लोकमत न्यूज नेटवर्कवाळूज महानगर : बजाज कंपनी व्यवस्थापन व कामगार युनियन यांच्यात यशस्वी चर्चा होऊन वेतनवाढीचा करार करण्यात आला. या करारानुसार कामगारांच्या वेतनात तब्बल ११ हजार ५०० रुपयांची भरघोस वाढ करण्यात आली आहे. युनियनचे अध्यक्ष बाजीराव ठेंगडे यांनी वेतनवाढीची अधिकृत घोषणा करताच कामगारांनी आनंद व्यक्त करून जल्लोष साजरा केला.कंपनी व्यवस्थापन व एम्प्लाईज युनियन यांच्यात दर साडेतीन वर्षाला वेतनवाढीचा नवीन करार होतो. मागील कराराचा कालावधी ३१ जानेवारी २०१८ रोजी संपुष्टात आला. त्यामुळे युनियनने ४ महिन्यांपूर्वीच नवीन करारासंदर्भात व्यवस्थापनाला पत्र दिले होते. वेतनवाढीसंदर्भात जवळपास २० बैठका झाल्या. अखेरच्या बैठकीत यशस्वी चर्चा झाली. गुरुवारी कंपनी गेटसमोर युनियनतर्फे सभा घेण्यात आली. बाजीराव ठेंगडे यांनी नवीन वेतनवाढीसंदर्भात माहिती दिली. युनियनचे सचिव संपत गायकवाड यांनी प्रास्ताविक, तर मोतीराम कांबळे यांनी सूत्रसंचालन केले. कांतीलाल पाटील यांनी आभार मानले. यावेळी युनियनचे प्रभाकर भोसले, तात्याराव पवार, सुधाकर जाधव, मनोहर लघाने, विजय पवार, इंद्रकुमार जाधव, संजय चतूर, प्रभाकर नाईकवाडे, ज्ञानेश्वर भोडगिर, विठ्ठल कांबळे यांच्यासह कामगार उपस्थित होते.असा आहे नवीन करारनवीन करारानुसार बजाज कामगारांच्या पगारात एकूण ११ हजार ५०० रुपयांची वाढ करण्यात आली आहे. यातील पीएफच्या स्वरूपात ७५९ रुपये वजा होणार असून, कामगाराच्या हातात प्रत्यक्षात १० हजार ७४१ रुपये पडणार आहेत. व्यवस्थापनाने अलाऊन्समध्ये ३८९ रुपये वाढ केल्याने ११ हजार १३० रुपये एवढी मूळ पगारवाढ झाली आहे. कामगार पाल्यांच्या विवाहासाठी मॅरेज लोनमध्येही वाढ केली आहे. कामगार कुटुंबासाठी १ लाख रुपयाचा वैद्यकीय विमा व गंभीर आजारासाठी ५० लाख रुपये तरतूद केली आहे.
औरंगाबादच्या ‘बजाज’मध्ये वेतनवाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2018 12:06 AM
बजाज कंपनी व्यवस्थापन व कामगार युनियन यांच्यात यशस्वी चर्चा होऊन वेतनवाढीचा करार करण्यात आला. या करारानुसार कामगारांच्या वेतनात तब्बल ११ हजार ५०० रुपयांची भरघोस वाढ करण्यात आली आहे. युनियनचे अध्यक्ष बाजीराव ठेंगडे यांनी वेतनवाढीची अधिकृत घोषणा करताच कामगारांनी आनंद व्यक्त करून जल्लोष साजरा केला.
ठळक मुद्देआनंदी आनंद : कंपनी व्यवस्थापन व कामगार युनियन यांच्यात करार