प्रमुख पाहुणे म्हणून मल्टिपल चेअरमन ला. विवेक अभ्यंकर यांनी मार्गदर्शन केले. माजी अध्यक्षा ला. उषा नागपाल अध्यक्षस्थानी होत्या. नूतन अध्यक्षा झांबड यांनी दहा हजार झाडे लावण्याचा संकल्प जाहीर केला. उषा नागपाल यांनी त्यांच्या कार्यकाळात उत्तम कामगिरी करणाऱ्यांचा ट्राॅफी देऊन सत्कार केला. ध्वजवंदना सतीश अग्रवाल तर स्वागतगीत रश्मी झांबड यांनी म्हटले. मागील वर्षाचा आढावा मावळत्या सचिव माधुरी चौधरी यांनी दिला. पाहुण्यांचा परिचय भगवानदास काब्रा व मयुर जालनावाला यांनी दिला. महेंद्र चौधरी यांनी आभार प्रदर्शन मानले. मालपानी यांच्या हस्ते सुनीला क्षत्रिय यांना इंटरनॅशनल पिन प्रदान करण्यात आली. डाॅ. शेख मुर्तुजा व काब्रा यांनी सूत्रसंचालन केले.
माजी आमदार सुभाष झांबड, ला. तनसुख झांबड, राजेश भारूका, गौरव मालपानी, ला. राजेश राऊत, जगन्नाथ काळे, ला. राहुल औसेकर, ला. मिलिंद दामोदरे, मनसुख झांबड, ला. विशाल लदनिया, ला. पारस ओसवाल, ला. आर.एस. रखवाल, मिठालाल कांकरीया, मदनलाल लोंढा, ला. कश्मीर नागपाल, ला. डाॅ. नारायण डाले, यांची प्रमुख उपस्थिती होती.