लातूर : अहमदपूर तालुक्यातील शेणी येथील एका अपंग वृध्द शेतकऱ्याची बनावट कागदपत्रांच्या आधारे तीन एकर जमीन हडप करणाऱ्या सावकाराविरोधात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सोमवारपासून आमरण उपोषणास सुरुवात करण्यात आली आहे.शेणी येथील नागू बेले या अपंग वृध्द शेतकऱ्याची वडीलोपार्जित शेतजमीन गावातील एका सावकाराने परस्पर बनावट कागदपत्राच्या आधारे तीन एकर जमीन हडप केली आहे. या प्रकरणी निबंधकांना अनेकदा निवेदन देण्यात आले. मात्र कुठलाही कारवाई करण्यात आली नाही. सावकाराने हडप केलेली जमीन आपल्याला परत मिळावी, सावकारावर प्रशासनाकडून कारवाई करण्यात यावी या प्रमुख मागणीसाठी सोमवारपासून माधव बेले हे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अमरण उपोषणास बसले आहेत. यावेळी रामकुमार रायवाडीकर, गणपतराव तेलंगे, संजय व्यवहारे, अंगद कांबळे, शाम वरयानी, प्रा. दिनकर कांबळे, हर्षवर्धन सवई, प्रविण चिकाटे, रामदास ससाणे, बाबुराव झाकडे, बाबुराव बेडदे, दत्ता बेले, लिंबराज गवळी आदींची उपस्थिती होती. (प्रतिनिधी)
‘त्या’ सावकाराविरोधात बेमुदत उपोषण
By admin | Published: March 15, 2016 12:20 AM