख्येचा टक्का वाढला

छत्रपती संभाजीनगर : भारत जगात लोकसंख्येच्या तुलनेत पहिल्या क्रमांकावर आला असून, जिल्ह्यातील लोकसंख्या वृध्दीचाही त्यात खारीचा वाटा आहे. सहा दशकांत जिल्ह्याची लोकसंख्या ४० लाखांच्या दिशेने चालली आहे. १९९० च्या दशकातील औद्योगिकरणानंतर शहरी लोकसंख्येचा टक्का वाढत गेला आहे. १९६१ ते २०११ पर्यंत सहावेळा जनगणना झाली असून, सातवी जनगणना झाल्यानंतर जिल्हा निश्चितपणे ४० लाखांची पायरी ओलांडेल. १९५१ साली १० लाखांच्या आसपास जिल्ह्याची लाेकसंख्या होती. जालना जिल्ह्याची निर्मिती १९८१ साली झाल्यानंतर जिल्ह्यातील ग्रामीण लोकसंख्येच्या आकड्यात बदल झाले. १९९१ ते २०११ पर्यंतच्या जनगणनेनुसार जिल्ह्यातील लोकसंख्या वृध्दीचा दर वाढत गेला.

जिल्ह्याच्या पूर्वेकडील तालुका असलेला जालना १ मे १९८१ रोजी जिल्हा म्हणून स्थापित झाला. छत्रपती संभाजीनगरच्या हद्दीत असलेले जालना, भोकरदन, जाफ्राबाद, अंबड तालुक्यांसह परभणीतील दोन तालुके मिळून हा जिल्हा झाल्यानंतर लोकसंख्येचे विभाजन झाले.

जनगणना वर्ष------लोकसंख्या१९६१------------ग्रामीण---१३ लाख १५ हजार ६३०

                        शहरी----२ लाख १६ हजार ७११                        एकूण --१५ लाख ३२ हजार ३४२

१९७१------------ग्रामीण--१० लाख २४ हजार ८६२

                        शहरी----३ लाख ७६ हजार ७१२                        एकूण--१४ लाख १ हजार ५७४

१९८१------------ग्रामीण--११ लाख ८१ हजार ७६६

                        शहरी----३ लाख ९४ हजार ३७८                        एकूण--१५ लाख ८१ हजार ७६६

१९९१------------ग्रामीण--१४ लाख ८८ हजार ६३६

                        शहरी----७ लाख २५ हजार १४३                        एकूण--२२ लाख १३ हजार ७७९

२००१------------ग्रामीण--१८ लाख ९ हजार ८६३

                        शहरी----१० लाख ८७ हजार १५०                        एकूण---२८ लाख ९७ हजार १३

२०११------------ग्रामीण--२० लाख ८१ हजार ११२

                        शहरी----१६ लाख २० हजार १७०                        एकूण--३७ लाख १ हजार २८२

१ लाख ४७ हजार ६५६ महिलांची संख्या कमी----जिल्ह्याची एकूण लोकसंख्या सध्या ३७ लाख १ हजार २८२ इतकी आहे. यात १९ लाख २४ हजार ४६९ पुरुष, तर १७ लाख ७६ हजार ८१३ महिलांची संख्या आहे. एकूण लोकसंख्येत १ लाख ४७ हजार ६५६ महिलांची संख्या कमी आहे.

१९७१ सालानंतर नागरीकरण वाढले...१९७१ सालानंतर नागरीकरण वाढले. शहराची लाेकसंख्या ७८.८३ टक्क्यांनी वाढली. १९८१ ला ते प्रमाण घटून ५ टक्क्यांवर आले. त्यानंतर १९९१ साली ८३ टक्क्यांनी शहरी लोकसंख्या वाढली. २००१ व २०११ सालच्या जनगणनेत ४९ टक्क्यांची वाढ शहरी लाेकसंख्येत असल्याचे आढळून आले. दशवार्षिक लाेकसंख्या वाढीचा दर २७.७६ टक्के राहिला आहे.

राज्याच्या लोकसंख्येत ३.२ टक्के वाटा..जिल्ह्याच्या लोकसंख्येचा राज्याच्या लोकसंख्येत ३.२ टक्के वाटा आहे. राज्य लोकसंख्या घनतेचा दर प्रती चौरस कि.मी.३६५ व्यक्ती असून, जिल्ह्याची लोकसंख्या घनता प्रती चौ.कि.मी.मागे ३६६ व्यक्ती प्रमाणात आहे. ७९.२ टक्के जिल्ह्याचे साक्षरता प्रमाण आहे.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबाद