औरंगाबाद : परभणी येथे बुधवारी ओमायक्राॅनने (Omicron Variant ) शिरकाव केला. येथे ओमायक्राॅनच्या २ रुग्णांचे निदान झाले आणि मराठवाड्यातील आणखी एका जिल्ह्याचा ओमायक्राॅनच्या यादीत समावेश झाला. याबराेबरच औरंगाबादेत आणखी एका रुग्णाचे निदान झाले असून, औरंगाबाद जिल्ह्यात आतापर्यंत आढळलेल्या एकूण रुग्णांची संख्या आता २० झाली आहे.
औरंगाबाद जिल्ह्यात सोमवारी एकाच दिवसात ओमायक्राॅनच्या १४ रुग्णांचे निदान झाले होते. परंतु गेल्या १५ दिवसांत हे रुग्ण कोरोनामुक्त आणि ओमायक्राॅनमुक्तदेखील झाले आहेत. औरंगाबादसह यापूर्वी उस्मानाबाद, जालना, लातूर आणि नांदेड येथे ओमायक्राॅनचे रुग्ण आढळलेले आहेत. आता परभणीतही २ रुग्णांचे निदान झाले आहे.
मराठवाड्यातील एकूण ओमायक्राॅनबाधितजिल्हा - एकूण रुग्णऔरंगाबाद - २०उस्मानाबाद - ११लातूर - ३नांदेड - ३जालना - ३परभणी - २