शहरं
Join us  
Trending Stories
1
सदस्य नोंदणीत टार्गेट अपूर्ण, भाजपा नेतृत्व नाराज; पक्षातील नेत्यांची कानउघडणी
2
Babita Phogat : विनेशच्या राजकारणावर नाही तर 'या' गोष्टीमुळे महावीर फोगाट नाराज, बबिताने सांगितलं मोठं कारण
3
"मी जिंकेल याची 100 टक्के खात्री नव्हती", सुप्रिया सुळेंचं निवडणुकीबद्दल विधान
4
हत्येचा आरोप अन् सुरक्षा! शाकिबच्या अडचणी वाढल्या; बांगलादेश क्रिकेट बोर्डानं स्पष्टच सांगितलं
5
आयफोन बनवणाऱ्या टाटा इलेक्ट्रॉनिक कंपनीत भीषण आग; १५०० कामगारांना काढलं बाहेर
6
देश सोडला, भारतात आली, ओळख लपवली...; एडल्ट स्टार बन्ना शेख कशी बनली रिया बर्डे?
7
'डॉली चायवाला'ची क्रेझ! भारताच्या हॉकी संघाकडे केलं दुर्लक्ष; खेळाडूंनी व्यक्त केली खदखद
8
बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेच्या एन्काउंटर प्रकरणी सुप्रीम कोर्टात याचिका
9
"दिवट्या आमदार...", पोर्शे प्रकरणावरून सुनील टिंगरे शरद पवारांच्या 'रडार'वर!
10
अत्याचारी राक्षस पुन्हा नको, यासाठी माझी लढाई; उमेश पाटील करणार NCP ला रामराम?
11
Musheer Khan Accident: टीम इंडियाचा क्रिकेटर सर्फराज खानचा भाऊ मुशीरचा अपघात
12
Solar Eclipse 2024: सूर्यग्रहण भारतातून दिसणार नाही पण परिणाम होतो हे नक्की; जाणून घ्या उपाय!
13
पितृपक्ष: चतुर्दशी श्राद्ध एवढे महत्त्वाचे का? केवळ ‘या’ पितरांचा करतात विधी; पाहा, मान्यता
14
काश्मीरच्या कुलगाममध्ये दहशतवाद्यांशी चकमक; 3 जवान जखमी, सर्च ऑपरेशन सुरू
15
Indira Ekadashi 2024: नोकरी व्यवसायात यशप्राप्तीसाठी आज इंदिरा एकादशीला करा 'हे' खास उपाय!
16
"मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनामागील सूत्रधार..."; नरेंद्र पाटलांचा गंभीर आरोप
17
मोबाईलमधले फोटो, टोकाचं भांडण, रक्तरंजित प्रेम; महालक्ष्मीच्या हत्येच्या रात्री नेमकं काय घडलं?
18
NCP च्या जागेवर दावा; मुलाच्या उमेदवारीसाठी माजी आमदाराची उद्धव ठाकरेंकडे मागणी
19
अदानींच्या झोळीत आली आणखी एक कंपनी; २०० कोटींना झाली डील, जाणून घ्या
20
एका घरात पाच मृतदेह! चार मुलींसह वडिलांनी संपवलं आयुष्य, कारण...

औरंगाबाद लोकसभेत अपक्षांनी अडवली लाखांवर मते; तर ५ हजार ७२९ मतदारांची ‘नोटा’ला पसंती

By विजय सरवदे | Published: June 06, 2024 7:56 PM

या निवडणुकीत ‘नोटा’ला मिळालेल्या पसंतीच्या तुलनेत २९ अपक्ष उमेदवारांना मिळालेली मते कितीतरी कमी आहेत.

छत्रपती संभाजीनगर : या निवडणुकीत ३७ उमेदवारांत अपक्षांची संख्या ३२ एवढी आहे. मतदारसंघात कवडीचेही काम नसणाऱ्या अनेकांनी केवळ हौस म्हणून अपक्ष निवडणूक लढवली. असे असले तरी या सर्व अपक्षांनी १ लाख ७ हजार ५३२ मते अडवली. 

दरम्यान, हर्षवर्धन जाधव, सुरेंद्र गजभारे आणि रवींद्र बोडखे या तीन अपक्ष उमेदवारांनी दखलपात्र मते घेतली आहेत. अपक्ष २९ उमेदवारांपैकी काहींनी ५९३, तर कोणी हजार-बाराशे मते घेतली. यामध्ये १२ अपक्षांनी दोन हजारांहून अधिक मतदान घेतले. विशेष म्हणजे, अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव यांनी गेल्या निवडणुकीत २ लाख ८३ हजार ७९८ मते घेऊन शिवसेनेचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांचा वारु रोखला होता. मात्र, यावेळी जाधव यांची किमया चालली नाही. मतदारांनी त्यांना ३९ हजार ६५४ मतांवरच रोखले. दुसरे अपक्ष उमेदवार जे फारसे चर्चेतही नव्हते. ते सुरेंद्र गजभारे यांना १० हजार ७१९ मते मिळाली. रवींद्र बोडखे यांना ६ हजार २५०, संजय शिरसाट यांना ३ हजार ८०९ आणि सुरुवातीपासून प्रचार आणि होर्डिंगमध्ये आघाडीवर असलेले डॉ. जीवन राजपूत यांना मात्र, ३ हजार ७८८ मतांवरच समाधान मानावे लागले.

५७२९ मतदारांची ‘नोटा’ला पसंतीदरम्यान, औरंगाबाद लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत नशीब अजमावत असलेल्या ३७ पैकी एकही उमेदवार सक्षम वाटला नाही म्हणून ५ हजारा ७२९ मतदारांनी ‘नोटा’ला पसंती दिली. सन २०१९ च्या निवडणुकीच्या तुलनेत यावेळी नोटाला पसंती देणारे ८०० मतदार अधिक आहेत. गेल्या वर्षी ही आकडेवारी ४ हजार ९२९ एवढी होती. 

२९ अपक्ष उमेदवारांना नोटा पेक्षा कमी मतेमतदानाच्या माध्यमातून राज्यकर्ते निवडले जातात आणि योग्य किंवा चांगले राज्यकर्ते निवडून दिले तर देशाची प्रगती होऊ शकते. त्यामुळे राज्य घटनेने १८ वर्षांवरील नागरिकांना मतदानाचा अधिकार बहाल केला आहे. मात्र, एकही उमेदवार सक्षम नाही, असे वाटल्यास सन २०१४ पासून ‘ईव्हीएम’वर नोटाचा (नन ऑफ द अबोव्ह) पर्याय दिलेला आहे. अलीकडे ‘नोटा’चा वापर बऱ्यापैकी वाढतोय. या निवडणुकीत ‘नोटा’ला मिळालेल्या पसंतीच्या तुलनेत २९ अपक्ष उमेदवारांना मिळालेली मते कितीतरी कमी आहेत.पहिल्या फेरीला १६० मतदारांनी ‘नोटा’ला पसंती दिली. त्यानंतर एकूण २७ फेऱ्यांपर्यंत प्रत्येक फेरीला किमान २०० ने ही आकडेवारी वाढत गेली आहे.

टॅग्स :aurangabad-pcऔरंगाबादlok sabha election 2024 Resultलोकसभा निवडणूक २०२४ निकालlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४