शहरं
Join us  
Trending Stories
1
Explainer : पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांच्या सभा गाजल्या; मात्र गर्दीचं रुपांतर मतांमध्ये होणार का?
2
“एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?”; विनोद तावडेंचा पलटवार
3
“२३ तारखेनंतर कोणावर दया नाही, फडणवीस-शिंदेंना पोलिसांत हेटपाटे मारावे लागतील”: संजय राऊत
4
शरद पवारांना मी आमदार केलं असं म्हणणार नाही, कारण त्यावेळी मी तिसरीत होतो: अजित पवार
5
महाराष्ट्रात मविआ सरकार आल्यास आरक्षणात मुस्लीम कोटा देण्यावर चर्चा; रेवंथ रेड्डींची गॅरंटी
6
मुख्यमंत्री नितीश कुमार एकुलता एक मुलगा निशांतला लाँच करण्याच्या तयारीत? चर्चांना उधाण
7
शर्वरी जोग नव्या मालिकेत झळकणार, अभिनेत्रीच्या खऱ्या आयुष्यातील 'मितवा' कोण माहितीये का?
8
जेठालालचंही मालिकेच्या निर्मात्याशी भांडण? थेट कॉलरच पकडली; नक्की प्रकरण काय वाचा
9
याला म्हणतात रिटर्न...! ₹2 चा शेअर ₹120 वर पोहोचला; 5 वर्षांत 5500% चा तुफान परतावा दिला; केलं मालामाल
10
RCB ची खतरनाक चाल! 'मुंबई'ला गतवैभव मिळवून देणाऱ्या चेहऱ्यावर खेळला मोठा डाव
11
फक्त या ४ गोष्टी वर्ज्य करून गायकानं घटवलं १३० किलो वजन, ट्रान्सफॉर्मेशन पाहून व्हाल हैराण
12
कोण आहेत अयातुल्लाह अली खामेनेई यांचे पुत्र मोजतबा? जे होऊ शकतात इराणचे पुढील सर्वोच्च नेते
13
दिल्लीमध्ये पुन्हा शेतकरी आंदोलन पेटणार, हजारो ट्रॅक्टर कूच करणार, उपोषणाचीही घोषणा
14
ना बाबा रामदेव, ना आचार्य बालकृष्ण? कोण आहे ₹67535 कोटींच्या पतंजलीचा खरा मालक? योगगुरूंनीच सांगितलं...
15
बुलढाण्यात शिवसेना उमेदवाराला पाठिंबा दिल्याचं पत्र खोटं; राष्ट्रवादी काँग्रेसनं दिलं स्पष्टीकरण
16
यशाच्या शिखरावर असताना लग्न का केलं? माधुरी दीक्षित म्हणाली, "मी माझं स्वप्न..."
17
रूकेगा नहीं... इस्रायलचे लेबनानवर हल्ले सुरूच, हिज्बुल्लाच्या मुख्य प्रवक्त्याचा केला खात्मा
18
175 किमीची रेंज देणारी 'ही' इलेक्ट्रिक बाईक, किंमत 90 हजारांपेक्षा कमी
19
Numerology: ‘या’ ५ मूलांकांवर दत्तकृपा; गुरुपुष्यामृत योगावर अपार लाभ, लक्ष्मी शुभच करेल!
20
Vastu Tips: आजारमुक्त वास्तु ठेवण्यासाठी फॉलो करा 'या' सोप्या वास्तुटिप्स!

२,५०० कोटींतून होणार इंडस्ट्रियल बायपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 04, 2018 11:59 PM

केंद्रीय दळणवळण मंत्रालयांतर्गत नॅशनल हायवे अ‍ॅथॉरिटी आॅफ इंडिया (एनएचएआय) आणि दिल्ली-मुंबई-इंडस्ट्रिलय कॉरिडॉरअंतर्गत शेंद्रा आॅरिक सिटीमार्गे बिडकीन ते वाळूजमार्गे कसाबखेड्यापर्यंत २,५०० कोटींतून ९० कि़मी.चा ‘इंडस्ट्रियल बायपास’ करण्यात येणार आहे

ठळक मुद्देअधिसूचना जारी : शेंद्रा ते बिडकीनमार्गे वाळूज ते कसाबखेड्यापर्यंत भूसंपादन, डीपीआरला लागणार दोन वर्षे

औरंगाबाद : केंद्रीय दळणवळण मंत्रालयांतर्गत नॅशनल हायवे अ‍ॅथॉरिटी आॅफ इंडिया (एनएचएआय) आणि दिल्ली-मुंबई-इंडस्ट्रिलय कॉरिडॉरअंतर्गत शेंद्रा आॅरिक सिटीमार्गे बिडकीन ते वाळूजमार्गे कसाबखेड्यापर्यंत २,५०० कोटींतून ९० कि़मी.चा ‘इंडस्ट्रियल बायपास’ करण्यात येणार आहे. कसाबखेडा येथे हा बायपास एनएच-२११ (धुळे ते औरंगाबाद) जाऊन मिळेल. तेथून पुढे तो गुजरात आणि मध्यप्रदेशकडे जाण्यासाठी सुलभ होईल. हा बायपास सहा ते आठपदरी असेल. हा प्रकल्प केंद्र शासनाकडे वर्ग करण्यात आला आहे. औरंगाबादच्या विकासासाठी हा बायपास होणे महत्त्वाचे आहे. जर हा मार्ग पूर्ण झाला नाही, तर शहर १५ वर्षे मागे जाईल, असे उद्योग वर्तुळातून बोलले जात आहे.शेंद्रा, बिडकीन आणि वाळूज या तीन मोठ्या औद्योगिक वसाहतींना जोडणारा हा अर्धगोलाकार बायपासच असेल. २ वर्षे भूसंपादन आणि डीपीआरसाठी लागणार असून, २,५०० कोटींतील काही रक्कम डीएमआयसी इन्फ्रास्ट्रक्चर कार्यक्रमांतर्गत दिली जाणार आहे.शेंद्रामार्गे जालना रोड ते झाल्टा फाटामार्गे बीड बायपास ते लिंकरोडपासून एनएच-२११ पर्यंत रस्ता करण्याचा प्रस्ताव केंद्रीय मंत्रालयाने विचारात घेतला नाही. शेंद्रा ते बिडकीनमार्गे वाळूज ते कसाबखेडा येथे एनएच-२११ जवळ मोठे जंक्शन होईल. अशा पद्धतीचा आराखडा सध्या असला तरी भूसंपादन प्रक्रियेनंतर अंतिम कामाला गती मिळणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.भारतमालांतर्गत शेवटचा प्रकल्पएनएचएआयचा भारतमालांतर्गत हा शेवटचा प्रकल्प औरंगाबाद शहरालगत होणार आहे. २ वर्षांपर्यंत भूसंपादन प्रक्रिया आणि तेथून पुढे ३ वर्षे बायपास बांधकाम, असा हा पंचवार्षिक कार्यक्रम या बायपाससाठी गृहीत धरण्यात आला आहे. हा रोड ‘रिंगरोड’प्रमाणे असून, तीन औद्योगिक वसाहतींमधील अवजड वाहनांच्या दळणवळणासाठी तो महत्त्वाचा ठरेल.जालना रोड आणि बायपास प्रकल्प रद्द?नवीन इंडस्ट्रियल बायपास करण्याचे निश्चित झाल्यामुळे शहरातील अवजड वाहतूक याच मार्गाने बाहेरून जाईल. त्यामुळे जालना रोड आणि बीड बायपासचा निधी या प्रकल्पात वळविण्यात आल्याचे बोलले जात आहे. परिणामी, हे दोन्ही प्रकल्प रद्द झाल्यात जमा आहेत. मराठवाडा, विदर्भ, मुंबई, पुणे, नाशिक, शिर्डीकडील वाहतूक या इंडस्ट्रियल बायपासने वळेल. त्यामुळे जालना रोड, बीड बायपास हे रस्ते विकसित करण्याची जबाबदारी मनपावर राहणार आहे.

टॅग्स :DMICदिल्ली मुंबई औद्योगिक कॉरिडॉरroad safetyरस्ते सुरक्षाAurangabadऔरंगाबाद