औरंगाबाद : जिल्ह्यात पुन्हा एकदा नव्या कोरोना रुग्णांची संख्या ५० च्या खाली आली असून, शनिवारी दिवसभरात ३८ रुग्णांची वाढ झाली. यात मनपा हद्दीतील १३, ग्रामीण भागातील २५ रुग्णांचा समावेश आहे. उपचार सुरू असताना जिल्ह्यातील ५ आणि अन्य जिल्ह्यातील एका रुग्णाचा मृत्यू झाला. सध्या ३९५ रुग्णांवर उपचार सुरू आहे. जिल्ह्यात कोरोना रुग्णांची एकूण संख्या १ लाख ४६ हजार ६८४ एवढी झाली आहे. यापैकी जिल्ह्यात आतापर्यंत १ लाख ४२ हजार ८३३ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आजपर्यंत ३,४५६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मनपा हद्दीतील १५ आणि ग्रामीण भागातील ६३ अशा ७८ रुग्णांना शनिवारी सुटी देण्यात आली. उपचार सुरू असताना चिंचवन, सिल्लोड येथील ३९ वर्षीय पुरुष, डोनवाडा तांडा, फुलंब्री येथील ७५ वर्षीय पुरुष, पळसवाडी, खुलताबाद येथील ७० वर्षीय महिला, आंबा, कन्नड येथील ५० वर्षीय महिला, मिरखेड, पैठण येथील ६५ वर्षीय महिला आणि जालना जिल्ह्यातील ५८ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला.
मनपा हद्दीतील रुग्ण
शिवाजीनगर १, सुधाकरनगर १, देवगिरी मुलींचे वसतिगृह १ यासह शहरातील विविध भागांत १० कोरोना रुग्णांची वाढ झाली.
ग्रामीण भागातील रुग्ण
औरंगाबाद २, फुलंब्री ३, गंगापूर २, कन्नड ५, वैजापूर ९, पैठण ४.