व्हॉइस फॉर स्पिचलेस या मुक्या प्राण्यांसाठी काम करणाऱ्या संस्थेचे सदस्य मनोज गायकवाड यांना ग्रामस्थांकडून रेड्याविषयीची माहिती समजली. या संस्थेचे बहुसंख्य सदस्य विद्यार्थी आणि होतकरू तरुण असल्याने रेड्याच्या उपचारासाठी पैसा उभा करणे त्यांच्यासाठी आव्हान होते; परंतु तरीही या तरुणांनी पुढाकार घेऊन उपचारासाठी लागणारी रक्कम जमा केली.
३० डिसेंबर रोजी डाॅ. दीपक नागरे यांना घेऊन ही टीम लाडसावंगी येथे पोहोचली. तेथे डॉक्टरांनी रेड्याचे लहानसे ऑपरेशन केले. त्यानंतर रेड्याचा काही दिवस सांभाळ करून दि. ४ जानेवारी रोजी त्याला दौलताबाद येथील एका जणाला दत्तक देण्यात आले. यामुळे आता या रेड्याला कायमचा आसरा मिळाला. समाधान मिसाळ, मनोज गायकवाड, गोकूळ पाटील, प्रवीण उबाळे, गोविंद इनामदार, दिलीप पडूळ, मंगेश भगुरे यांचा यामध्ये सहभाग होता.
फोटो ओळ :
रेड्याला वेदनेतून मुक्त करणारे व्हॉइस फॉर स्पिचलेस टीमचे सदस्य.