औरंगाबाद : जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्येची रोज उच्चांकी वाढ सुरूच असून, गुरुवारी दिवसभरात तब्बल १,५५७ नवे रुग्ण वाढले, तर उपचार सुरू असताना जिल्ह्यातील १५ आणि अन्य जिल्ह्यातील एकाचा मृत्यू झाला. जिल्ह्यात सध्या ८, ५७० रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
जिल्ह्यात रुग्णांची संख्या आता ६२,९९२ झाली. आतापर्यंत ५३,०३९ रुग्ण कोरोनामुक्त झाले. १,३८३ रुग्णांचा मृत्यू झाला. मनपा हद्दीतील ३७७ आणि ग्रामीण १४७, अशा ५२४ रुग्णांना गुरुवारी सुटी देण्यात आली. नव्या १,५५७ कोरोना रुग्णांत एकट्या शहरातीलच १,१६५ रुग्णांचा समावेश आहे. ग्रामीण भागात ३९२ नव्या रुग्णांची वाढ झाली. उपचार सुरू असताना बिसमिल्ला कालनीतील ६५ वर्षीय पुरुष, जैतखेडा-कन्नड येथील ३५ वर्षीय पुरुष, कोलघर येथील ४९ वर्षीय महिला, विश्रांतीनगर-मुकुंदवाडीतील ५९ वर्षीय पुरुष, भावसिंगपुऱ्यातील ५८ वर्षीय पुरुष, बालेगाव-वैजापुरातील ५४ वर्षीय पुरुष, गवळीपुरा येथील ७९ वर्षीय महिला, पळशी-सिल्लोड येथील ७५ वर्षीय पुरुष, मयूर पार्क येथील ७७ वर्षीय महिला, छत्रपती शिवाजीनगर-सिल्लोड येथील ३९ वर्षीय पुरुष, राधास्वामी काॅलनी, जटवाडा रोड येथील ४५ वर्षीय पुरुष, चिकलठाणा एमआयडीसी येथील ८० वर्षीय पुरुष, पोटूळ येथील ३५ वर्षीय पुरुष, गंगापूर येथील ६५ वर्षीय पुरुष, तजनापूर-खुलताबाद येथील ६९ वर्षीय पुरुष आणि बुलडाणा जिल्ह्यातील ६४ वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला.
मनपा हद्दीतील रुग्ण
घाटी वसतिगृह १, भावसिंगपुरा ४, पडेगाव ६, टी.व्ही. सेंटर ३, खडकेश्वर ७, घाटी ९, औरंगाबाद ७, कोटला कॉलनी १, भानुदासनगर २, एन-५ येथे ४, सादतनगर १, देवानगरी २, न्यु हनुमाननगर ८, एन-६ येथे १७ , एन-१२ येथे ३, इंदिरानगर २, एन-१२ येथे १, चिकलठाणा ११, पुंडलिकनगर ८, विद्यानिकेतन कॉलनी २, एन-९ येथे १८, दत्तमंदिर १, मयूर पार्क ३, मनजितनगर १, पोलीस आयुक्त कार्यालय १, सातारा परिसर १३, नागेश्वरवाडी ६, संजयनगर ३, गारखेडा २२, रेल्वे स्टेशन १, सुखद संवादनगर १, हर्सूल २, एन-७ येथे १०, तालानी मारुती मंदिर १, विद्यापीठ परिसर १, एमजीएम रेसिडेंट क्वार्टर १, नारायण हॉस्पिटल १, कृष्णा रेसिडेन्सी १, मुकुंदवाडी १८, मिलिट्री हॉस्पिटल १, श्रीनगर १, रहेमाननगर १, ईटखेडा ९, देवगिरी कॉलनी २, एन-८ येथे ८, जालाननगर ५, समर्थनगर १४, एस. बी. कॉलनी १, निसर्ग कॉलनी १, आनंदनगर १, एच-२, दिशाभवन सिडको १, मुकुंद कॉलनी १, बंजारा कॉलनी १, ज्योतीनगर ८, हनुमान कॉलनी २, श्रेयनगर ५, अजबनगर ३, ब्रिजवाडी २, जवाहर कॉलनी ३, नक्षत्रवाडी ३, साईनगर पालेगाव ३, सिग्मा हॉस्पिटलजवळ २, विटखेडा पैठण रोड १, बन्सीलालनगर ४, महेशनगर १, कांचनवाडी ३, रमानगर १, पद्मपुरा ७, वानखेडेनगर ४, कटकट गेट १, म्हाडा कॉलनी उस्मानपुरा १, औरंगपुरा २, एन-११ येथे ४, तिळकनगर १, काल्डा कॉर्नर १, रेणुकापुरम १, एसआरपीएफ कॅम्प ४, बीड बायपास १९, आलोकनगर १, कासलीवाल मार्वल १, गुरुप्रसादनगर २, जयदीप अपार्टमेंट १, लोटस रेसिडेन्सी १, जय भवानीनगर १४, अंबरहिल जटवाडा रोड १, अंबिकानगर १, शिवाजीनगर १६, एमआयडीसी एरिया १, पेठेनगर १, लक्ष्मी कॉलनी २, नंदनवन कॉलनी ४, हडको कॉर्नर १, रंगारगल्ली १, खाराकुंआ १, टाऊन सेंटर सिडको १, रामनगर ४, अयोध्द्यानगर २, एन-४ येथे ८, एन-३ येथे ४, एन-२ येथे १२, म्हाडा कॉलनी मूर्तिजापूर १, ठाकरेनगर २, पॉवरलूम एमआयडीसी १, कामगार चौक ३, नक्षत्र आर्केट १, विठ्ठलनगर २, रामा हॉटेल १, बुध्दनगर ३, लोकसेवा हॉटेल १, विठ्ठल-रुखमाई मंदिर १, धुत हाॅस्पिटल १, न्यू एसटी कॉलनी १, नयन मूर्तिनगर १, गजानननगर ६, माणिकनगर १, म्हाडा कॉलनी धूत हॉस्पिटल १, सिडको १, महाजन कॉलनी १, प्रतापगडनगर १, बालाजीनगर १, गुलमंडी ३, विष्णूनगर ५, उस्मानपुरा १४, उल्कानगरी १६, विनायकनगर २, खोकडपुरा ८, गजानन कॉलनी ३, पन्नालालनगर १, सिंधी कॉलनी २, छावणी २, अविनाश कॉलनी १, शाहगंज १, शिवशंकर कॉलनी ४, विष्णुनगर १, जोगेश्वरी १, जाधववाडी ४, एम-२ येथे १, मोतीकारंजा १, व्यंकटेशनगर ४, रोकडिया हनुमान कॉलनी ४, विशालनगर ४, एमजीएम स्टाफ १, एन-१ येथे ४, कॅनॉट १, म्हाडा कॉलनी १, मिसारवाडी १, सेवन हिल १, चंद्रनगर सिडको १, सिटी चौक १, श्रीकृष्णनगर १, लासूर सावंगी १, नथुरामनगर १, आमदार कॉलनी २, शास्त्रीनगर १, राजा बाजार २, संघर्षनगर १, ज्युब्ली पार्क १, ढवळपुरी १, शांतिनिकेतन कॉलनी ३, न्यू सह्याद्री हाऊसिंग सोसायटी १, इंद्रप्रस्थ कॉलनी २, सावित्रीबाई फुलेनगर १, लोकमान्य चौक १, अयोध्यानगर १, न्यू श्रेयनगर १, गणेशनगर ३, प्रेरणानगर २, मेहेरनगर १, खिंवसरा पार्क २, मल्हार चौक २, विजयनगर १, जवाहरनगर २, साहस सोसायटी १, श्रीराम अयोध्यानगर १, बाळकृष्णनगर १, विवेकानंदनगर १, विजयानंदनगर १, कैलासनगर २, रेणुकानगर १, आदर्शनगर २, जुना बायजीपुरा १, मिसारवाडी १, देवळाई ४, अहिंसानगर १, भारतनगर १, मेहूनगर १, लक्ष्मीनगर १, आकाशवाणी ४, सुदर्शननगर १, आझाद चौक १, सत्यमनगर १, द्वारकानगर १, द्वारकापुरी १, मिलिंदनगर २, प्रतापनगर २, दशमेशनगर ३, जाधवमंडी १, कोंकणवाडी १, शाहनूरवाडी ३, बेगमपुरा ३, एमआयडीसी चिकलठाणा १, लेबर कॉलनी २, गादिया विहार १, ऑडिटर सोसायटी टी पाईंट २, पहाडसिंगपुरा ३, मिलिट्री हॉस्पिटल ३, वेणुसूत हौसिंग सोसायटी २, सराफा रोड १, घाटी कॉर्टर १, जयसिंगपुरा १, कृष्णनगर १, वेदांतनगर २, एस. बी. कॉलेज २, क्रांती चौक १, हिमायतबाग १, दर्गा रोड १, विश्रांतीनगर ४, कांचननगर १, सादतनगर १, मुथीयान कॉम्प्लेक्स १, निराला बाजार १, नारेगाव १, स्वातंत्र्यसैनिक कॉलनी १, पानदरीबा १, शिल्पानगर २, गांधीनगर १, सहकारनगर १, केदारनगर १, भाग्यनगर १, झांबड इस्टेट १, अजिंठा हाऊसिंग सोसायटी २, अन्य ५०१.
ग्रामीण भागातील रुग्ण
गंगापूर १, नेवपूर १, पैठण २, देवगावरंगारी १, शिवराई १, कन्नड २, मांगेगाव १, कासोद १, कन्नड १, बनवाडी १, चितेगाव १, बिडकीन १, सारा सोसायटी हर्सूल सावंगी २, बजाजनगर ४२, रांजणगाव ५, टाकळी शिवाजी महालगाव १, आगरवडगाव १, पिसादेवी ३, शेंद्रा एमआयडीसी ४, झाल्टा ४, फुलंब्री १, गंगापूर २, वरुड काझी २, अश्रफपूर सावंगी १, कुंभेफळ १, सटाणा १, वडगाव ५, सिडको महानगर ३, साजापूर १, वडगाव कोल्हाटी २, दौलताबाद मंडी १, साजापूर २, तिसगाव ३, एकलेहरा १, पंढरपूर १, मिटमिटा १, एमआयडीसी वाळूज १, जळकी बाजार सिल्लोड १, बनकरवाडी १, वैजापूर १, पैठण १, गोलवाडी १, चितेगाव १, वाल्मी १, बाळापूर १, अन्य २७९.