औरंगाबाद : औरंगाबाद विभागाचा दहावीचा निकाल हा ९६.३३ टक्के लागला आहे. बारावी बोर्ड परीक्षाप्रमाणे दहावीतही मुलींनीच निकालात बाजी मारली आहे. ९७.५२ टक्के विद्यार्थींनी उत्तीर्ण झाल्या आहेत. तर विभातील १८ विद्यार्थ्यांना १०० टक्के गुण मिळाले आहेत.
औरंगाबाद विभागात ८५ हजार ५३३ विद्यार्थ्यांनी ७५ टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळविले. तर एकूण ५८ हजार ४४३ विद्यार्थ्यांनी ६० टक्क्यांहून अधिक गुण मिळविले. १८ विद्यार्थ्यांनी १०० टक्के गुण मिळवले आहेत. २३ हजार १०७ विद्यार्थ्यांनी ४५ टक्क्यांपुढील गुण मिळविले. तसेच ३ हजार ७५८ विद्यार्थ्यांनी ३५ टक्क्यांहून अधिक गुण मिळविले. दहावीतही मुलींनीच बाजी मारली आहे. ९७.५२ टक्के विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या आहेत.
राज्यातील निकालाची ठळक वैशिष्ट्येया परीक्षेस राज्यातील पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमधून एकूण १५,८४,७९० नियमित विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी १५,६८,९७७ विद्यार्थी प्रविष्ट झाले असून त्यापैकी १५,२१,००३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत व उत्तीर्णतेची टक्केवारी ९६.९४ आहे. या परीक्षेस राज्यातील नऊ विभागीय मंडळामधून एकूण ५४,१५९ पुनर्परिक्षार्थी विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ५२.३५१ विद्यार्थी प्रविष्ट झाले असून त्यापैकी ४१,३९० विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत व त्यांची एकूण उत्तीर्णतेची टक्केवारी ७९.०६ आहे. विद्यार्थ्यांना विषयनिहाय गुण संकेतस्थळांवरून उपलब्ध होतील, निकालाची प्रत (प्रिंट) देखील घेता येईल. पुनर्मूल्यांकनासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरून करण्यासाठी प्रथम उत्तरपत्रिकेची छायाप्रत घेणे आवश्यक आहे. त्यानंतर पाच दिवसांत शुल्क जमा करून ऑनलाईन अर्ज करणे बंधनकारक आहे.
कुठे पाहता येईल निकाल?mahresult.nic.insscresult.mkcl.orgssc.mahresults.org.in
विभागानुसार लागलेले निकाल टक्केवारीपुणे: 96.96%नागपूर: 97%औरंगाबाद: 96.33%मुंबई: 96.94%कोल्हापूर: 98.50%अमरावती: 96.81 %नाशिक: 95.90% लातूर: 97.27% कोकण: 99.27%