लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : नाशिकजवळ झालेल्या रेल्वेच्या अपघातामुळे नांदेड येथून मुंबईकडे जाणाºया काही गाड्या शुक्रवारी रद्द केल्यामुळे परभणी रेल्वे स्थानकावरील सुमारे ३ हजार प्रवाशांची गैरसोय झाली. त्यामुळे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला.नागपूर ते मुंबई दुरांतो एक्सप्रेस ही गाडी आसनगाव/ वासीनाड स्थानकादरम्यान घसरल्यामुळे १ व २ सप्टेंबर रोजी नांदेड येथून मुंबईकडे जाणाºया व येणाºया काही गाड्या रद्द करण्यात आल्या. त्यामुळे नांदेडहून मुंबईकडे जाणाºया नंदीग्राम एक्सप्रेस, देवगिरी एक्सप्रेस व तपोवन एक्सप्रेस या तीन महत्त्वाच्या गाड्या रेल्वे प्रशासनाने शुक्रवारी रद्द केल्या. त्यामुळे परभणी जिल्ह्यातून मुंबईकडे जाणाºया प्रवाशांची मोठी गैरसोय झाली. परभणी जिल्ह्यातून दिवसागणिक जवळपास ३ हजार प्रवासी नंदीग्राम, देवगिरी व तपोवन एक्सप्रेसने ये-जा करतात. शुक्रवारी मात्र या गाड्या रद्द केल्याने या प्रवाशांना नियोजितस्थळी दाखल होता आले नाही. त्यामुळे परभणी स्थानकावर आलेल्या प्रवाशांना १ सप्टेंबर रोजी परतीचा मार्ग धरावा लागल्याचे दिसून आले.
तीन हजार प्रवाशांची परभणीत गैरसोय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 01, 2017 11:53 PM