औरंगाबाद : जिल्ह्यात बुधवारी दिवसभरात ७० कोरोना रुग्णांची भर पडली. दिवसभरात ७८ जण कोरोनामुक्त झाले. उपचार सुरू असताना एका रुग्णाचा मृत्यू झाला.
जिल्ह्यात आता एकूण रुग्णांची संख्या ४५ हजार १३४ झाली आहे. जिल्ह्यातील आतापर्यंत ४३ हजार ३४६ रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, १ हजार १९२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या ५९६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
जिल्ह्यात नव्याने आढळलेल्या ७० रुग्णांत मनपा हद्दीतील ५७, ग्रामीण भागातील १३ रुग्णांचा समावेश आहे. मनपा हद्दीतील ६५ आणि ग्रामीण भागातील १३ अशा एकूण ७८ रुग्णांना बुधवारी सुटी देण्यात आली. शहरातील एका खासगी रुग्णालयात ६० वर्षीय पुरुष कोरोनाबाधिताचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. घाटीत २४ तासांत एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही.
मनपा हद्दीतील रुग्ण
मयूर पार्क १, विजयनगर चौक १, एन-१ सिडको १, योगायोग सोसायटी, एन-२ सिडको १, एन-९ परिसर १, एन-७, सिडको १, गांधीनगर १, न्यू शांतिनिकेतन कॉलनी १, नंदनवन कॉलनी १, उदयनगर १, समर्थनगर १, शिवाजीनगर १, गुलमोहर कॉलनी, एन-५, सिडको १, ठाकरेनगर १, गारखेडा परिसर १, रायगडनगर २, नॅशनल कॉलनी १, शिवेश्वर कॉलनी, हर्सूल १, भावसिंगपुरा १, एचआरएम हौसिंग परिसर १, एमजीएम एन-६ येथे १, गजानननगर १, सुखसमृद्धीनगर ३, बीड बायपास २, अन्य २९.
ग्रामीण भागातील रुग्ण
छत्रपती शिवाजीनगर, सिल्लोड १, अन्य १२.