लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : एसटी महामंडळाच्या दुर्लक्षामुळे ‘एसटी’तून बनावट पासधारकांचा सुसाट प्रवास सुरू आहे. प्रवासामध्ये गर्दीमुळे पास, ओळखपत्र योग्यरीत्या तपासणीकडे अनेकदा कानाडोळा होतो. त्याचाच फायदा घेऊन बनावट पास बनविण्याचा ‘उद्योग’ जोरात सुरू असल्याचे दिसते.बनवाट पास तयार करून आणि त्यावर प्रवास के ल्याप्रकरणी दोन जणांवर गुन्हा दाखल झाला. वैजापूर-जळगाव बसमध्ये आरोपी प्रवास करीत असताना वाहकाच्या सतर्कपणामुळे हा प्रकार समोर आला; परंतु प्रत्यक्षात अशाप्रकारे अनेक प्रवासी बनावट पासने प्रवास करून शासनाला लाखो रुपयांचा चुना लावत आहेत. एसटी महामंडळातर्फे ज्येष्ठ प्रवाशांना प्रवासात ५० टक्के सवलत दिली जाते; परंतु या सुविधेचा गैरफायदा घेण्याचा प्रकार होतो. बनावट ओळखपत्र दाखवून वयाची साठीही ओलांडलेली नसताना सवलत लाटली जाते. यापुढे जाऊन आता थेट एसटी महामंडळाचा कर्मचारी भासवून प्रवास के ला जात आहे.महामंडळात कार्यरत कर्मचाºयांना आणि कुटुंबियांना पासद्वारे मोफत प्रवासाची सुविधा दिली जाते. ही सुविधा घेण्यासाठी बनावट पास तयार करून बिनधास्त प्रवास केला जात आहे.प्रवाशांच्या गर्दीने खचाखच भरलेल्या एसटीत असे बनावट पास ओळखणे अशक्य होते. त्यातून बनावट पासधारक मोकळे सुटत आहेत, तर दुसरीकडे अवघ्या काही रकमेत बनावट पास तयार करून दिला जात असल्याचे दिसते.पासवर स्थानिक माहितीदोन दिवसांपूर्वी जप्त केलेल्या पासवर सर्व माहिती ही विभागातील कार्यालयाची नमूद केली आहे. पासवर औरंगाबाद विभागात लिपिक म्हणून कार्यरत असल्याचे नमूद केलेले आहे. तसेच त्यावर अधिकाºयांचा शिक्काही आहे. स्थानिक सर्व माहिती काढून बनावट पास बनविण्याचा प्रकार होत असल्याचे यानिमित्ताने समोर आले आहे.मोहीम राबविणारबनावट पासधारकांवर कारवाई करण्यासाठी दर महिन्याला मोहीम राबविण्यात येणार आहे. यामध्ये बनावट पासने प्रवास करताना आढळून येणाºयांवर पोलिसांत गुन्हा दाखल केला जाईल.-संदीप रायलवार,विभागीय वाहतूक अधिकारी, एसटी महामंडळ
बनावट पास बनविण्याचा ‘उद्योग’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2017 1:09 AM