छत्रपती संभाजीनगर : भारतीय अर्थव्यवस्थेत नकली नोटा नाहीत, असा छातीठोक दावा भारतीय रिझर्व्ह बँकही करू शकत नाही... व्यापाऱ्यांसाठी तर या नकली नोटा डोकेदुखीच ठरत आहेत... मात्र, व्यापाऱ्यांच्या मदतीला ‘ती’ आली आहे. ‘ती’ चक्क नोटांच्या बंडलातून क्षणात नकली नोट शोधून देत आहे... ‘ती’ असल्याने व्यापारी निश्चिंत आहेत.
‘ती’ म्हणजे कोण?‘ती’ म्हणजे दुसरी तिसरी कोणी नसून ‘बनावट नोट शोधक मशीन’ आहे. नोटा मोजणी यंत्र आणि त्यातच बनावट नोटा शोधण्याची व्यवस्था असल्याने अशा यंत्राला बाजारपेठेत मागणी आहे.
१० रुपयांचीही नकली नोट५०० व १०० प्रमाणेच १०, २०, ५० रुपयांच्या बंडलातही नकली नोटा सापडतात. शहरात त्याचे प्रमाण किती हे सांगणे कठीण आहे. कारण, नकली नोट सापडली तर व्यापारी लगेच ज्या ग्राहकाने दिली, त्यास परत करतात. किंवा जाळून टाकतात. काही जण दुसऱ्या बंडलमध्ये टाकून ती नोट खपवून टाकतात.
१० प्रकारच्या नोटाच अधिकृतरिझर्व्ह बँकेने चलनात आणलेल्या १० प्रकारच्या नोटा आहेत. यात १० रुपयांची (नवी, जुनी) २ प्रकारच्या नोटा, २० रुपयांची (नवी, जुनी) २ प्रकारच्या नोटा, ५० रुपयांची (नवी, जुनी) २ प्रकारच्या नोटा, १०० रुपयांची (नवी, जुनी) २ प्रकारची नोट, तर २०० रु व ५०० रुपयांची प्रत्येकी १ प्रकारची नोट आहे. त्यांचे स्टँडर्ड ठरलेले आहेत.
परकीय बनावट नोटा शोधण्यातही यंत्राचा हातखंडाभारतीयच नव्हे तर अन्य १४ देशांच्याही नकली नोटा शोधण्यातही हे यंत्र तरबेज आहे. जिथे व्यवहारात परकीय नोटांचा संबंध येतो, अशा ठिकाणी ‘‘बनावट नोटाशोधक यंत्र’ कामाला येत आहे.
जिल्ह्यात १ लाखापेक्षा अधिक यंत्रे‘बनावट नोटाशोधक यंत्राचा वापर बँका, कंपन्या, पेट्रोल पंप, होलसेलर, हॉस्पिटल यांच्याकडे आहेच. शिवाय आता व्यापारीही असे यंत्र खरेदी करीत आहेत. जिल्ह्यात १ लाखापेक्षा अधिक व्यावसायिकांकडे हे यंत्र आहे. कारण, दिवसभरात ५०० रुपयांच्या एक किंवा दोन जरी नकली नोटा आल्या तरी त्याचा फटका बसतो.
व्यापारी लग्नात देताहेत भेट नकली नोटा शोधक यंत्र ७ हजार ५०० रुपयांपासून विकले जाते. व्यापारी दुसऱ्या व्यापाऱ्यांच्या लग्नात हेच यंत्र भेट म्हणून देत आहेत.
११ वर्षात वाढली विक्रीपूर्वी ‘डिटेक्टर’ मध्ये एक-एक नोट ठेवून नकली नोटा तपासल्या जात. मात्र, तंत्रज्ञान विकसित होऊन २०१२ नंतर ‘बनावट नोटाशोधक यंत्र’ आले. ‘नोटाबंदी’ पासून २०१७ पासून कलर ऑटो सेंसर मशीन दाखल झाल्या आणि नकली नोटा क्षणात शोधणे सोपे झाले.- अमोल वर्मा, व्यापारी