औरंगाबाद : ‘हरभऱ्याची मसालेदार भाजी,’ ‘चमचमीत हरभऱ्याची भाजी’, ‘झणझणीत हरभऱ्याची रस्सा भाजी’ नुसते नाव वाचल्यावरच तुमच्या तोंडाला पाणी सुटले असेल. हरभरा म्हणजे घोळाण्याची भाजी होय. बाजारातही भाजी तुरळक दिसते. हिवाळ्यात बाजरीच्या भाकरीसोबतही हरभऱ्याची भाजी खाण्याची मजा काही और असते. मात्र, ही किलोभर भाजी खरेदीसाठी शंभराची नोटच द्यावी लागते. जे ग्राहक ही भाजी महाग असली तरी आवर्जून खरेदी करतात त्यांना भाजी खाण्याचे महत्त्व माहिती असते.
औरंगपुरा भाजीमंडी परिसरात, केळीबाजार, मुकुंदवाडी भाजीमंडई, छावणीच्या आठवडी बाजारात काही भाजी विक्रेत्यांकडेही घोळाण्याची (हरभरा) भाजी मिळते. या भाजीमध्ये भरपूर प्रोटीन आणि कॅलरीज असते. यामुळे हाडे आणि स्नायू मजबूत होतात. ही भाजी आरोग्यासाठी खूप लाभदायक आहे. मात्र, ही भाजी शहरात जास्त प्रमाणात खाल्ली जात नाही.
मोहरी, चंदन बटवा, नवलकोलबाजारात मोहरी, चंदन बटवा व नवलकोल या भाज्या विक्रीला आल्या आहेत. नव्या पिढीला ही नावे नवीन वाटत असतील. मात्र, पंजाब, काश्मीरमध्ये या भाज्या जास्त विकल्या जातात. मोहरी १० रुपये गड्डी, चंदन बटवा, नवलकोल या भाज्या १० रुपये नग मिळत आहेत. औरंगपुऱ्यात काही ठराविक भाजी विक्रेत्यांकडे या भाज्या मिळतात.
पालेभाज्यांना मागणीपालेभाज्या अवघ्या ५ रुपयांपासून मिळत असल्याने ग्राहक एकच नव्हे तर दोन ते तीन-चार प्रकारच्या भाज्या खरेदी करीत आहेत. पोषक वातावरणामुळे पालेभाज्यांची मोठी आवक होत आहे. यामुळे भाव घसरले आहेत. संक्रांतीनंतर भाज्यांचे भाव वाढतील.- सोमनाथ वाघ, भाजी विक्रेते
शेवगाच्या शेंगा १५० ते २०० रुपयेशेवगाच्या शेंगाची भाजी हिवाळ्यात जास्त प्रमाणात खाल्ली जाते. विशेषत: रेस्टॉरंट, धाब्यांवर शेवग्याच्या भाजीला मागणी असते. यामुळे शेवगा सध्या १५० ते २०० रुपये किलो दराने मिळत आहेत. सध्या फळभाज्यांमध्ये शेवगाच्या शेंगा महाग आहेत.- सागर पुंड, भाजी विक्रेते
पालेभाज्या स्वस्तभाजीचा प्रकार -- भाव (गड्डी)मेथी--- ५ ते १०पालक- ५ ते १०शेपू- ५ ते १०करडी- ५ ते १०चुका- ५ ते १०तांदुळजा ५ ते १०९(दर रुपयांमध्ये)