औरंगाबाद : जिल्ह्यात सोमवारी दिवसभरात १३२ कोरोना रुग्णांची भर पडली, तर १११ जण कोरोनामुक्त झाले. तसेच उपचार सुरू असताना एका रुग्णाचा मृत्यू झाला. जिल्ह्यात सध्या ९४१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
जिल्ह्यात एकूण रुग्णांची संख्या ४८ हजार ७७० झाली आहे, तर आतापर्यंत ४६ हजार ५७४ रुग्ण कोरोनामुक्त झाले. एकूण १,२५५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात नव्याने आढळलेल्या १३२ रुग्णांत मनपा हद्दीतील सर्वाधिक ११३ ग्रामीण भागातील १९ रुग्णांचा समावेश आहे. मनपा हद्दीतील १०४ आणि ग्रामीण भागातील ७ अशा एकूण १११ रुग्णांना सोमवारी सुटी देण्यात आली. कैलास नगरातील ६८ वर्षीय स्त्री कोरोना बाधिताचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
मनपा हद्दीतील रूग्ण
अयोध्यानगर १, एन-९, एम २ येथे ६, सिंधी कॉलनी १, आयजीटीआर सिडको १, बीड बायपास परिसर २, ज ज्योतीनगर ३, टिळकनगर १, शहागंज १, हुसेन कॉलनी १, एन -४, सिडको ३, उल्कानगरी ३, पारिजातनगर १, टीव्ही सेंटर १, प्रतापगडनगर १, उत्तरानगरी चिकलठाणा १, सावित्रीनगर चिकलठाणा १, त्रिमूर्ती चौक १, एन-१ येथे १ , ज्युब्ली पार्क १, फरहादनगर २, मुकुंदवाडी १, हिमायतनगर १, त्रिवेणीनगर १, पुंडलिकनगर १, मयुरबन कॉलनी २, श्रेयनगर २, बन्सीलालनगर १, वसुंधरा कॉलनी १, एसबी कॉलनी १, नारळीबाग २, तोफखाना, छावणी ३, पहाडसिंगपुरा १, एन-२, सिडको २, जय भवानीनगर २, भगतसिंग रोड १, गारखेडा परिसर ३, गजानननगर १, न्यू हायस्कूल परिसर १, एन-११ येथे २, जटवाडा परिसर २, सप्तश्रृंगी कॉलनी २, प्रतापगडनगर १, उत्तरानगरी २, शांतीनिकेतन कॉलनी २, सुरेश भवन किराणा १, वेदांतनगर २, खडकेश्वर परिसर १, सन्मित्र कॉलनी १, औरंगपुरा १, निराला बाजार १, एन सहा १, सिडको परिसर १, गादिया विहार ३, म्हाडा कॉलनी १, कासलीवाल मार्बल, बीड बायपास १, दर्गा रोड, डीमार्ट जवळ १, सूतगिरणी चौक परिसर १, कांचनवाडी २, बालकृष्ण मंदिर परिसर, औरंगपुरा २, हर्सुल सावंगी १, हंसराज कॉम्प्लेक्स नागेश्वरवाडी १, पटवर्धन हॉस्पिटल परिसर, रेल्वे स्टेशन रोड १, क्रांतीनगर, कोकणवाडी १, पद्मपुरा १, ठाकरेनगर १, हिरालाल चौक १, एन सात १, विजयंतनगर,देवळाई रोड १, जालननगर १, अन्य १२
ग्रामीण भागातील रूग्ण
एसबी हायस्कूल बिडकीन ५, सिडको महानगर १, बजाजनगर २, मिटमिटा १, चित्तेगाव, पैठण १, अन्य ९