औरंगाबाद : जिल्ह्यात रविवारी नव्याने निदान होणाऱ्या कोरोना रुग्णांची संख्या काही प्रमाणात खाली आली. दिवसभरात केवळ २८ नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली. यात मनपा हद्दीतील ११, तर ग्रामीण भागातील १७ रुग्णांचा समावेश आहे. उपचार सुरू असताना जिल्ह्यातील २ रुग्णांचा मृत्यू झाला.
जिल्ह्यात सध्या ३०२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. यात ग्रामीण भागातील २५३ आणि शहरातील ४९ रुग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यातील कोरोनाची एकूण रुग्णसंख्या १ लाख ४७ लाख २०५ झाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत १ लाख ४३ हजार ४१८ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आजपर्यंत ३,४८५ रुग्णांचा मृत्यू झाला. मनपा हद्दीतील ३ आणि ग्रामीण भागातील २७ अशा ३० रुग्णांना रविवारी सुटी देण्यात आली. जिल्ह्यातील ग्रामीण भागात सर्वाधिक सक्रिय रुग्ण आहेत. गेल्या काही दिवसांपासून ग्रामीण भागात रोज २० पेक्षा अधिक रुग्णांचे निदान होत होते. मात्र, रविवारी त्यात किंचित घट झाली. उपचार सुरू असताना भीव धानाेरा, गंगापूर येथील ७५ वर्षीय महिला, तर औरंगाबादेतील पानचक्की परिसरातील ६६ वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला.
मनपा हद्दीतील रुग्ण
पिसादेवी १, बहादूरपुरा १, आयकॉन हॉस्पिटल १, गारखेडा परिसर २, समतानगर १, न्यू विशाल नगर १, यासह विविध भागात ४ कोरोना रुग्णांची वाढ झाली.
ग्रामीण भागातील रुग्ण
औरंगाबाद १, गंगापूर २, कन्नड ४, वैजापूर ८, पैठण २