वाळूज महानगर: वाळूज परिसरात दिवाळीपासून चोºयांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहे. चोरीच्या घटनांचा तपास लावण्यात स्थानिक पोलिसांना यश येत नसल्यामुळे व्यवसायिक व नागरिकात भितीचे वातावरण पसरले आहे.
या परिसरातील वाळूज, लिंबेजळगाव, तुर्काबाद, रांजणगाव, आंबेगाव, बजाजनगर, साजापूर, करोडी आदी ठिकाणी चोरट्यांनी लाखोचा ऐवज लांबविला आहे. या शिवाय दुचाकी व इतर चोºयाही वाढल्यामुळे व्यवसायिक व नागरिकांत घबराट पसरली आहे.
रांजणगाव परिसरात बुधवारी एकाच रात्री चोरट्यांनी ७ दुकानाचे शटर उचकटुन काही दुकानांतील रोकड व कॉस्मेटिक साहित्य लांबविले. विशेष म्हणजे रांजणगावात मध्यरात्रीच्या सुमारास चोरीच्या उद्देशाने विना क्रमांकाच्या दोन दुचाकीवरुन फिरणारे सहा संशयित चोरटे ग्रामपंचायतीने ठिक-ठिकाणी उभारलेल्या सीसीटीव्ही कॅमेºयात कैद झाले आहेत. रांजणगावात आठवडाभरापूर्वीच मिरा मेडीकल स्टोअर्स या दुकानाचे शटर उचकटुन चोरट्यांनी २५ हजारांची रोकड लांबविली होती. या औषधी दुकानात चोरी करताना चोरटे सीसीटीव्हीत कैद झाले आहेत. मात्र, चोरट्यांचा अद्याप शोध लागलेला नाही. तीन-चार दिवसांपूर्वीच वाळूजला चोरट्यांनी दोन मेडीकल स्टोअर्सची दुकाने फोडुन जवळपास २० हजारांचा ऐवज लांबविला. साजापूरात शेख जमील गुलाब यांच्या घरी चोरी करुन चोरट्यांनी रोख ४ लाख रुपये व दोन लाखाचे सोन्याचे दागिने लांबविले होते. बजाजनगरात विष्णू मोरे यांच्या घरीही चोरट्यांनी चोरी करुन जवळपास २ लाखांचा ऐवज लंपास केला आहे.
दिवाळीपासून या परिसरात जवळपास २० ठिकाणी लहान-मोठ्या चोºया झाल्या असून, लाखो रुपये किमंतीचा ऐवज चोरट्यांनी पळवला आहे. या चोºयांप्रकरणी वाळूज व एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झाले असून, चोºयांचा शोध लावण्यात पोलिसांना यश आलेले नाही. किमंती ऐवज चोरींच्या घटनांचा तपास सुरु असल्याचे उत्तरे दिली जात असल्यामुळे तक्रारदारात नाराजीचा सूर उमटत आहे. या परिसरात वाढत्या चोºयामुळे व्यवसायिक व नागरिकात भितीचे वातावरण पसरले आहे.
अवैध धंद्याकडे पोलिस प्रशासनाचे दुर्लक्षउद्योगनगरी तसेच वाळूज परिसरात मोठ्या प्रमाणात अवैध धंदे वाढले असून, वाळू तस्करी, अवैध दारु विक्री, जुगार, गुटखा विक्री बिनधास्तपणे सुरु आहेत. आता चोºया व गंभीर स्वरुपाचे गुन्हे वाढले असून याकडे पोलिस प्रशासन गांभीर्याने लक्ष देत नसल्याची ओरड नागरिकातून होत आहेत.