औरंगाबाद : जिल्ह्यात गुरुवारी पुन्हा एकदा कोरोनाच्या रुग्णसंख्येत काहीशी वाढ झाली. दिवसभरात ४८ नव्या रुग्णांची भर पडली. यात मनपा हद्दीतील १०, ग्रामीण भागातील ३८ रुग्णांचा समावेश आहे. दिवसभरात ३६ जणांना सुटी देण्यात आली. उपचार सुरू असताना ग्रामीण भागातील दोन आणि अन्य जिल्ह्यातील एका रुग्णाचा मृत्यू झाला.
शहरात कोरोनाची रुग्णसंख्या नियंत्रणात आहे. मात्र, जिल्ह्यातील ग्रामीण भागात रुग्णसंख्येत वाढ झाली. जिल्ह्यात सध्या ३१५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. यात ग्रामीण भागातील २८१ आणि शहरातील ३४ रुग्णांचा समावेश आहे. कोरोना रुग्णांची एकूण संख्या १ लाख ४६ हजार ८५४ एवढी झाली आहे. यापैकी जिल्ह्यात आतापर्यंत १ लाख ४३ हजार ७४ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आजपर्यंत ३,४६५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मनपा हद्दीतील १८ आणि ग्रामीण भागातील १८ अशा ३६ रुग्णांना गुरुवारी सुटी देण्यात आली. उपचार सुरू असताना लिंबगाव, पैठण येथील ७० वर्षीय महिला, वैजापूर येथील ४५ वर्षीय महिला आणि जळगाव जिल्ह्यातील ६० वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला.
मनपा हद्दीतील रुग्ण
औरंगाबाद १, पर्ल शेल हाऊसिंग सोयायटी, गोल्डन सिटी १, हनुमाननगर १, संघर्षनगर १ यासह विविध भागांत ६ रुग्णांची वाढ झाली.
ग्रामीण भागातील रुग्ण
औरंगाबाद २, गंगापूर ८, कन्नड ६, सिल्लोड २, वैजापूर १५, पैठण ५