औरंगाबाद : जिल्ह्यात दररोज कोरोना रुग्णसंख्येत मोठी भर पडणे सुरूच असून, शनिवारी दिवसभरात ७२० नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली, तर तब्बल ८४९ रुग्ण उपचार घेऊन घरी परतले. उपचार सुरू असताना औरंगाबाद जिल्ह्यातील ८ आणि जालना जिल्ह्यातील दोन रुग्णांचा मृत्यू झाला. जिल्ह्यात सध्या ४,३२७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
जिल्ह्यात एकूण रुग्णांची संख्या आता ५६ हजार ६७८ झाली आहे, तर आतापर्यंत ५१ हजार १७ रुग्ण कोरोनामुक्त झाले. एकूण १,३३४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात नव्याने आढळलेल्या ७२० रुग्णांत मनपा हद्दीतील ५९५, तर ग्रामीण भागातील १२५ रुग्णांचा समावेश आहे. मनपा हद्दीतील ८०२ आणि ग्रामीण भागातील ४७, अशा एकूण ८४९ रुग्णांना शनिवारी सुटी देण्यात आली. उपचार सुरू असताना पीर बाजार, उस्माानपुरा येथील ७३ वर्षीय महिला, मयूरपार्क येथील ८५ वर्षीय पुरुष, नूर काॅलनी येथील ६० वर्षीय महिला, सिडको-एन-९ येथील ६१ वर्षीय पुरुष, भोईवाडा मिलकाॅर्नर येथील ५२ वर्षीय महिला, नीमखेडा-फुलंब्री येथील ६२ वर्षीय महिला, खुलताबाद येथील ६१ वर्षीय महिला, देशमुखनगर-औरंगाबाद येथील ७४ वर्षीय पुरुष, जालना जिल्ह्यातील ८१ वर्षीय पुरुष आणि ८५ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला.
मनपा हद्दीतील रुग्ण
घाटी परिसर २, खोकडपुरा १, कासलीवाल १, पहाडसिंगपुरा २, हनुमाननगर २, रामनगर २, ज्योतीनगर १, सुंदरवाडी १, जयभवानीनगर २, मथुरानगर १, स्टरलाइट शेंद्रा १, एन-६, सिडको १, अलंकार सोसायटी गारखेडा १, जरामणी सिडको १, पडेगाव १, जालाननगर १, समर्थनगर १, ज्योतीनगर १, गजानननगर २, विद्या निकेतन कॉलनी २, टी.व्ही.सेंटर १, चेतनानगर १, वेदांतनगर १, औरंगपुरा १, श्रीनिकेतन कॉलनी ३, नंदनवन कॉलनी १, रेल्वेस्टेशन १, गजानननगर १, स्वामी विवेकानंद कॉलनी २, सातारा परिसर १, कासलीवला मार्वल १, प्रतापनगर १, देशमुख हॉस्पिटल, समतानगर १, पडेगाव पोलीस कॉलनी १, क्रांती चौक ५, बन्सीलालनगर २, एन-७, सिडको १, पुंडलिकनगर १, म्हाडा कॉलनी १, बन्सीलालनगर १, नंदनवन कॉलनी १, पुंडलिकनगर ३, कोहीनूर कॉलनी १, साई स्पोर्ट्स ऑथॉरिटी ऑफ इंडिया १, भावसिंगपुरा १, समर्थनगर १, हॉटेल कार्तिकी १, म्हाडा कॉलनी १, शांतीपुरा १, पडेगाव १, जयसिंगपुरा १, कैलाशनगर १, सूतगिरणी चौक १, एन-९, सिडको १, एन-१, सिडको २, पुंडलिक नगर १, श्रेय नगर १, सिडको १, मनहषा कॉलनी १, एन-९, सिडको १, गुरुप्रसादनगर १, मिलिटरी हॉस्पिटल १, म्हाडा कॉलनी १, सातारा परिसर १, पेठेनगर १, बालाजीनगर १, संजयनगर, मुकुंदवाडी १, सुंदरनगर १, रमाई हॉस्पिटल हर्सूल १, टाइम्स कॉलनी १, हर्सूल १, समर्थनगर १, केळी बाजार १, हनुमाननगर २, नागेश्वरवाडी १, एन-११, टी.व्ही. सेंटर १, जयभवानीनगर ३, बीड बायपास १, कासलीवाल गार्डन १, एन-२, सिडको १, मुकुंदवाडी १, एन-४, सिडको १, एन-६, सिडको १, चिकलठाणा १, रामनगर १, एन-१, सिडको १, राजीव गांधीनगर २, एन-२, सिडको १, विठ्ठलनगर २, मुकुंदवाडी १, राजनगर १, रामनगर १, श्रीरामनगर १, ठाकरेनगर १, एन-१, सिडको १, जयभवानीनगर १, मयूर पार्क १, न्यू हनुमाननगर १, एन-२, सिडको १, चिकलठाणा १, नॅशनल कॉलनी १, द्वारकादासनगर १, एन-१ सिडको १, म्हाडा महावीर चौक १, प्राइड गॅलक्सी, पैठण रोड १, रामनगर मुकुंदवाडी १, ज्योतीनगर १, उस्मानपुरा १, पैठण गेट १, क्रांती चौक १, योगेश्वरी अपार्टमेंट १, पैठण रोड गारखेडा १, रेल्वेस्टेशन रोड १, खडकेश्वर २, उस्मानपुरा १, स्टेशन रोड, एमआयडीसी १, ज्योतीनगर १, शांतिनिकेतन कॉलनी, शनिमंदिर १, क्रांती चौक १, सुपारी हनुमान १, न्यू विशालनगर १, बीड बायपास १, दिशा संस्कृती पैठण रोड १, जालाननगर १, म्हाडा कॉलनी, बाबा पेट्रोल पंप १, अजबनगर १, टी. व्ही. सेंटर, पोलीस कॉलनी १, विद्युत कॉलनी बेगमपुरा १, गजानननगर, गारखेडा परिसर १, संजयनगर बायजीपुरा १, न्यू नंदनवन कॉलनी २, स्काय बायोटेक, पैठण रोड १, गिब्ज हेल्थकेअर चिकलठाणा १, जाधववाडी १, नारळीबाग औरंगपुरा १, स्काय बायोटेक पैठण रोड २, नारेगाव १, एन-६, सिडको संभाजीनगर १, खॉराकुंआ १, शासकीय दंत वसतिगृह १, म्हाडा कॉलनी, हर्सूल १, म्हाडा कॉलनी १, टी. व्ही. सेंटर, औरंगाबाद ३, ऊनआर सिटी १, होनाजीनगर १, राजा बाजार २, एन-११, हडको १, मुकुंदवाडी १, दिशानगरी, देवळाई रोड, सातारा परिसर १, ज्योतीनगर १, राधामोहन कॉलनी १, शांतिनिकेतन कॉलनी १, मयूर पार्क १, एन-१२ येथे १, पिसादेवी १, सिटी चौक १, एन-७, सिडको १, हर्सूल १, सातारा परिसर १, हरिहरनगर १, पैठण रोड १, नक्षत्रवाडी, पैठण रोड ३, सादतनगर २, छत्रपतीनगर, बीड बायपास १, वॉलमार्ट कंपनी, औरंगाबाद १, सातारा परिसर १, स्टरलाइन कंपनी, शेंद्रा १, गारखेडा १, रोकडिया हनुमान कॉलनी ३, भारत बटालियन फोर्स सातारा ४, कांचनवाडी १, स्टरलाइट टेक लिमिटेड कंपनी, शेंद्रा ३, बालाजीनगर १, सुराणानगर १, नरहरी वसंत विहार, औरंगाबाद १, सातारा परिसर १, एन-८, सिडको २, एन-४, सिडको १, राजनगर, स्टेशन रोड १, शास्त्रीनगर १, पैठण गेट १, जलालनगर १, नागेश्वरवाडी १, म्हसोबानगर, हर्सूल १, समर्थनगर १, फुलेनगर २, म्हाडा कॉलनी, बाबा पेट्रोल पंप १, शिवाजीनगर १, आसेफिया कॉलनी १, तापडिया इनोवेटा शाळेसमोर १, एन-३, सिडको १, देशमुखनगर १, नागेश्वरवाडी १, जयभवानीनगर १, रॉक्सी टॉकीज पैठण गेट १, कामगार चौक १, अहिंसानगर ३, प्यारासदन १, अंबिकानगर, मुकुंदवाडी १, लोकसेवा हॉटेल १, रेणुकामाता मंदिर, बीड बायपास रोड २, सातारा परिसर १, रेल्वे स्टेशन एम्प्लॉइज १, पळशी एमआयडीसी १, कॉस्मो फिल्म, शेंद्रा १, सुदर्शननगर १, नागेश्वरवाडी १, विठ्ठलनगर १, दिवानदेवडी १, जेथलियानगर १, समर्थनगर १, पद्मपुरा १, श्रेयनगर २, ज्योतीनगर २, क्रांती चौक १, परिजातनगर, म्हाडा कॉलनी १, हिंदुस्थान आवास, नक्षत्रवाडी १, उदयनगर १, रमानगर, क्रांती चौक १, जालाननगर १, भाग्यनगर १, लोकमित्र पोलीस कॉलनी १, मातोश्रीनगर १, पुंडलिकनगर १, देवानगर १, गारखेडा परिसर १, पुंडलिकनगर १, शिवशंकर कॉलनी १, गारखेडा परिसर १, कैलासनगर १, शिवाजीनगर १, बीड बायपास रोड १, तिलकनगर १, पुंडलिकनगर १, नाथनगर १, गजानन कॉलनी १, उल्कानगरी २, रामनगर २, मुकुंदवाडी १, विद्यानगर १, देशमुखनगर १, रामतारा सोसायटी १, उत्तरा नगरी १, भानुदासनगर १, मुकुंदवाडी १, शिवशंकर कॉलनी १, पुंडलिकनगर २, उल्कानगरी १, श्रेयनगर १, उल्कानगरी १, गजानननगर १, गजाजन कॉलनी १, पुंडलिकनगर १, गजानननगर १, सिडको महानगर १, उल्कानगरी ४, विष्णूनगर १, अहिंसानगर २, विशालनगर १, एन-१, सिडको १, चिकलठाणा १, शंभूनगर १, चेतक घोडा १, सिंधी कॉलनी १, विजयनगर १, रोपळेकर हॉस्पिटल १, हनुमाननगर १, आरबी क्लासिक क्लासेस १, एन-२ सिडको, राजनगर २, नागेश्वरवाडी १, कैलासनगर १, सातारा परिसर १, घाटी परिसर १, नंदनवन कॉलनी १, कांचनवाडी १, औरंगपुरा १, विशालनगर १, पुंडलिकनगर १, नंदनवन कॉलनी २, औरंगाबाद १, कासलीवाल तारांगण ३, जयभवानीनगर, सिडको १, घाटी रुग्णालय १, एन-१, सिडको १, ब्रिजवाडी १, व्यंकटेशनगर २, बीड बायपास १, एन-३, सिडको १, पडेगाव १, आकशवाणी २, विष्णूनगर १, उल्कानगरी १, संजयनगर १, ठाकरेनगर १, पिसादेवी १, बीड बायपास १, एन-२, सिडको १, जवाहरनगर १, शिवाजीनगर २, खाराकुंआ १, मनजीत प्राइड देवळाई १, कार्तिकनगर मयूरपार्क १, एन-१३, हडको २, एन-११, नवजीवन कॉलनी १, मयूरनगर, हडको १, जाधववाडी, टी. व्ही. सेंटर १, संकल्पनगर, मयूरपार्क २, अन्य २२८.
ग्रामीण भागातील रुग्ण
पाचोड १, गेवराई तांडा ४, डोणगाव २, फुलंब्री १, वाळूज महानगर १, गेवराई १, वडगाव कोल्हाटी ५, वाळूज एमआयडीसी ३, बिडकीन १, कांचनवाडी १, पिंप्री राजा १, गेवराई गाव, पैठण रोड १, पंढरपूर १, बजाजनगर २, आडगाव १, कुंभेफळ २, जडगाव १, करमाड १, बजाजनगर २, झाल्टा फाटा १, अन्य ९२.
साडेचार हजार स्वॅब कलेक्शन
औरंगाबादेत शनिवारी दिवसभरात तब्बल ४ हजार ५७५ कोरोना संशयितांचे स्वॅब तपासणीसाठी घेण्यात आला. यात किती जणांचा अहवाल कोरोना पाॅझिटिव्ह येताे, याकडे महापालिकेच्या आराेग्य यंत्रणेचे लक्ष लागले आहे.