औरंगाबाद : जिल्ह्यात मंगळवारी दिवसभरात ३२ नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली. यात मनपा हद्दीतील १०, तर ग्रामीण भागातील २२ रुग्णांचा समावेश आहे. त्याचबरोबर ३२ रुग्णांना सुटी देण्यात आली. तर उपचार सुरू असताना जिल्ह्यातील एका रुग्णाचा मृत्यू झाला.
जिल्ह्यात सध्या २९२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. यात ग्रामीण भागातील २३६ आणि शहरातील ५६ रुग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यातील कोरोनाची एकूण रुग्णसंख्या १ लाख ४७ हजार २६५ झाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत १ लाख ४३ हजार ४८४ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आजपर्यंत ३,४८९ रुग्णांचा मृत्यू झाला. मनपा हद्दीतील ३ आणि ग्रामीण भागातील २९ अशा ३२ रुग्णांना मंगळवारी सुटी देण्यात आली. शहरातील रोज निदान होणारी रुग्णसंख्या पुन्हा एकदा दुहेरी आकड्यात आली आहे. उपचार सुरू असताना रांजणगाव येथील ६५ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला.
मनपा हद्दीतील रुग्ण
नवजीवन कॉलनी १, टी. व्ही. सेंटर १, हडको कॉर्नर १, सातारा परिसर १, छत्रपतीनगर १, गारखेडा परिसर १, अन्य ४.
ग्रामीण भागातील रुग्ण
औरंगाबाद ९, गंगापूर ५, कन्नड १, वैजापूर ५, पैठण २.