सिल्लोड: जालना जिल्ह्यातील मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी सिल्लोड तालुक्यातील सकल मराठा समाजाच्या २५ ते ३० युवकांनी सिल्लोड शहरातून मंगळवारी दुपारी अर्धनग्न आत्मक्लेश पायी यात्रा काढली आहे. ही अर्धनग्न यात्रा थेट अंतरवाली सराटी येथे जाणार असून आंदोलकांना समर्थन देणार आहे.
मराठा समाजाच्या मागण्या मान्य कराव्या मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देऊन शिक्षण व नौकरी त आरक्षण द्यावे अशा घोषणा देऊन यात्रेला सुरुवात केली. ही यात्रा टाकळी कोलते, बदनापूर, रोयलागड मार्गे अंतरवाली सराटी येथे पोहचेल. येथील आंदोलनास ते पाठिंबा देऊन सहभागी होतील. या यात्रेत मारोती पाटील वराडे, भगवान वराडे, गणेश वराडे, दादाराव समिंद्रे, विलास फरकाडे ,नाना तुपे, सुनील सनांसे, मोहन गायकवाड प्रमोद दौड, भारत दौड,भगवान दळवी,अक्षय वराडे, युवराज वराडे, यांच्यासह २५ ते ३० आंदोलक सहभागी झाले आहे.
यावेळी मराठा क्रांती मोर्चाचे मुख्य समन्वयक डॉ. निलेश मीरकर, डॉ.शेखर दौड,विट्ठल सपकाल, शंकरराव खांडवे, डॉ.संतोष शिंदे,आशीष गोराडे,पंकज गोराडे,विशाल जाधव,अर्जुन गाढे,दुर्गेश जायसवाल, बंटी शिंदे यांनी त्यांचे स्वागत केले.