औरंगाबाद : जिल्ह्यात गुरुवारी दिवसभरात ४८ कोरोना रुग्णांची भर पडली, तर ५४ जण कोरोनामुक्त झाले. तसेच उपचार सुरू असताना एका रुग्णाचा मृत्यू झाला. जिल्ह्यात एकूण रुग्णांची संख्या ४६ हजार ३९८ झाली आहे, तर आतापर्यंत ४४ हजार ८२३ रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, एक हजार २२२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या ३५३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात नव्याने आढळलेल्या ४८ रुग्णांत मनपा हद्दीतील ३८, ग्रामीण भागातील १० रुग्णांचा समावेश आहे. मनपा हद्दीतील ४५ आणि ग्रामीण भागातील ९, अशा एकूण ५४ रुग्णांना गुरुवारी सुटी देण्यात आली. म्हाडा कॉलनी, वाळूज येथील ४५ वर्षीय कोरोनाबाधिताचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
मनपा हद्दीतील रुग्ण
सातारा परिसर २, कांचनवाडी १, अरुणोदय कॉलनी १, एसटी कॉलनी १, मयूर पार्क १, एन चार सिडको १, एन तीन सिडको १, सरस्वतीनगर १, रोजाबाग १, भूषणनगर १, अन्य २७
ग्रामीण भागातील रुग्ण
रांजणगाव २, बजाजनगर २, सिडको महानगर १, अन्य ५