शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही मंगळावर जा, तेथे ना EC आहे ना EVM...!"; संबित पात्रा यांनी कुणाची खिल्ली उडवली?
2
94 वर्षांच्या उद्योगपतीनं दान केले ₹10000Cr...; सांगितलं, मृत्यूनंतर अब्जावधीच्या संपत्तीच काय होणार? कोण असणार उत्तराधिकारी?
3
"अनेक राजे-महाराजे आले आणि गेले, पण…"; अजमेर शरीफसंदर्भात कोर्टाची नोटीस, PM मोदींवर भडकले ओवेसी
4
"सच्चा शिवसैनिक..., आज मोठा गैरसमज त्यांनी दूर करून टाकला"; केसरकर यांच्याकडून CM शिंदेंचं मुक्त कंठानं कौतुक
5
एकनाथ शिंदेंची स्पष्ट भूमिका, भाजपाचा CM होण्याचा मार्ग मोकळा; फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
6
हिवाळी अधिवेशनात गदारोळ: अदानी समूहाच्या मुद्द्यावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी
7
₹35 चा शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणूकदारांची झुंबड, दुसऱ्या दिवशीही लागलं अप्पर सर्किट
8
ISRO ने हाती घेतली नवीन मोहिम; भारताचे यान थेट शुक्र ग्रहावर जाणार, सर्व गुपिते उघड होणार...
9
अजमेर दर्ग्यात शिव मंदिर? न्यायालयानं याचिका स्वीकारली, सर्व पक्षकारांना नोटीस पाठवली!
10
IND vs AUS : Rohit Sharma ला दुसऱ्या कसोटीत मोठी संधी, Virat Kohli शी साधणार बरोबरी? पाहा खास आकडेवारी
11
हिवाळी अधिवेशनात वक्फ दुरुस्ती विधेयक मांडले जाणार नाही; कारण काय? जाणून घ्या...
12
विजय शंकरचा जबरदस्त थ्रो! हार्दिक पांड्याच्या तुफानी खेळीला लागला ब्रेक, पण... (VIDEO)
13
IPL मध्ये लागली ३० लाखांची बोली अन् पुढच्याच सामन्यात Arjun Tendulkar ने केली खराब कामगिरी, संघाच्याही पराभवाची हॅटट्रिक
14
३० तारखेपर्यंत शपथविधी व्हायला हवा, अडीच वर्षांपूर्वीची परिस्थिती वेगळी, आताची वेगळी; अजित पवारांचे मुख्यमंत्रीपदावर वक्तव्य
15
काँग्रेसचे ठरले! ‘मतपत्रिकेवर निवडणुकी’साठी ‘भारत जोडो’सारखी राहुल गांधींची देशव्यापी यात्रा
16
नव्या सरकारमध्ये तुमचे स्थान काय असेल? उपमुख्यमंत्री की गृहमंत्री? एकनाथ शिंदेंचे सूचक विधान
17
बागेश्वर बाबासमोर 'द ग्रेट खली'नं साधूला केसाने पकडून एका हातात उचलले, व्हिडिओ व्हायरल...
18
'मिटकरींनी पक्षाचे आमदार असूनही पक्षविरोधी भूमिका घेतली...'; पार्थ पवारांचे धक्कादायक ट्विट
19
“मी मोदींना फोन केला, म्हटलं माझा कुठलाही अडसर नसेल!”; एकनाथ शिंदेंनी CM पदावरचा दावा सोडला
20
भरघोस पगार वाढ! IPL मध्ये या चौघांना मिळालं कोहलीपेक्षाही तगडं पॅकेज

२८ एकराचे उत्पन्न मोडले...परी मोडला नाही कणा़़!

By admin | Published: December 11, 2014 12:31 AM

चेतन धनुरे , उदगीर वंश परंपरेने चालत आलेली २८ एकर शेती़़़ शेतात २ विहिरी व २ बोअऱ़़ कष्टाने फुलवलेला भाजीपाला अन् ऊस़़़ एकत्र कुटूंब पद्धतीत ५२ जणांचा काफिला़़़

चेतन धनुरे , उदगीरवंश परंपरेने चालत आलेली २८ एकर शेती़़़ शेतात २ विहिरी व २ बोअऱ़़ कष्टाने फुलवलेला भाजीपाला अन् ऊस़़़ एकत्र कुटूंब पद्धतीत ५२ जणांचा काफिला़़़ हीच मंडळी संपूर्ण शेती कसते़ परंतु, गेल्या काही वर्षांपासून सातत्याने कमी होत चाललेल्या पावसामुळे १६ एकर ऊस मोडला अन् ४ एकर भाजीपालाही़ पण हार मानतो तो शेतकरी कसला? कमालवाडीच्या या बागायतदार तेलंग कुटूंबाने कसलीही तमा न बाळगता दुष्काळाशी दोन हात करण्यासाठी ताठ मानेने मजूर कामाची वाट शोधली़ देवणी तालुक्यातील कमालवाडी सारख्या खेडेगावात आजही एकत्र कुटूंब पद्धतीत रमलेले तेलंग कुटूंब येणाऱ्या हरएक आव्हानांना एकजुटीने सामोरे जाते़ सुभाष व प्रकाश तेलंग हे कुटूंबातील कर्ते़ त्यांचे अन्य दोन बंधू, भावजयी, मुले, नातवंडे इतक्यावरच हा परिवार थांबत नाही तर बहिणी, मेव्हणे, भाच्चे अन् त्यांची लेकरंबाळं असा एका घरात एकूण ५२ जणांचा हा काफिला़ वारसा हक्काने एकूण २८ एकर शेती चौघा भावात आलेली़ परंतु, तिचे तुकडे न पडू देता सगळ्यांनीच एकजुटीने ही शेती सांभाळली़ मुला-मुलींची लग्नं, आरोग्य, शिक्षण, कपडे़़़ आणखी बरंच काही केवळ एवढ्या शेतीवरच़ त्यातही बरेच उन्हाळे, पावसाळे पाहिले पण मन कधी डगमगले नाही़ दुष्काळाचे दुष्टचक्र थांबत नसल्याने विहिरी, बोअर कोरडे पडू लागले़ त्यामुळे १६ एकरावरील ऊस मोडला़ ४ एकर भाजीपालाही तुटला़ यंदा तर सोयाबीनही हाती लागले नाही़ घरात ११ जनावरे सोयाबीनच्या गुळीवर जगत आहेत़ अशी अस्मानी संकटे कोसळत असतानाही या तेलंग परिवाराने हिंमत हरली नाही़ हे बागायतदार कुटूंब न लाजता मजूरकामावर ताठ मानेने जात आहे़ मुले गुऱ्हाळावर मजुरीने आहेत़ भाच्चे अन् मुले रंगकामासाठी उदगीर, हैैद्राबादला गेली आहेत़ दुष्काळाने मजुरीने जाण्याची वेळ आली तरी कुटुंबातला सदस्य अजिबात डगमगला नाही़ संकटातून जीवनाची नवी क्षितीजे धुंडाळणारे अन् आजही हसतखेळत जगणारे हे तेलंग कुटूंब म्हणजे खचलेल्या शेतकऱ्यांपुढील आदर्श वस्तुपाठच!सातत्याने दुष्काळी झळांत भरडून बागायती शेती मोडण्याची वेळ आली़ कुटूंब मोठे असल्याने चिंता आहेच़ परंतु, खचून कसे जमणार? पोट भरायचं तर काहीतरी करावेच लागते़ येणारा प्रत्येक दिवस सारखा नसतो़ हे वाईट दिवसही सरतील़ मला आशा आहे की, पुढच्या वर्षी पुन्हा मी उसाची अन् भाजीपाल्याची लागवड करु शकेऩ पोट भरण्यासाठी कष्ट आवश्यक आहेत़ आजवर मी माझ्या शेतात ते करीत होतो़ आता दुसरीकडे करीत आहोत़ फरक तर माझ्यासाठी इतकाच आहे, असे सुभाष, प्रकाश तेलंग यांनी सांगितले़महामंडळाची ४५ प्रकरणे बोगस ?लातूर : वसंतराव नाईक आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज प्रकरणात अनेक बोगस प्रकरणे असून, नातेवाईक व मर्जीतल्या लोकांना मंजूर करण्यात आले आहेत. सलगऱ्याच्या धर्तीवर महामंडळाकडून ४० ते ४५ प्रकरणे बोगस झाल्याचा आरोप भटक्या विमुक्त हक्क परिषदेचे अध्यक्ष सचिन भोसले यांनी केला आहे़ महामंडळाच्या कर्ज प्रकरणाचा लाभ लाभार्थ्यांच्या पदरी एजंटच्या मदतीनेच पडतो, असाही आरोप भोसले यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केला़अस्तित्वात नसलेल्या लातूर तालुक्यातील सलगरा (बु) येथील एका महिलेच्या नावाने कर्ज दिले़ या कर्जाच्या परतफेडीची नोटीसही अस्तित्वात नसलेल्या महिलेला पाठविली आहे़ विशेष म्हणजे या ग्रामपंचायतीकडे माहितीच्या अधिकारात आपल्या गावात श्रीदेवी शिवाजी सूरवसे नामक महिला आहे का याची विचारणा भोसले यांनीच केली़ दरम्यान सलगरा (बु) ग्रामपंचायतीने मासिक बैठक घेऊन तसेच गावात घरोघरी भेटी देऊन श्रीदेवी शिवाजी सूरवसे नावाची महिला आमच्या गावात नसल्याबाबतची माहिती भोसले यांना दिली आहे़ इकडे वसंतराव नाईक महामंडळाने मात्र अस्तित्वात नसलेल्या या महिलेच्या नावे कर्जभरणा करण्याची नोटीस पाठविली आहे़ शेळी पालन व्यवसायासाठी ६ डिसेंबर २००८ रोजी आपणाला २५ हजार रुपये कर्ज दिले आहे़ सदर कर्जाचा हप्ता मुद्दल ५२१ व व्याज ४२ असे एकूण ५६३ रुपये दरमहा भरणा करावा, असेही नोटीसीत म्हटले आहे़ ६ आॅगस्ट २०१४ रोजी ही नोटीस पाठविण्यात आली़ नोटीस मिळाल्यापासून ८ दिवसाच्या आत थकबाकी असलेली वसुली २५ हजार अधिक व्याज न भरल्यास आपण दिलेल्या जामिनदाराच्या पगारातून कपात करण्यात येईल़ वसुली न भरल्यास ज्या जामिनदाराचा ७/१२ किंवा घरटॅक्स पावती दिली आहे, त्या जामिनदाराची मालमत्तेची जप्ती करण्याची कारवाई होईल, असेही नोटीसीत म्हटले आहे़ परंतु ग्रामपंचायतीने आमच्या गावात श्रीदेवी शिवाजी सूरवसे नावाची महिला नसल्याचा पंचनामा केल्यामुळे हे प्रकरण बोगस असावे असा आरोप भटक्या विमुक्त संघटनांतील कार्यकर्त्यांनी केला आहे़ भटक्या विमुक्त हक्क परिषदेचे सचिन भोसले यांनी तर श्रीदेवी शिवाजी सूरवसे प्रकरणासारखी लातूर कार्यालयातून ४० ते ४५ प्रकरणे बोगस आहेत, याची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी केली आहे़ (प्रतिनिधी)४औसा तालुक्यातील किल्लारी, बुधोडा, हासेगाव वाडी तसेच सिरसल तांडा, निलंगा शहर, शिरुर अनंतपाळ तालुक्यातील तांडा, सलगरा आदी गावांतून अस्तित्वात नसलेल्या व्यक्तींच्या नावे कर्ज प्रकरणे झाले असल्याचा आरोप भोसले यांनी केला आहे. मागे एका बोगस प्रकरणातच ४२० चा गुन्हा दाखल झाला होता़ आता सलगरा (बु) ची घटना घडल्यानंतर नोटीसा पाठविणे महामंडळाने बंद केल्याचे भोसले यांचे म्हणणे आहे़श्रीदेवी शिवाजी सूरवसे या महिलेच्या नावे कर्ज दिले आहे, हे सत्य आहे़ शिवाय त्यांना नोटीसही पाठविली असून, अनावधानाने पत्ता चुकला आहे़लातूर शहरातील शाहू नगरात त्या राहतात़ त्यांनी कर्ज फेडीचा हप्ता भरला नसल्यामुळेच नोटीस पाठविण्यात आली आहे़ लातूर कार्यालयातून एकही बोगस प्रकरण झाले नाही़ ४लाभार्थ्यांना धनादेश दिला जातो़ लाभार्थ्यांच्या खात्यावरच तो वटविला जातो़ अन्य खात्यावर तो वटत नाही़ कर्ज प्रकरणांच्या वसुलीसंदर्भात नोटिसा पाठविण्यात येत असल्यामुळे लाभार्थीच अशा खोड्या करतात़ गेल्या महिन्यात ५५० लाभार्थ्यांना कर्जवसूलीच्या नोटिसा पाठविण्यात आल्या आहेत़ वसुली मोहीम राबविण्यात येत असल्यामुळे असे खोटेनाटे आरोप करुन वसुलीला अडथळा करण्याचा आरोप करणाऱ्यांचा प्रयत्न असतो़ गेल्या महिन्यात आम्ही ८० हजारांची वसुली केली आहे़ ४लाभार्थ्यांना महामंडळाच्या कर्जावर व्यवसाय करता यावा, म्हणून महामंडळ कार्यरत आहे़ त्याचा गैरफायदा कोणी घेऊ नये़ जर खरेच बोगस प्रकरणे झाले असतील तर गुन्हे दाखल करु, असे वसंतराव नाईक आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक पी़ एम़ झोंबाडे यांनी लोकमतशी बोलताना सांगितले़