छत्रपती संभाजीनगर : लग्नानंतर एक दोन वर्षात मुलं झाले नाही तर गेली अनेक वर्षे केवळ महिलांनाच दोषी ठरविले जात होते. मात्र, गेल्या १५ वर्षात आता पुरुषांमधील वंध्यत्वाचे प्रमाण महिलांच्या बरोबरीने आले आहे. मुलं होत नाही म्हणून पुरुषांनाही अनेकांकडून टोमणे मारले जाते. मात्र, वैद्यकीय क्षेत्रातील प्रगतीने वंध्यत्वावर मात करून आई-बाबा होण्याचा आनंद अनेक कुटुंबांमध्ये पसरत आहे.
दरवर्षी २५ जुलै रोजी जागतिक आयव्हीएफ दिन साजरा केला जातो. रोजी जगातील पहिली टेस्ट ट्यूब बेबी लुईस जॉय ब्राऊनचा जन्म झाला होता. त्यानिमित्ताने हा दिवस साजरा केला जातो. वंध्यत्व ही अतिशय सामान्य समस्या आहे. मात्र, जोडप्यांना त्यांच्या समस्येवर उघडपणे चर्चा करण्यास संकोच वाटतो. त्यामुळे अनेक जण उपचारापासून दूर राहतात. लग्नानंतर एक दोन वर्षात मूल झाले नाही तर आता महिलांप्रमाणे पुरुषांनाही त्याविषयी वारंवार विचारणा केली जाते. अनेकदा चेष्टेचाही विषय होतो. मात्र, गेल्या काही वर्षात उपचार घेण्यासाठी पुढे येणाऱ्यांची संख्या वाढत आहे, असे डाॅक्टरांनी सांगितले.
१०० पैकी २० जणांना वंधत्वघाटीतील स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र विभागात येणाऱ्या १०० पैकी २० रुग्णांमध्ये वंध्यत्व असते, असे डाॅक्टरांनी सांगितले.
४९ वर्षीही मातृत्वाचा आनंदवंध्यत्वावर उपचार घेऊन अगदी ४९ वर्षीही मातृत्वाचा आनंद मिळत आहे. वयाच्या ४५ वर्षानंतरही अनेक जण ‘आयव्हीएफ’ उपचार पद्धतीद्वारे आई होतात.
- छत्रपती संभाजीनगरातील आयव्हीएफ सेंटर- २२- दरवर्षी ‘आयव्हीएफ’द्वारे जन्म - सुमारे ३ हजार बालके- वंध्यत्व उपचाराचा खर्च - सुमारे ७० ते ९० हजार.
विम्यात समावेश व्हावाविम्यामध्ये अनेक आजारांचा समावेश आहे. मात्र, आजघडीला वंध्यत्वाचा समावेश नाही. त्याचा समावेश केला पाहिजे. वयाच्या ४९ वर्षांपर्यंत वंध्यत्व निवारण उपचार करता येतो.- डाॅ. अपर्णा राऊळ, अध्यक्ष, प्रसूती व स्त्रीरोगतज्ज्ञ संघटना
वंध्यत्वाचे प्रमाण वाढलेवंध्यत्वाचे प्रमाण गेल्या काही वर्षात वाढले आहे. पूर्वी महिलांमध्ये वंध्यत्वाचे प्रमाण अधिक होते. मात्र, आता महिला आणि पुरुषांमध्ये हे प्रमाण सारखेच आहे.- डाॅ. श्रीनिवास गडप्पा, स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र विभागप्रमुख, घाटी
वंध्यत्वाची कारणे?- उशिरा लग्न होणे- व्यसनाधीनता- जंक फूडचे अतिसेवन- लठ्ठपणा- प्रजनन अवयवातील दोष- मानसिक आरोग्याकडे दुर्लक्ष- कुपोषण- हार्मोन्समधील बदल- स्त्रीबीज, शुक्राणू कमी असणे