शहरं
Join us  
Trending Stories
1
यासीन मलिकच्या पत्नीचं राहुल गांधींना पत्र; "जम्मू काश्मीरातील शांततेसाठी..."
2
१२ बेरोजगार तरुणांच्या खात्यात अचानक १२५ कोटींची उलाढाल, नाशिकमध्ये काय घडलं?
3
"जे मविआच्या उमेदवारांविरोधात उभे, त्यांना..."; काँग्रेसने बंडखोरांबद्दल घेतला निर्णय
4
सलमाननंतर आता शाहरुख खानला जीवे मारण्याची धमकी; पोलिसांनी कॉल केला ट्रेस
5
"मला धमकावलं जातंय...", साक्षी मलिकचं PM मोदींना कुस्ती वाचवण्याचं आवाहन
6
सदाभाऊंना कुत्रा म्हणणाऱ्या संजय राऊतांना नितेश राणेंनी दिली अशी उपमा, म्हणाले... 
7
विरोध डावलून नवाब मलिकांना उमेदवारी दिली, आता प्रचारही करणार का? अजित पवारांचे सूचक विधान
8
धनंजय मुंडे यांच्या संगनमताने करोडोची जमीन अल्प किंमतीत विकून फसविले: सारंगी महाजन
9
Maharashtra Election 2024: देवेंद्र फडणवीस, बावनकुळेंसह दिग्गजांची परीक्षा! काँग्रेसचे आव्हान कसे पेलणार?
10
सदाभाऊ खोतांच्या विधानावर संजय राऊतांचा संताप; देवेंद्र फडणवीसांवर टीका करत म्हणाले...
11
बस चालवताना ड्रायव्हरला आला हार्ट अटॅक; कंडक्टरच्या प्रसंगावधानामुळे वाचला प्रवाशांचा जीव
12
"प्रमोद महाजनांच्या हत्येमागं मोठं षडयंत्र, दोन्ही भावांमध्ये भांडण नव्हतं"; पूनम महाजनांचे मोठं वक्तव्य
13
"त्रेता युगात इस्लाम नावाची कुठली वस्तूच या पृथ्वीवर नव्हती..."; अमरावतीत काय म्हणाले योगी आदित्यनाथ?
14
अजय देवगण अन् 'भूल भूलैय्या ३'च्या दिग्दर्शकाचा १० वर्ष रखडलेला सिनेमा, 'नाम'ला अखेर मिळाली रिलीज डेट
15
श्रेयस अय्यरचे द्विशतक! मुंबईचा संकटमोचक सुस्साट; अजिंक्य रहाणेच्या संघाने धावांचा डोंगर उभारला
16
२०१९ मधील वचननामा, संकल्पपत्र, जाहीरनामा; किती घोषणा पूर्ण झाल्या? तुम्हीच ठरवा
17
"जिवंत राहिले तर जरूर कोर्टात जाईन", वॉरंट मिळाल्यानंतर प्रज्ञा सिंह ठाकूर यांची पोस्ट!
18
ODI मॅचमध्ये गल्ली क्रिकेटमधील सीन; कॅप्टनसोबत भांडण अन् गोलंदाजानं सोडलं मैदान (VIDEO)
19
Bigg Boss 18: 'वीकेंड का वार'मध्ये दिसणार नाही भाईजान, सलमानच्या जागी 'हे' दोन सेलिब्रिटी असणार होस्ट
20
Chitra Wagh : “राहुल गांधी तुम्हाला संविधान म्हणजे पोरखेळ वाटला का?”; भाजपाच्या चित्रा वाघ यांचा संतप्त सवाल

नादुरुस्तीमुळे अनेक बसेसचे आगारातच; कामावर हजर होऊनही अनेक चालक-वाहक बसूनच

By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2022 5:52 PM

बस दुरुस्त करणारे कर्मचारीही संपात असल्याने अनेक बसगाड्यांची दुरुस्ती होऊ शकली नाही.

- संतोष हिरेमठऔरंगाबाद : जिल्ह्यात तब्बल पाच महिन्यांच्या संपानंतर एसटी बस आता मोठ्या संख्येने धावत आहेत. परंतु, बस नादुरुस्त होण्याची मोठी अडचण ‘एसटी’समोर येऊ लागली आहे. कामावर हजर होऊनही बसगाड्यांअभावी दिवसभर आगाराच्या प्रवेशद्वारासमोर बसून राहण्याची वेळ येत असल्याचे काही चालक-वाहकांनी सांगितले.

औरंगाबाद जिल्ह्यातील एसटी कर्मचारी ८ नोव्हेंबरपासून संपावर गेले होते. त्यामुळे जिल्ह्यातील ५३६ बसेसची चाके थांबली होती. काही दिवसानंतर संपातून बाहेर पडत काही चालक-वाहक आणि खासगी चालकांच्या मदतीने बससेवा सुरू झाली होती. परंतु, तरीही ५० टक्क्यांवर बस पाच महिने आगारातच उभ्या होत्या. बस दुरुस्त करणारे कर्मचारीही संपात असल्याने अनेक बसगाड्यांची दुरुस्ती होऊ शकली नाही. उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर आता मोठ्या संख्येने कर्मचारी कामावर परतले आहेत. परंतु, त्यांना कर्तव्यासाठी बसच मिळत नाही. आता बसगाड्यांची दुरुस्ती युद्धपातळीवर सुरू असल्याचे सांगितले जात आहे.४२५ बसच्या फेऱ्याजिल्ह्यातील ४२५ बस बुधवारी रस्त्यावर धावल्या. तब्बल पाच महिन्यांनंतर बसगाड्यांची संख्या वाढली आहे. आगामी काही दिवसात बसगाड्या आणि फेऱ्या आणखी वाढतील.

४० बस नादुरुस्तएकट्या मध्यवर्ती बसस्थानकातील जवळपास ४० बसगाड्या नादुरुस्त आहेत. अशीच स्थिती इतर आगारांमध्ये आहे. बस नादुरुस्त झाल्यामुळे प्रवेशद्वारासमोर बसून राहण्याची वेळ चालक-वाहकांवर ओढावली आहे. ही परिस्थिती दूर होण्यासाठी युद्धपातळीवर काम केले जात आहे.

काही बसचे इंजिन, तर काहीच्या बॅटरी खराबअनेक दिवस बस जागेवरच उभ्या राहिल्याने ऑईलची गळती होऊन इंजिन खराब होणे, बॅटरी उतरण्यासह टायर खराब झाले आहेत. शिवशाही बसमधील एसी बंद पडले आहेत. त्यातच सुटे भाग उपलब्ध नसल्यानेही दुरुस्तीअभावी बस जागेवरच उभ्या आहेत. संपापूर्वी नियमित देखभाल-दुरुस्तीसाठी आलेल्या बसही पाच महिने तशाच उभ्या राहिल्या.

न्यायालयाच्या निर्णयानंतर ११२१ कर्मचारी कामावर परतलेजिल्ह्यात एकूण २,६१३ कर्मचारी आहेत. यातील २,४५५ कर्मचारी कामावर हजर झाले आहेत. आजघडीला १५८ कर्मचारी गैरहजर आहेत. हे कर्मचारी शुक्रवारपर्यंत हजर होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर १,१२१ कर्मचारी कामावर परतले आहेत.

बसगाड्यांची दुरुस्ती सुरूपाच महिन्यांपासून बस जागेवर उभ्या आहेत. काही बस नादुरुस्त आहेत. त्यांची दुरुस्ती युद्धपातळीवर हाती घेण्यात आली आहे. आगामी दोन दिवसात दुरुस्ती पूर्ण होऊन बसगाड्यांची संख्या वाढेल.- संतोष घाणे, आगार व्यवस्थापक, मध्यवर्ती बसस्थानक

कोणत्या आगारात किती बस?सिडको बसस्थानक - ९०मध्यवर्ती बसस्थानक - १४४पैठण - ६२सिल्लोड - ५८वैजापूर - ५३कन्नड - ४५गंगापूर - ४८सोयगाव - ३६

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादstate transportएसटी