औरंगाबाद : जिल्ह्यात तब्बल साडेतीन महिन्यांनंतर मंगळवारी पुन्हा एकदा कोरोना रुग्णसंख्येने तिहेरी आकड्यात प्रवेश केला. दिवसभरात तब्बल १२० कोरोना रुग्णांची भर पडली, तर ४७ जण कोरोनामुक्त झाले. अन्य जिल्ह्यातील एका रुग्णाचा मृत्यू झाला.
जिल्ह्यात सध्या ४०७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात एकूण रुग्णांची संख्या ४७ हजार ८४२ झाली आहे, तर आतापर्यंत ४६ हजार १९० रुग्ण कोरोनामुक्त झाले. एकूण १,२४५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात नव्याने आढळलेल्या ४०७ रुग्णांत मनपा हद्दीतील ९६, ग्रामीण भागातील २४ रुग्णांचा समावेश आहे. मनपा हद्दीतील ३९ आणि ग्रामीण भागातील ८, अशा एकूण ४७ रुग्णांना मंगळवारी सुटी देण्यात आली. बुलडाणा जिल्ह्यातील ८० वर्षीय महिलेचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला.
मनपा हद्दीतील रुग्णबीड बायपास ४, हनुमान नगर १, गजानन कॉलनी १, एन-४, सिडको ४, सेव्हन हिल १, टिळकनगर १, मित्रनगर २, सिद्धार्थ नगर १, सिडको एन-५ येथे १, एन-९ येथे ३ , सातारा परिसर ५, शिवाजी नगर २, शास्त्रीनगर ३, रमानगर १, एन-७ येथे १ , इंडोजर्मन टूल रुम १, एन-१, सिडको २, एन-२, सिडको २, नारेगाव १, जालान नगर २, कांचनवाडी ४, उल्कानगरी १, म्हाडा कॉलनी १, इटखेडा १,घाटी परिसर २, गारखेडा २, क्रांती चौक ३, जवाहर कॉलनी १, नेताजी सुभाषचंद्र बोस कॉलनी १, हिमायत बाग १, योगीराज टॉवर १, रोशन गेट १, मथुरा नगर १, उस्मानपुरा ३, जय भवानी नगर १, सुंदर नगर पडेगाव १, श्रेय नगर १, अन्य ३१
ग्रामीण भागातील रुग्णशेंद्रा एमआयडीसी १ , वाळूज १, बजाज नगर ३, फुलंब्री १, कन्नड २,सौजन्य नगर वाळूज १, अन्य १५