छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरकरांचीविमान प्रवासाची आवड वाढली आहे. कारण २०२४ मध्ये शहरातील चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळावरून तब्बल ६.९५ लाख प्रवाशांनी प्रवास केला. विशेष म्हणजे, शहरातील विमान प्रवाशांमध्ये वर्षभरातच ९१ हजारांनी वाढ झाली आहे.
चिकलठाणा विमानतळावरून आजघडीला दिल्ली, मुंबई, हैदराबाद, गोवा, बंगळुरू, नागपूरसाठी विमानसेवा सुरू आहे. चिकलठाणा विमानतळावर गेल्या वर्षभरात प्रवाशांची गर्दी वाढली असून, महिन्यागणिक प्रवासी संख्येत मोठी वाढ दिसते. २०२४ मध्ये नोव्हेंबर महिन्यात सर्वाधिक प्रवासी होते, तर सर्वाधिक ७१६ विमानांचे उड्डाणही याच महिन्यात नोंदले गेले. कार्गो वाहतुकीत मात्र ऑक्टोबर महिना ‘हिट’ ठरला.
२०२४ मधील विमान प्रवासीमहिना - विमान प्रवासीजानेवारी – ५७,८२१फेब्रुवारी – ५३,२९६मार्च – ५४,८०२एप्रिल – ५१,०५१मे – ५८,४२१जून – ५६,३८३जुलै – ५३,९०६ऑगस्ट – ५८,७९२सप्टेंबर – ५८,४८६ऑक्टोबर – ६२,९२२नोव्हेंबर – ६६,२१७डिसेंबर – ६३,०७७एकूण प्रवासी संख्या – ६,९५,१७४
८२७.७ मेट्रिक टन कार्गो वाहतूकविमानतळावरून २०२४ मध्ये ८२७.७ मेट्रिक टन मालाची (कार्गो) ने-आण झाली.
६ हजार विमानांचे उड्डाणगेल्या वर्षभरात ६,७४१ विमानांचे चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाण झाले.
२०२३ मध्ये एकूण प्रवासी : ६ लाख ३ हजार ४७३२०२४ मध्ये विमान प्रवासी : ६ लाख ९५ हजार १७४
अहमदाबाद विमानसेवा बंदचा फटकाडिसेंबर २०२४ पासून अहमदाबाद विमानसेवा बंद झाली. त्यामुळे नोव्हेंबरच्या तुलनेत डिसेंबरमध्ये विमान प्रवाशांमध्ये घसरण झाली.
नव्या विमानसेवेची गरजनवीन विमानसेवेसाठी मोठी मागणी आहे. डिसेंबरमध्ये अहमदाबाद विमानसेवा बंद झाल्यामुळे २०२४ या वर्षात ७ लाख प्रवासी वाहतुकीचा टप्पा हुकला. विमानतळाच्या इतिहासात आतापर्यंत २०२४ मधील प्रवासी संख्या सर्वात जास्त, ६.९५ लाखांच्या घरात आहे. २०२४ या वर्षात २०२३ च्या तुलनेत प्रवासी वाहतुकीत १५.२% वाढ, विमान वाहतुकीत १८.५% वाढ, तर मालवाहतुकीत १३.५% वाढ झाली.- अक्षय चाबूकस्वार, एअर कनेक्टिव्हिटी एव्हिएशन ग्रुप.