औरंगाबाद : जिल्ह्यात सोमवार, मंगळवार आणि बुधवार या ३ दिवसांत कोरोनाच्या ३१७ नव्या रुग्णांची वाढ झाली, तर उपचार पूर्ण झालेल्या २५६ रुग्णांना सुटी देण्यात आली, तसेच औरंगाबाद जिल्ह्यातील ६ आणि इतर जिल्ह्यांतील २ रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.जिल्ह्यात आतापर्यंत आढळलेल्या एकूण कोरोना रुग्णांची संख्या ४१,९१४ झाली आहे. यातील ४०,१६१ रुग्ण उपचार घेऊन बरे झाले आहेत, तर एकूण १,१२४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या ६२९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
जिल्ह्यात गेल्या ३ दिवसांत नव्याने आढळलेल्या ३१७ नव्या रुग्णांत मनपा हद्दीतील २५६, ग्रामीण भागातील ६१ रुग्णांचा समावेश आहे, तर मनपा हद्दीतील १९९ आणि ग्रामीण भागातील ५७, अशा २५६ रुग्णांना सुटी देण्यात आली. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्याचे प्रमाण सतत वाढते आहे. उपचार सुरू असताना वैजापूर तालुक्यातील नाडी, पो. विरमगाव येथील ६८ वर्षीय पुरुष, सिल्लेगाव लासूर येथील ६० वर्षीय स्त्री, रांजणगाव शेणपुंजी येथील ६२ वर्षीय स्त्री, सिद्धार्थनगर येथील ३२ वर्षीय पुरुष, सिद्धेश्वरनगर, जाधववाडीतील ४८ वर्षीय पुरुष, मयूरबन कॉलनी, शहानूरमियाँ दर्गाजवळील ५३ वर्षीय पुरुष आणि जालना जिल्ह्यातील ७५ वर्षीय पुरुष, ६५ वर्षीय पुरुष कोरोनाबाधिताचा मृत्यू झाला, अशी माहिती प्रशासनातर्फे देण्यात आली. मृत्यु दर रोखण्यात मात्र प्रशासनाला सातत्याने अपयश येत आहे . त्यामुळे आरोग्य प्रशासन अधिक चिंतेत आहे.
ग्रामीण भागातील रुग्ण-६१कुंभेफळ ,औरंगाबाद ३, सिल्लोड १, करंजखेड, कन्नड १, भोकरगाव, मनूर ३, वाहेगाव, गंगापूर १, अन्य ११. पैठण १, खर्ज वैजापूर १, अन्य १७, समतानगर, गंगापूर १, अजंता फार्मा, पैठण एमआयडीसी १, सिडको महानगर, तीसगाव ५, मोहटादेवी चौक बजाजनगर, वडगाव १, सावरकर कॉलनी, बजाजनगर, वडगाव सिडको १, मुंडे चौकाजवळ, बजाजनगर, वडगाव १, न्यू भारतनगर, रांजणगाव १, शिवाजीनगर, वडगाव २, फुलेवाडी, वैजापूर १, बाजाठाण फाटा, वैजापूर १, न्यू हायस्कूल, गणोरी ४, कासोद, सिल्लोड १, अन्य २.
मनपा हद्दीतील रुग्ण- २५६सिद्धार्थ गार्डन क्वार्टर परिसर ३, बन्सीलालनगर १, सातारा परिसर ३, मुकुंदवाडी १, खोकडपुरा १, एल अँड टी कंपनी परिसर २, शंभूनगर १, मिटमिटा १, गादिया विहार १, कामगार चौक १, जयभवानीनगर १, गुलमंडी १, न्यू हनुमाननगर १, कल्पतरू सो. १, श्रेयनगर ३, एन-सात १, मयूरनगर १, दिशा कृष्णा अपार्टमेंट १, पदमपुरा १, देवानगरी १, अन्य १८, एन-७, सिडको १, अयोध्यानगर १, नगरी विहार परिसर १, पैठण रोड परिसर २, पगारिया कॉलनी, पैठण रोड परिसर १, श्रेयनगर १, जिल्हा सामान्य रुग्णालय परिसर १, उस्मानपुरा १, पदमपुरा १, रामनगर १, विद्यानगर १, सुंदरवाडी १, रोकडिया हनुमान कॉलनी १, टीव्ही सेंटर, हडको १, हर्सूल परिसर १, कांचनवाडी ३, अन्य ७६, जालाननगर ३ , एन -७ सिडको २, पेशवेनगर, सातारा परिसर १, रचनाकार कॉलनी ८, गोविंदनगर १, गारखेडा १, अलोकनगर १, गृहनिर्माण योजना, शिवाजीनगर १, गणेशनगर, दिवाण देवडी १, सराफा रोड ३, एन- ३ सिडको १, वेदांतनगर १, शास्त्रीनगर १, मल्हार चौक परिसर १, बालाजीनगर १, बेगमपुरा १, स्वप्ननगरी १, नंदनवन कॉलनी ४, व्यंकटेशनगर २, गारखेडा परिसर १, बीड बायपास ४, म्हाडा कॉलनी १, शुभश्री कॉलनी १, पेठेनगर, भावसिंगपुरा १, पडेगाव ४, मुलांचे वसतिगृह, घाटी २, मार्ड हॉस्टेल १, निराला बाजार १, कांचनवाडी १, बन्सीलालनगर १, नागेश्वरवाडी १, दीपनगर, शहानूरवाडी १, अन्य ५९.
असे वाढले ३ दिवसांत नवे रुग्ण६५ - १६ नोव्हेंबर११४ - १७ नोव्हेंबर१३८ - १८ नोव्हेंबर