शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
3
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
4
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
5
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
6
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
7
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
8
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
9
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
10
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
11
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
12
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
13
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
14
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
15
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
16
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
17
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
18
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
19
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
20
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा

औद्योगिक वसाहतींमध्ये होतेय वेगवेगळी कर आकारणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 03, 2018 7:06 PM

औद्योगिक वसाहतींत सोयी-सुविधांच्या नावाखाली उद्योगांकडून प्रत्येक ग्रामपंचायत वेगवेगळे कर आकारणी करीत असल्याने उद्योगांना भुर्दंड सहन करावा लागत आहे.

ठळक मुद्देएमआयडीसीकडून ग्रामपंचायतींकडून होणारी कर आकारणीची आकडेवारी संकलित केली जात आहे.

औरंगाबाद : औद्योगिक वसाहतींत सोयी-सुविधांच्या नावाखाली उद्योगांकडून प्रत्येक ग्रामपंचायत वेगवेगळे कर आकारणी करीत असल्याने उद्योगांना भुर्दंड सहन करावा लागत आहे. ही परिस्थिती जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून (एमआयडीसी) औद्योगिक वसाहतींत ग्रामपंचायतींकडून होणारी कर आकारणीची आकडेवारी संकलित केली जात आहे. 

जीएसटी लागू झाल्याने ग्रामपंचायत कर रद्द करावा, एमआयडीसी सेवा पुरविते, आम्हाला तिथेच कर भरण्याची मुभा असावी, संपूर्ण राज्यात ग्रामपंचायत करात सुसूत्रता असावी, अशी मागणी उद्योजकांनी केली होती. औरंगाबादेतच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील उद्योजकांना ग्रामपंचायत करामुळे असा त्रास सहन करावा लागत असल्याची ओरड झाली. 

‘एमआयडीसी’च्या औरंगाबाद प्रादेशिक कार्यालयांतर्गत आजघडीला औरंगाबाद, जालना आणि बीड हे तीन जिल्हे आहेत. तिन्ही जिल्ह्यांत २२ औद्योगिक क्षेत्र आहेत. यातील अनेक औद्योगिक क्षेत्र हे ग्रामपंचायतींच्या हद्दीत आहेत. एकटी वाळूज औद्योगिक वसाहत सात ग्रामपंचायतींच्या हद्दीत आहे. येथील उद्योजक ग्रामपंचायत कर भरतात. मात्र, अनेक ग्रामपंचायती उद्योजकांकडून मनमानी पद्धतीने अवास्तव कर वसुली करीत असल्याची ओरड आहे. थकीत कर वसुलीसाठी या ग्रामपंचायतीमधील कर्मचारी व पदाधिकाऱ्यांनी थेट कंपन्यांमध्ये घुसून कॉम्प्युटर अन्य साहित्य जप्त करण्याचा प्रकार फेब्रुवारीत झाला होता. या दादागिरीविरोधात सर्व उद्योजक एकवटले होते.

गांभीर्याने लक्ष द्यावेप्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी करण्यात आली. या सगळ्या परिस्थितीनंतर एमआयडीसी प्रशासन औद्योगिक वसाहतींमधील ग्रामपंचायत कर आकारणीची परिस्थिती जाणून घेत आहे. यामध्ये बहुतांश ग्रामपंचायतींची कर आकारणी ही वेगवेगळी असल्याचे समोर येत आहे, अशी माहिती ‘एमआयडीसी’च्या सूत्रांनी दिली. ही सगळी माहिती वरिष्ठ पातळीवर सादर केली जाईल. 

माहिती गोळा करणे सुरूऔद्योगिक वसाहतींतून ग्रामपंचायतींना करापोटी किती महसूल मिळतो, याबाबत शासनाने माहिती मागितली आहे. त्यामुळे ग्रामपंचायतींकडून ही माहिती गोळा करण्यात येत आहे.-सोहम वायाळ, प्रादेशिक अधिकारी, एमआयडीसी

टॅग्स :TaxकरMIDCएमआयडीसीgram panchayatग्राम पंचायत