औरंगाबाद : जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी सोमवारी एकाही कोराेना रुग्णाचा मृत्यू झाला नाही. नव्या रुग्णांची संख्या मात्र काहीशी वाढली. दिवसभरात ७७ कोरोना रुग्णांची भर पडली, तर ५४ जण कोरोनामुक्त झाले. जिल्ह्यात सध्या ३३४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
जिल्ह्यात एकूण रुग्णांची संख्या ४७ हजार ७२२ झाली आहे, तर आतापर्यंत ४६ हजार १४३ रुग्ण कोरोनामुक्त झाले. एकूण १,२४५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात नव्याने आढळलेल्या ७७ रुग्णांत मनपा हद्दीतील ७२, ग्रामीण भागातील पाच रुग्णांचा समावेश आहे. मनपा हद्दीतील ४६ आणि ग्रामीण भागातील ८, अशा एकूण ५४ रुग्णांना सोमवारी सुटी देण्यात आली.
मनपा हद्दीतील रुग्ण
नंदनवन कॉलनी ३, गारखेडा परिसर १, बन्सीलालनगर १, घाटी परिसर १, सेव्हन हिल कॉलनी १, जय भवानीनगर २, मिल कॉर्नर १, सातारा परिसर २, केशवनगर १, म्हाडा कॉलनी १, कांचनवाडी १, बीड बायपास १, शिवाजीनगर १, अन्य ५५.
ग्रामीण भागातील रुग्ण
आडगाव १, लाडसावंगी १, अन्य ३