वैजापुर येथील रहिवासी अक्षय व स्नेहल संचेती या दाम्पत्याचा विवांश हा मुलगा आहे. हे दोघेही व्यवसायाने अभियंते असून पुणे येथे नोकरी करतात. त्यांचा मुलगा विवांशची बुद्धीमत्ता पाहून त्यांनी त्याला घरीच प्रशिक्षण दिले. त्यानंतर इंडिया बुक ऑफ रेकॉर्डच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. त्यांच्या नियमानुसार व्हिडिओ बनवून त्यांच्या वेबसाइटवर टाकण्यात आले. यात विवांशने विचारलेल्या प्रश्नात २० मानवी अवयव, २५ प्राणी, १५ पक्षी, ५४ वस्तू, २३ वाहने, १३ भाज्या, ९ फळे, ४ संगणकाचे पार्ट्स, ४ आकृत्यांची नावे अचूकपणे ओळखली. तसेच सांगितलेल्या तीन कृती अचूक केल्याबद्दल ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड’तर्फे विवांशला प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले आहे. वैजापूरचे नाव राष्ट्रीयस्तरावर नेल्यामुळे विवांशचे सर्वस्तरातून कौतुक होत आहे.
बुद्धीमत्ता अचंबित करणारी
विवांश हा सध्या दीड वर्षांचा असून त्याची बुद्धीमत्ता अचंबित करणारी आहे. वयाच्या सातव्या महिन्यातच विवांश बोलत नसतानाही इशाऱ्याने अनेक वस्तू ओळखत होता. यामुळे संचेती कुटुंबिय आश्चर्यचकीत झाले. चौदा महिन्यांचा झाल्यानंतर तो बोलायला लागला. त्याची स्मरण शक्ती पाहून संचेती दाम्पत्यांनी त्याला घरीच प्रशिक्षण देणे सुरु केले.
फोटोसह :
220721\save_20210722_174808~2.jpg
विवाश संचेती फोटो