लोकमत न्यूज नेटवर्कचारठाणा : जिंतूर तालुक्यातील चारठाणा येथील जिल्हा परिषद उर्दू शाळेत आ़विजय भांबळे यांच्या हस्ते १५ जुलै रोजी ई-लर्निंग कक्षाचे उद्घाटन करण्यात आले़ अध्यक्षस्थांनी सरपंच बी़जी़ चव्हाण तर प्रमुख पाहुणे म्हणून राकाँ ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष नानासाहेब राऊत, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष सय्यद दाऊद अली, मधुकर भवाळे, कासीम इनामदार, सलीमोद्दीन काजी, सुधाकर जाधव, सय्यद अख्तर, एकबालोद्दीन काजी, मुख्याध्यापक टी़जी़ साबळे, विष्णू वानखरे, तहसीन देशमुख, जलील इनामदार, आसाराम घाटूळ, नाना निकाळजे, सय्यद मुस्ताक अहेमद, सय्यद हामेदअली, शेख सादेक, सय्यद इम्रान, उमरीकर आदींची उपस्थिती होती़ यावेळी आ़विज भांबळे म्हणाले, जिल्ह्यातील उर्दू माध्यमाची ई-लर्निंग होणारी ही पहिली शाळा आहे़ विद्यार्थ्यांनी शिक्षण घेऊन उच्च पदावर नोकरी करावी व चारठाण्याचे नाव उज्ज्वल करावे़ आजच्या युगात शिक्षणाशिवाय पर्याय नसल्याचे आ़भांबळे यांनी सांगितले़ शेख एकबाल यांनी सूत्रसंचालन केले़ यावेळी विद्यार्थी, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते़
ई-लर्निंग कक्षाचे उद्घाटन
By admin | Published: July 17, 2017 12:10 AM