नांदेड : डॉ़ शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील व्हेंटीलेटर नादुरुस्त झाल्यामुळे अत्यवस्थ रुग्णांना धोका पत्करुन अम्बूबॅगवर ठेवण्यात येत होते़ याबाबत लोकमतने १२ मार्च रोजी रुग्णांच्या आयुष्याची दोरी नातेवाईकांच्या हाती या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित करताच, खडबडून जागे झालेल्या प्रशासनाने वेगाने हालचाली केल्या. त्यामुळे रुग्णालयाला दोन व्हेंटीलेटर उपलब्ध झाले आहेत़विष्णूपुरी येथील डॉ़ शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नांदेडसह हिंगोली, परभणी, यवतमाळ, निजामाबाद आदी भागातून मोठ्या प्रमाणात रुग्ण येतात़ त्यासाठी रुग्णालयात अत्याधुनिक सोयीसुविधा असलेले दोन अतिदक्षता विभाग सुरु केले आहेत़ परंतु या विभागातील व्हेंटीलेटर नादुरुस्त झाले असताना, प्रशासनाने मागणीच केली नाही़ त्यामुळे अत्यवस्थ रुग्णांना कृत्रिम श्वासोच्छवासासाठी अम्बूबॅगवर ठेवण्यात येत होते़ ती अम्बूबॅग नातेवाईकांच्या हाती देण्यात येत होती़ जोपर्यंत नातेवाईक त्या अम्बूबॅगवर दाब देत राहील तोपर्यंतच रुग्णाला श्वास घेता येणार होता,़ अशाप्रकारे रुग्णांच्या जीविताशी खेळण्याचा सुरु होता़ त्याबाबत लोकमतने वृत्त प्रकाशित केले़ आ़ डी़ पी़ सावंत यांनीही या प्रकरणाची दखल घेवून विभागाच्या मंत्र्यांशी चर्चा करणार असल्याचे सांगितले़ रुग्णालयाला आता दोन व्हेंटीलेटर मिळाले आहेत़ येत्या दोन-तीन दिवसांत आणखी एक व्हेंटीलेटर मिळण्याची शक्यता आहे़ त्यामुळे रुग्णांच्या जीविताशी खेळण्याचा सुरु असलेला हा प्रकार आता थांबणार आहे़ (प्रतिनिधी)विष्णूपुरी येथे रुग्णालयाचे घाईघाईने स्थलांतर करण्यात आले़ या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून करण्यात येणारी अनेक कामे अद्यापही अर्धवट आहेत़ रुग्णांच्या नातेवाईकांसाठी पाण्याची व्यवस्थाही नाही़ बोअरवेल घेण्यात आला, परंतु त्यावर मोटर व पाईपलाईन करण्यात आली नाही़ त्यामुळे या बोअरवेलचा काहीच उपयोग नाही़ मनपाच्या जलकुंभातून सध्या रुग्णालयाला पाणीपुरवठा करण्यात येतो़ परंतु येत्या काळात त्यातही कपात होण्याची शक्यता आहे़ त्यामुळे लातूरप्रमाणेच नांदेडातही शस्त्रक्रिया बंद पडण्याची वेळ येवू शकते, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे़
अत्यवस्थ रुग्णांना मिळाला श्वास़़
By admin | Published: March 17, 2016 12:06 AM