औरंगाबाद : जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी सोमवारी दिवसभरात २८ नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली. यात मनपा हद्दीतील केवळ ४, तर ग्रामीण भागातील २४ रुग्णांचा समावेश आहे. उपचार सुरू असताना जिल्ह्यातील ३ रुग्णांचा मृत्यू झाला.
जिल्ह्यात सध्या २९३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. यात ग्रामीण भागातील २४४ आणि शहरातील ४९ रुग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यातील कोरोनाची एकूण रुग्णसंख्या १ लाख ४७ लाख २३३ झाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत १ लाख ४३ हजार ४५२ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आजपर्यंत ३,४८८ रुग्णांचा मृत्यू झाला. मनपा हद्दीतील ३ आणि ग्रामीण भागातील ३१ अशा ३४ रुग्णांना सोमवारी सुटी देण्यात आली. शहरात कोरोना रुग्णांची स्थिती नियंत्रणात आली आहे. काही दिवसांपासून दररोज २० च्या आसपास रुग्णांची वाढ होत आहे. त्यात सोमवारी एकेरी संख्येत रुग्णांची भर पडली. उपचार सुरू असताना कायगाव येथील २७ वर्षीय पुरुष, विष्णूनगरातील ४८ वर्षीय पुरुष आणि बजाजनगर येथील ५३ वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला.
मनपा हद्दीतील रुग्ण
उस्मानपुरा १, उल्कानगरी १, अन्य २.
ग्रामीण भागातील रुग्ण
औरंगाबाद १, फुलंब्री १, कन्नड १, सिल्लोड २, वैजापूर ७, पैठण १२.